महाराष्ट्रातून नौजवान भारत सभा, दिशा विद्यार्थी संघटना आणि स्त्री मुक्ती लीग चे कुस्ती पहिलवानांच्या आंदोलनाला समर्थन.

भाजप सरकारचा मंत्री बृजभूषण शरण सिंग च्या विरोधात गेले 20 दिवस कुस्ती पहिलवानांचे आंदोलन सुरू आहे. बृजभुषण वर महिला कुस्ती खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप कुस्ती खेळाडूंनी लावला आहे आणि सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर बृजभुषण वर FIR झाली आहे. परंतू FIR केल्याचा बऱ्याच दिवसांनंतर सुद्धा दिल्ली पोलीस पुढील कारवाई करण्यास टाळत आहेत. आज नौजवान भारत सभा, महाराष्ट्र टीमने दिशा विद्यार्थी संघटना आणि स्त्री मुक्ती लीग सोबत दिल्ली च्या जंतर -मंतर मैदानात जाऊन पहिलवानांच्या संघर्षाचे समर्थन केले. भाषणात सांगितले गेले की मुंबई-पुण्यात त्यांच्या समर्थनात मोर्चे काढले गेले आहेत आणि सामान्य जनतेचा चांगला…

23 मार्च, शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या 92 व्या शहीद दिनानिमित्त

शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांचे स्वप्न अपुरे! कष्टकरी आणि नवयुवक करतील पुरे!! साथींनो, आज आपण एका अशा काळात जगत आहोत जेव्हा फासीवादी शक्तींचा हल्ला निरंतर वाढत चालला आहे. तर दुसऱ्या बाजूला सामान्य जनता नरकासमान परिस्थितीमध्ये जगण्यासाठी मजबूर आहे. लोकांनी संघटीत होऊ नये यासाठी कट्टरपंथ, सांप्रदायिकता आणि अंधराष्ट्रवादाचे जहर लोकांच्या डोक्यात भरले जात आहे. तर्क, प्रगतिशील विचार व मानवतेला पुढे घेऊन जाणाऱ्या मूल्यांवर संघटीत हल्ले सुरु आहेत. अशा काळात भगतसिंह यांच्या शब्दात “क्रांतीचे चैतन्य जागे करण्यासाठी जेणेकरून मानवतेच्या आत्म्यात खळबळ पैदा होईल” आम्ही शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या 92…

गेल्या दोन आठवड्यांपासून पुण्याच्या विविध भागांमध्ये “नौजवान भारत सभा” तर्फे बसनेगा (Bhagat Singh National Employment Guarantee Act) अभियान राबविण्यात येत आहे.

 या अभियानांतर्गत शिक्षण आणि रोजगाराच्या मूलभूत अधिकारासाठी तरुणांनी संघटित झाले पाहिजे यासाठी विद्यार्थी–तरुणांना आवाहन केले जात आहे. बसनेगा अभियानाला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जाती-धर्माच्या मुद्द्यांपेक्षा शिक्षण आणि बेरोजगारी हेच तरुणांसाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत हे प्रकर्षाने जाणवले. अनेक तरुणांनी बसनेगाचे पत्रक वाचून बसनेगाच्या मागण्यांशी सहमती दर्शवली आणि “नौजवान भारत सभा” सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. बसनेगा अभियानाची गरज का? आजच्या भांडवली व्यवस्थेत शिक्षण—जे माणसाच्या आणि एकूणच समाजाच्या प्रगतीसाठी मूलभूत गोष्ट आहे—पैसेवाल्यांची मक्तेदारी बनले आहे. बहुतांश कामगार–कष्टकरी वर्गातून येणाऱ्या विद्यार्थ्यांवर या व्यवस्थेने शिक्षणबंदी लादली आहे. अर्ध्यातून शाळा सोडण्याचे प्रमाण प्रचंड…

नौजवान भारत सभा द्वारा संचालित शहीद राजगुरू शिक्षा सहायता केन्द्र के बच्चों को भायखला प्राणी संग्रहालय ले जाया गया।

नौजवान भारत सभा द्वारा संचालित शहीद राजगुरू शिक्षा सहायता केन्द्र के बच्चों को पिछले रविवार मुम्बई में स्थित भायखला प्राणी संग्रहालय ले जाया गया। जहां पर बच्चों ने हाथी, चीता, शेर, हिरण और दरियाई घोड़ा देखा।साथ साथ पक्षियों की अलग प्रजातियां भी अपने अलग अलग रूप और रंगों की वजह से बच्चों के लिए आकर्षक का केन्द्र बनी रही। पानी के कछुओं के साथ सूखी, मिट्टी पर रहने वाले कछुओं, कबूतर, तोता, कोयल, तितलियां, सारस, पेंग्विन और जिनको सिर्फ किताबों के पन्नों में पढ़ा और देखा था। आज अपनी आंखों…

नौजवान भारत सभेने ‘गैर सरकारी संघटना (एनजीओ) खरोखरच सामाजिक बदल घडवून आणू शकतात का?’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते.

ह्या विषयावर बारकाईने अभ्यास आणि ऐतिहासिक विश्लेषण आवश्यक आहे कारण एनजीओ सामान्यत: लोकांमध्ये “उत्तम समाज कार्य” करत आहेत असे भासवत असते. चर्चा सत्राची सुरुवात एनजीओच्या संख्येमध्ये होत असलेल्या प्रचंड वाढीच्या काही आकडेवारीने झाली. संपूर्ण जगात एनजीओ ची संख्या एवढी आहे कि जर सर्व एनजीओ मिळून एक देश बनला तर तो जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. भारतातील एनजीओची संख्या एकूण असलेल्या शाळांच्या दुप्पट आणि सरकारी रुग्णालयांच्या 250 पट जास्त आहे. मग प्रश्न उद्भवतो की या गैर सरकारी संघटनांच्या स्फोटक प्रसारानंतर आणि त्यांच्या “उत्कृष्ट कार्यानंतर”, मानव विकास निर्देशांकाचा विचार करता भारत…

स्त्री मुक्ती लीग आणि नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे अगोरा फिल्मचे स्क्रीनिंग आणि चर्चासत्र

सावित्री फातिमा स्मृती संकल्प अभियानांतर्गत अगोरा ह्या सिनेमाचे स्क्रिनिंग करण्यात आले व त्यावर चर्चा केली गेली. सिनेमा अलेक्जेंड्रिया, मिस्र मधील एक महान तत्त्ववेत्ती, गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ हाइपेशियाची कहाणी सांगतो. चौथ्या शताब्दीच्या काळात मूर्तिपूजक पेगन धर्म आणि नव्याने उदय, प्रचार – प्रसार होत असलेल्या ख्रिश्चन धर्मामध्ये होत असलेल्या युद्धकाळात हाइपेशिया अंधविश्वास, अवैज्ञानिक आणि तर्कहीन विचार आणि पितृसत्तात्मक विचारांच्या विरोधात खंबीर पणे उभी राहिली. चर्चासत्रा दरम्यान कला आणि विज्ञानाच्या उगमाबद्दल, अंधविश्वास आणि अवैज्ञानिक विचारांच्या विरोधात लढण्या बद्दल आणि शिक्षण, वैज्ञानिक दृष्टीकोन आत्मसात करण्याच्या महत्वाबद्दल चर्चा झाली.

3 जानेवारी, सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने “नौजवान भारत सभा” तर्फे कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी नौभासचे साथी सिध्दार्थ यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्याबद्दलची मांडणी करत कार्यक्रमाची सुरुवात केली. साथी सिध्दार्थ यांनी मांडले की, सावित्रीबाई फुले यांनी ब्राह्मण्यवाद्यांशी संघर्ष करत दगड, माती, शेणाचा मारा अंगावर खात न डगमगता 1 जानेवारी 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा पुण्याच्या भिडे वाड्यात सुरू केली. त्यासोबतच सावित्रीबाईंनी बालविवाह प्रथा, केशवपन तसेच सती प्रथा बंद व्हाव्यात यासाठी कार्य केले व बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. त्यांनतर साथी स्वप्नजा यांनी आजच्या शिक्षणाच्या परिस्थितीबद्दल मांडणी केली. साथी स्वप्नजाने सांगितले की शिक्षणाचे बाजारीकरण झाल्यामुळे ज्यांच्या खिशात पैसे आहे तेच शिक्षण घेऊ शकतात यामुळे सामान्य जनतेची, गरिबांची…

आज़ाद स्पोर्ट्स क्लब नौजवान भारत सभा द्वारा संचालित शिक्षा सहायता केन्द्र के बच्चों के साथ फुटबॉल खेला गया।

आज़ाद स्पोर्ट्स क्लब नौजवान भारत सभा द्वारा संचालित शिक्षा सहायता केन्द्र के बच्चों के साथ फुटबॉल खेला गया। आज़ाद स्पोर्ट्स क्लब के तहत हम लोग पहले भी क्रिकेट और बैडमिंटन खेलते थे जो कुछ दिनों से बंद था फिलहाल अभी लगातार खेलेंगे। खेलना स्वास्थ्य के लिए लाभदायक होता है। खेल सभी के लिए शारीरिक व मानसिक रूप से लाभप्रद होता है। पर आज के मुनाफे की व्यवस्था ने हम बच्चों की खुशियां भी छीन ली है हम खेलने निकले तो एक भी खेलने लायक खेल मैदान नहीं था अंत में…

नौभास, पुणे तर्फे नवीन शिक्षण धोरण (NEP) यावर चर्चासत्र आयोजित

सतत होत असलेले शिक्षणाचे खाजगीकरण आणि मोदी सरकारचे विद्यार्थी विरोधी नवीन शिक्षण धोरण (NEP) यावर नौजवान भारत सभेकडून आज (रविवारी) शहीद भगतसिंह वाचनालय, दांडेकर पूल येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले. चर्चासत्रामध्ये नौजवान भारत सभा आणि दिशा विद्यार्थी संघटनेकडून या धोरणाविरोधात काढण्यात आलेल्या संयुक्त पत्रकाचे व NEP वरील दिशा विद्यार्थी संघटनेच्या भूमिकेचे वाचन करण्यात आले. सहभागी साथींनी वेगवेगळ्या मुद्द्यांच्या वेगवेगळ्या आयामांवर भूमिका मांडल्या. साथी अरुणने मांडले की आजचे शिक्षण हे कशाप्रकारे भांडवली चाकर घडवण्याचे काम करत आहे आणि एकंदरीत आजच्या व्यवस्थेच्या संकटाच्या काळात जेव्हा की महागाई, बेरोजगारी, आर्थिक विषमता यांसारख्या प्रश्नांनी…

केंद्र शासनाकडून फेलोशिप बंद केल्याविरोधात अभियान

केंद्र शासनाकडून गेल्या 8 डिसेंबरला आणखी एक विद्यार्थी विरोधी धोरणाला लागू करण्याची घोषणा करण्यात आली. माजी शिक्षण मंत्री स्मृती इराणीने मौलाना अब्दुल नॅशनल फेलोशिप (MANF) बंद करण्याची घोषणा केली. केंद्र सरकारच्या या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात आज आझम कॅम्पस मध्ये आणि “नौजवान भारत सभा” आणि “दिशा विद्यार्थी संघटना” या संघटनांतर्फे एकत्रितपणे अभियान करण्यात आले. ही शिष्यवृत्ती एम. फिल आणि पीएचडी साठी गरीब पार्श्वभूमीतून येणाऱ्या त्या शोधकर्त्यांसाठी होती जी या सहा अल्पसंख्यांक समूहातून येतात – मुस्लिम, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, सिख, पारशी व जैन. आधीच शिष्यवृत्तीचा लाभ अतिशय थोड्या विद्यार्थ्यांना मिळत होता. MANF योजनेला…