शहीद-ए-आझम भगतसिंह यांच्या 117 व्या जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभेकडून देशभरात शहीद स्मृती संकल्प अभियान चालविण्यात आले होते. मुंबईत या अभियानाची सांगता काल “काफिला-ए-इंकलाब” रॅलीने झाली. मागील 10 दिवसांत शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांचे समाज परिवर्तनाचे विचार आजच्या विद्यार्थी-तरूण पिढीत रुजवण्याच्या हेतूने मानखुर्द-गोवंडी मधील शाळा महाविद्यालयांत विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. ज्यात शहीद-ए-आझम भगतसिंह यांच्या जीवनावर आधारित इंकलाब नावाचा माहितीपट, गाणी, नाटक सादरीकरण, पुस्तक प्रदर्शने लावण्यात आलीत. अभियानाच्या शेवटच्या दिवशी “काफिला-ए-इंकलाब” रॅली चे आयोजन करण्यात आले. रॅली मानखुर्दच्या कामगार वस्तीमधून काढण्यात आली. यादरम्यान “राजा का बाजा”…
Author: nbs_upload
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे “इंकलाब” माहितीपटाचे स्क्रिनिंग आणि चर्चा !!
“शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान” अंतर्गत नौजवान भारत सभेतर्फे (नौभास) मानखुर्द-गोवंडी, मुंबई येथील महाविद्यालयात दिनांक 30 सप्टेंबर रोजी गौहर रझा दिग्दर्शित ‘इंकलाब’ माहितीपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. ह्या माहितीपटात भगतसिंह आणि त्यांच्या साथींचा क्रांतिकारी जीवनप्रवास आणि भारतीय स्वातंत्र्यसंग्रामादरम्यान अस्तित्वात असलेले विविध वैचारिक पैलू दाखवण्यात आले आहे. स्क्रिनिंगनंतर विद्यार्थ्यांसोबत भगतसिंहांच्या विचारांबद्दल आणि त्यांच्या स्वप्नांचा समाज निर्माण करण्यासाठी आज आपण काय करू शकतो, ह्या विषयांवर चर्चा करण्यात आली. शेवटी नौभासच्या सांस्कृतिक पथकाने “मेरा रंग दे बसंती चोला” गीत प्रस्तुत केले आणि क्रांतिकारी साहित्याचा बुकस्टॉल सुद्धा लावण्यात आला. विद्यार्थ्यांचा ह्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.…
नौजवान भारत सभा, मुंबईने “शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान” मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये आयोजित केले
शहीद भगतसिंह यांच्या 117 व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने, नौजवान भारत सभा (मुंबई) “शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान” मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये आयोजित केले जात आहे. शहीद भगतसिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा संदेश घेऊन, नौजवान भारत सभा, मुंबईने मानखुर्द मधील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये गौहर रझा यांचा “इंकलाब” हा माहितीपट दाखवला. या माहितीपटात आपल्या क्रांतिकारकांचा क्रांतिकारी प्रवास आणि ब्रिटिश साम्राज्यवादाने त्रस्त असलेल्या भारतात समाजवाद निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न दाखव ले आहे. माहितीपटानंतर विद्यार्थ्यांशी देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल चर्चा करण्यात आली, देशातील आजची ही परिस्थिती आपल्या क्रांतिकारकांनी जो समाज घडवण्यासाठी जीवन…
“धर्मवादाचे राजकारण आणि भगतसिंहांचा संदेश” ह्या विषयावर चर्चासत्र
शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियानांतर्गत 28 सप्टेंबर च्या पूर्वसंध्येला “धर्मवादाचे राजकारण आणि भगतसिंहांचा संदेश” ह्या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. त्यामध्ये मुख्य मांडणी नौजवान भारत सभेचे साथी रवि, सुस्मित आणि राहुल ह्यांनी केली. सुरुवातीला साथी रवी यांनी 2014 पासून देशभरामध्ये धार्मिक द्वेषाच्या घटनांमध्ये झालेल्या वाढी बद्दल तथ्यात्मक मांडणी केली. परंतु फक्त फॅशिस्ट आरएसएस भाजप सरकारच्या काळातच नाही तर त्याच्या आधी सुद्धा काँग्रेस, शिवसेना, सपा, इत्यादींच्या काळातही संघ परिवारास मदत होतील असे दंगे भडकविण्यात आले. ह्या देशाचा भांडवलदार वर्ग आणि धर्मवादी शक्तींनी सत्ता…
शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान : पुणे, 28 सप्टेंबर 2024
मित्र-मैत्रिणींनो, शहीद भगतसिंह यांच्या 117व्या जन्मदिवस प्रीत्यर्थ नौजवान भारत सभा ( ) द्वारे पुण्यातील विविध भागांतील कामगार कष्टकऱ्यांच्या वस्त्यांमध्ये, शाळा महविद्यालयांमध्ये, सामाजिक ठिकाणी “शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियान” आयोजित केल्या गेले आहे. त्याच अंतर्गत आज 28 सप्टेंबर रोजी नौजवान भारत सभेच्या कार्यकर्त्यांनी दापोडी, पुणे येथील शहीद भगतसिंहांच्या पुतळ्यास प्रभातसमयी भेट दिली आणि माल्यार्पण करून त्यांना क्रांतिकारी अभिवादन केले. सुरुवातीला नौजवान भारत सभेच्या साथी सुप्रीत यांनी भगतसिंहांच्या स्वप्नातील भारताविषयी वक्तव्य केले. त्यांनी ज्या समतामुलक समाजाची स्वप्ने बघितली त्याविषयी देखील मांडणी करण्यात आली. तद्नंतर साथी सुप्रीत यांनी वर्तमानात देशभरातील विविध समस्यांबद्दल बोलत…
शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान : अहमदनगर, 28 सप्टेंबर 2024
शहीद–ए–आजम भगत सिंह यांच्या 117 व्या जन्मदिवसानिमित्त देशभरामध्ये 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान आठवडाभर “शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान” चालविण्यात आले. या अभियाना दरम्यान देशभरातील वेगवेगळ्या शहरात विद्यार्थी आणि युवकांस हित तसेच समाजातील वेगवेगळ्या स्तरावर सांस्कृतिक, प्रबोधनपर अनेक कार्यक्रम करण्यात आले. ज्यात गाणे, नाटक, पुस्तक प्रदर्शने लावण्यात आली. अहमदनगर शहरात “शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान” मोठ्या उत्साहात पार पडला. शेवटच्या दिवशी शहरातील सिद्धार्थनगर भागातील कामगार वस्तीमध्ये “देशाला पुढे घेऊन जा!” हे नाटक सादर करण्यात आले तसेच सभा, क्रांतिकारी गीत, पत्रके वाटण्यात आली. शहीद–ए–आजम भगतसिंह…
भगतसिंह यांच्या जन्मदिनानिमित्त सादर आहे शहीद भगतसिंह यांच्या काही महत्त्वाच्या उद्धरणांची पोस्टर शृंखला
शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान : पुणे, 26 सप्टेंबर 2024
शहीद भगतसिंह यांच्या जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभेतर्फे शहीद स्मृती संकल्प अभियान राबविण्यात येत असून त्याअंतर्गत पुस्तक प्रदर्शने, पथनाट्य इत्यादी माध्यमातून विद्यार्थी-तरुण आणि जनतेपर्यंत क्रांतिकारकांचा वारसा व त्यांचे विचार पोहोचविण्याचे काम केले जात आहे. कधी नव्हे एवढे आज क्रांतिकारकांचे विचार प्रासंगिक झाले आहेत. याच अभियानांतर्गत ‘ विविध महाविद्यालयांमध्ये नौभास तर्फे “बाईचीच चूक” या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. पुरुषसत्ताक व्यवस्थेवर हल्ला चढवणारे आणि महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अधोरेखित करणाऱ्या या पथनाट्याला विद्यार्थी-तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. काही विद्यार्थ्यांनी सांगितले की हे नाटक बघताना त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. त्यातून उभे झालेले मुद्दे आजचे जिवंत…
शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान : अहमदनगर, 26 सप्टेंबर 2024
शहीद–ए–आजम भगतसिंह यांच्या 117 व्या जन्मदिनानिमित्त नौभासच्या वतीने 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान ‘शहीद भगतसिंह स्मृति संकल्प’ अभियान राबवले जात आहे. या अभियानाचा भाग म्हणून नौभास च्या वतीने अ,नगर शहरातील विविध वस्त्यांमध्ये अभियान चालविण्यात येत आहे. ज्यात शहरातील चितळे रोड, गवळीवाडा, तेलिखुंट या भागात क्रांतिकारी गीते व ‘देशाला पुढे घेऊन जा!’ या पथनाट्याचे सादरकरीकरण करण्यात आले, तसेच सोबतच पत्रके वितरीत करण्यात आली. “आज देशामध्ये विकासाचे जे चित्र आपल्यासमोर उभे केले जात आहे. विकासाच्या नावाने काही मूठभर लोकांना फायदा पोहचवण्याचे काम केले जात आहे तर दुसऱ्या बाजूला देशात मोठ्यासंख्येने असणाऱ्या कामगार-कष्टकरी…
अगर तुम युवा हो या कवितेमधील एक अंश
तुम्ही आहात प्रेम, सौंदर्य अन् नैसर्गिकतेची निरागस कामना, तुम्ही आहात आठवणी अन् स्वप्नांचं द्वंद्व, तुम्ही आहात वीर शहीदांच्या जीवनाचे ते दिवस ज्यांना ते जगू न शकले. ह्या अंधाऱ्या, कुबट तुरुंगात तुम्ही आहात प्रकाशमयी खिडक्या, जर असाल तुम्ही युवक • शशिप्रकाश
