केंद्र शासनाकडून गेल्या 8 डिसेंबरला आणखी एक विद्यार्थी विरोधी धोरणाला लागू करण्याची घोषणा करण्यात आली. माजी शिक्षण मंत्री स्मृती इराणीने मौलाना अब्दुल नॅशनल फेलोशिप (MANF) बंद करण्याची घोषणा केली. केंद्र सरकारच्या या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात आज आझम कॅम्पस मध्ये आणि “नौजवान भारत सभा” आणि “दिशा विद्यार्थी संघटना” या संघटनांतर्फे एकत्रितपणे अभियान करण्यात आले. ही शिष्यवृत्ती एम. फिल आणि पीएचडी साठी गरीब पार्श्वभूमीतून येणाऱ्या त्या शोधकर्त्यांसाठी होती जी या सहा अल्पसंख्यांक समूहातून येतात – मुस्लिम, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, सिख, पारशी व जैन. आधीच शिष्यवृत्तीचा लाभ अतिशय थोड्या विद्यार्थ्यांना मिळत होता.

MANF योजनेला बंद करणे हे शिक्षणावर होत असलेल्या फॅसिस्ट हल्ल्याचे नवीन उदाहरण आहे.2014 नंतर या हल्ल्यांची सततता सातत्याने वाढली आहे. 2014-15 आणि 2019-’20 च्या दरम्यान एकूण केंद्रीय बजेट मध्ये शिक्षणावर होत असलेल्या खर्चाचा हिस्सा 4.1 वरून 3.4 वर घसरला आहे. शिष्यवृत्तीसाठीच्या रकमेतील कपातीमुळे लाभार्थी विद्यार्थ्यांच्या संख्येत झालेली घट स्पष्ट पाहायला मिळू शकते. एवढेच नाही तर मोदी सरकार ने प्री-मॅट्रिक स्कॉलरशिप पण संपवली आहे. आधीच शिक्षण संस्थांमध्ये होणारी फी वाढ, जागा कपात यामुळे सामान्य घरांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक मोठा हिस्सा शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहण्यासाठी बाध्य झाला आहे.
MANF योजना बंद केल्यामुळे अल्पसंख्यांक समूहांतून येणारे अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी उच्च शिक्षणापासून वंचित राहतील. नौजवान भारत सभा या निर्णयाचा जोरदार निषेध करते. आम्ही MANF योजनेच्या पुनःबहालीसाठी आणि शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या विरोधात प्रत्येक विद्यार्थी तरुणाला आवाहन करतो की पुढे या आणि विद्यार्थीविरोधी धोरणाविरोधात आपला आवाज बुलंद करा.
या अभियानामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रतिसाद चांगला होता. बऱ्याच तरुणांनी MANF योजना बंद करण्याच्या विरोधात विद्यार्थी तरुणांनी संघटित होण्याबद्दल सहमती दर्शवली. यासोबतच तरुणांमधील शासन व्यवस्थेच्या विरोधात असलेला असंतोषही मोठ्या प्रमाणात त्यांच्या बोलण्यातून दिसत होता आणि हे जिवंत असण्याचे द्योतक आहे. अनेक विद्यार्थ्यांनी संघटनेमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि सहयोग सुद्धा दिला.
शिक्षण आहे सर्वांचा अधिकार!
त्याचा बंद करा व्यापार!!
मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप बहाल करा!!
