शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान : अहमदनगर, 26 सप्टेंबर 2024

शहीद–ए–आजम भगतसिंह यांच्या 117 व्या जन्मदिनानिमित्त नौभासच्या वतीने 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान ‘शहीद भगतसिंह स्मृति संकल्प’ अभियान राबवले जात आहे.

या अभियानाचा भाग म्हणून नौभास च्या वतीने अ,नगर शहरातील विविध वस्त्यांमध्ये अभियान चालविण्यात येत आहे. ज्यात शहरातील चितळे रोड, गवळीवाडा, तेलिखुंट या भागात क्रांतिकारी गीते व ‘देशाला पुढे घेऊन जा!’ या पथनाट्याचे सादरकरीकरण करण्यात आले, तसेच सोबतच पत्रके वितरीत करण्यात आली.

“आज देशामध्ये विकासाचे जे चित्र आपल्यासमोर उभे केले जात आहे. विकासाच्या नावाने काही मूठभर लोकांना फायदा पोहचवण्याचे काम केले जात आहे तर दुसऱ्या बाजूला देशात मोठ्यासंख्येने असणाऱ्या कामगार-कष्टकरी जनतेला मूलभूत सुविधांच्या अभावात अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.” नाटकाच्या माध्यमातून देशाच्या सध्य वस्तुस्थितीवरती प्रखर भाष्य केले गेले. तसेच सामाजिक बदलाच्या व्यापक कार्यात तरुणांनी पुढे आले पाहिजे, तसेच नौभासचे सदस्य बनण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा!

संपर्क –
7249590541, 9403317106

Related posts

Leave a Comment

18 − six =