शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान : अहमदनगर, 28 सप्टेंबर 2024

 

 

 

 

 

 

शहीद–ए–आजम भगत सिंह यांच्या 117 व्या जन्मदिवसानिमित्त देशभरामध्ये 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान आठवडाभर “शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान” चालविण्यात आले. या अभियाना दरम्यान देशभरातील वेगवेगळ्या शहरात विद्यार्थी आणि युवकांस हित तसेच समाजातील वेगवेगळ्या स्तरावर सांस्कृतिक, प्रबोधनपर अनेक कार्यक्रम करण्यात आले. ज्यात गाणे, नाटक, पुस्तक प्रदर्शने लावण्यात आली.
अहमदनगर शहरात “शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान” मोठ्या उत्साहात पार पडला. शेवटच्या दिवशी शहरातील सिद्धार्थनगर भागातील कामगार वस्तीमध्ये “देशाला पुढे घेऊन जा!” हे नाटक सादर करण्यात आले तसेच सभा, क्रांतिकारी गीत, पत्रके वाटण्यात आली.
शहीद–ए–आजम भगतसिंह यांच्या जीवनावर आधारित, तसेच गौहर रजा निर्देशित ‘इंकलाब’ या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान साथी सायली हिने भगतसिंह यांचे जीवनकार्य तसेच त्यांच्या विचारांची आजची प्रासंगिकता यावर मांडणी करत नौजवान भारत सभा संघटनेला जोडून घेण्याचे आवाहन केले. त्या नंतर साथी प्रणिता हिने शहीद संकल्प अभियानाबद्दल आपले काही अनुभव मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक साथी तनुजाने केले. त्या नंतर नवीन सभासदांना सभासदत्व देण्यात व जुन्या सदस्यांचे नूतनीकरण करण्यात आले.

नौजवान भारत सभा (अ,नगर)
संपर्क –7249590541

Related posts

Leave a Comment

2 × two =