3 जानेवारी, सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने “नौजवान भारत सभा” तर्फे कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी नौभासचे साथी सिध्दार्थ यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्याबद्दलची मांडणी करत कार्यक्रमाची सुरुवात केली. साथी सिध्दार्थ यांनी मांडले की, सावित्रीबाई फुले यांनी ब्राह्मण्यवाद्यांशी संघर्ष करत दगड, माती, शेणाचा मारा अंगावर खात न डगमगता 1 जानेवारी 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा पुण्याच्या भिडे वाड्यात सुरू केली. त्यासोबतच सावित्रीबाईंनी बालविवाह प्रथा, केशवपन तसेच सती प्रथा बंद व्हाव्यात यासाठी कार्य केले व बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. त्यांनतर साथी स्वप्नजा यांनी आजच्या शिक्षणाच्या परिस्थितीबद्दल मांडणी केली. साथी स्वप्नजाने सांगितले की शिक्षणाचे बाजारीकरण झाल्यामुळे ज्यांच्या खिशात पैसे आहे तेच शिक्षण घेऊ शकतात यामुळे सामान्य जनतेची, गरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहतात. भांडवलशाहीने नव्याने कामगार-कष्टकऱ्यांवर नव्याने ज्ञानबंदी लादली आहे. साथी स्वरूपने सावित्रीबाईंच्या वारशाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. साथी नेहाने मांडले की आज स्वातंत्र्याला 75 वर्षे झाले तरीही देशातील कामगार कष्टकरी जनतेची, गरिबांची परिस्थिती काही बदललेली नाही. बेरोजगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे, शिक्षणाचे दरवाजे पैसेवाल्यांसाठीच खुले आहेत. साक्षरतेचे प्रमाण फक्त 64% आसपासच पोहचले आहे, आज पुन्हा कामगार कष्टकऱ्यांसाठी नव्याने ज्ञान बंदी लादली आहे. आजच्या प्रसंगी सावित्रीबाईंची आठवण करत असताना त्यांनी सुरू केलेला संघर्ष आपण कुठपर्यंत पुढे आणला आहे याचा विचार करावा लागेल, त्यांच्या संघर्षपूर्ण आयुष्याला क्रांतिकारी अभिवादन करत सर्वांना मोफत शिक्षण, सर्वांना काम या मागण्यांभोवती आजच्या तरुणांना संघटित व्हावे लागेल. शिक्षा हैं सबका अधिकार, बन्द करो इसका व्यापार! पितृसत्ता मुर्दाबाद! जाति व्यवस्था मुर्दाबाद! इंकलाब झिंदाबाद! नौजवान भारत सभा संपर्क: सुस्मित 8329869421 नेहा 77698 58775 इंस्टाग्राम: www.instagram.com/nbsmaha फेसबुक: www.facebook.com/nbsmaha

Related posts

Leave a Comment

8 − 1 =