महाराष्ट्रातील दलितांवर अन्याय अत्याचारांच्या घटनांचा विरोध करा! जातिव्यवस्थे विरोधात आवाज बुलंद करा!

जातीव्यवस्था आणि जातिगत अन्याय अत्याचार आपल्या समाजावरील एक घाणेरडा डाग आहे आणि हा डाग दिवसेंदिवस जास्तच दुर्गंधी पसरवत आहे. गेल्या 10 जूनला जळगाव येथील जामनेर तालुक्यात वाकडी गावांमध्ये दोन मातंग तरूणांना विहिरीत पोहल्याच्या कारणावरून फक्त बेदम मारलेच नाही तर नागडे करून पाहूर गावामध्ये फिरवत शेतात घेऊन गेले व व्हिडिओ बनवून व्हाट्सअप वर प्रसारित देखील करण्यात आला.

तरुणांना आवाहन / पीटर क्रोपोतकिन

मला माहीतीये, तुमच्‍या मनातला पहीला प्रश्‍न जो तुम्‍ही वारंवार स्‍वत:लाही विचारलेला आहे, अन् तो म्हणजे, “मी काय व्‍हायला पाहीजे?” खरंतर तारुण्‍यांत माण्‍सं असा विचार करतात की एखादी विद्या वा विज्ञानाचा अभ्‍यास केल्‍यानंतर, जे समाजाच्‍या योगदानांमुळं शक्य होतं, आपण आपली बुद्धी, आपली क्षमता आणि आपल्‍या ज्ञानाचा उपयोग अशा लोकांच्या अधिकारासाठी करायला हवा, जे आज विपन्नावस्‍थेत, दु:खांत आणि अज्ञानांत खितपत पडलेत. त्याच्यासाठी शिक्षण, नुस्तं कमाईच्‍या जोरावर आपल्‍या व्‍यक्‍तीगत लाभासाठी लूटीच्‍या हत्‍यारासारखा वापर करण्‍यांसाठी नक्‍कीच नसतं. मग जर कुणी असा विचार करत नसेल तर नक्‍कीच त्‍यांचा मेंदू विकृतीनें ग्रस्‍त आहे किंवा व्‍यसनांनी त्‍याला वेडा बनवलं असणार.

खूनी वेदांता, खूनी विकास! तुतिकोरिन (तुतुकुडी) येथील गोळीबाराची घटना आपल्या मानवीय अस्तित्वाला आव्हान आहे!

वेदांता ही लंडन मध्ये स्थित असलेली बहुराष्ट्रीय कंपनी आहे आणि प्रदूषण करण्यासाठी जगभरात कुख्यात आहे. या कंपनी विरोधात हवा, पाणी आणि आसपासचे वातावरण प्रदूषित करण्याविरोधात झांबिया देशातील 2000 गावांनी सुध्दा केस ठोकली आहे. गोळीबारात मेलेले आणि प्रदूषणाने मेलेले सर्व लोक भारतीयच होते, पण त्यांच्यासाठी आता भाजपाई आणि संघी लोकांना भारतमाता आठवणार नाही कारण वेदांताची ‘देणगी’ यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे.

बलात्काऱ्यांच्या समर्थनात आंदोलने: न्यायाची नवीन संघी, भाजपाई व्याख्या!

भाजप अशा एका पक्षाच्या रुपात समोर आली आहे जिच्यामध्ये सर्व पक्षांमधील गुंड, मवाली, हत्यारे आणि बलात्कारी येऊन शरण घेत आहेत. या देशाचे प्रधान सेवक उर्फ चौकीदाराने नुकतेच आपली छप्पन इंचाची छाती फुलवत म्हटले आहे की कमळाचे फूल देशात सगळीकडे पसरत आहे पण खरेतर हे फूल महिला, दलित, अल्पसंख्यांक आणि मजूरांच्या रक्ताने सिंचित आहे. एका बाजूला भयंकर बेरोजगारी आणि दुसरीकडे अशा घटना दाखवतात की सर्व देशामध्ये फासीवादाचे संकट गडद होत आहे. गोरक्षा, लव्ह-जिहाद, भारत माता की जय, राम मंदिराचे फासीवादी राजकारण फक्त आणि फक्त सामान्य जनतेला विभागण्यासाठी आणि आपापसात लढवण्यासाठी केले जात आहे. त्यांची देशाची व्याख्या म्हणजे फक्त कागदावर बनलेला एक नकाशा आहे. वाढत्या निरंकुश स्त्री-विरोधी अपराधांवरून हे जाहीर आहे की संघी लोकांच्या देशाच्या व्याख्येमध्ये महिलांचे स्थान फक्त एका भोगवस्तूचे आहे. भांडवली व्यवस्था आणि पितृसत्तेमुळे आपला समाज ज्या स्त्री विरोधी मानसिकतेने ग्रसित आहे, त्याच्यामुळे फासीवादाच्या या काळात स्त्रियांवर हल्ले अजूनच पाशवी आणि कृर होत चालले आहेत.

जनतेसाठी बनवलेल्या कायद्यांना दुरुपयोगाच्या बहाण्याने कमजोर करण्याचे षडयंत्र ओळखा

देशातील कायदे दोन प्रकारचे असतात. एक ते कायदे जे देशातील जनतेच्या एका घटकाच्या किंवा सर्व घटकांच्या हक्क अधिकाराशी संबंधित असतात. (उदाहरणार्थ महिलांवरील अत्याचाराविरुद्ध बनलेले कायदे, मजुरांच्या हक्क अधिकारांसाठी बनलेले कायदे, दलितांवरील अत्याचार थांबवण्यासाठी बनवलेले कायदे) आणि दुसरे ते कायदे असतात जे जनतेचे दमन-शोषण करण्यासाठी सरकार आणि प्रशासनाला ताकद देतात. (जसे पोलिसांना एन्काऊंटर करण्याची सूट देणे, फौजेला काही भागांमध्ये विशेषाधिकार देऊन एन्काऊंटर आणि अटक करण्याची परवानगी देणे). आपल्या देशातील सरकार मग ते काँग्रेसचे असो किंवा भाजपचे, अगदी स्पष्टपणे भांडवलदारांच्या हितांचे प्रतिनिधित्व करते. त्यांच्या हितासाठी एका बाजूला ही सरकारे मजुरांच्या अधिकारांना सतत कमी करत आहे आणि दुसरीकडे सरकारचे दमन करण्याचे अधिकार वाढवत आहे.

सामाजिक शांतता व सौहार्द जपा , खरा शत्रू ओळखा .

मित्रांनो, सावध रहा, सांप्रदायिक, धर्मांध शक्‍ती देश, देव व धर्मांच्‍या नावाखाली आपली माथी भडकवायला येतील, त्‍यांना तिथचं रोखा. आपल्‍या आजच्‍या दारिद्रयाला आरक्षण, अट्रोसिटी एक्‍ट, विशिष्‍ट जात-उपजात, एक विशिष्ट धर्म जबाबदार आहे असां खोटा प्रचार करतील, बळी पडू नका. कधी परप्रांतीय म्‍हणून, कधी परका म्‍हणून काबाडकष्‍ट करणाऱ्यांमध्‍ये बेकी निर्माण करतील, फसू नका. हे पक्‍कं लक्षात ठेवा — आपल्‍या दु:ख, दारिद्र व दैन्याच्‍या मुळाशी भांडवलशाही व्‍यवस्‍थेचं अर्थशास्‍त्र आहे. नफ्याचं आणि राजकीय सत्तेचं समिकरण आहे. अस्मितेचे राजकारण हे नेहमीच आपल्या खऱ्या प्रश्नांच्या लढाईला कमजोर करत असते. हे विसरले नाही पाहिजे की आज जे धार्मिक-जातीय विद्वेषाचे वातावरण तयार केले जात आहे तो देशातील भांडवलदार वर्गाचा पाठिंबा असलेल्या जातीयवादी शक्तींचा खेळ आहे. हा पाठिंबा आहे म्हणूनच या जातीयवादी शक्तींमध्ये इतकी हिंमत आली आहे.

देशभर वाढत्‍या दलित विरोधी अत्‍याचारा विरुद्ध सर्व कष्‍टकऱ्यांनो एक व्‍हा

सवर्णवादी वर्चस्‍वाच्‍या या घृणास्‍पद पाशवी रूपाचा सामना गरीब, कष्‍टकरी दलितांनाच करावा लागतो आहे. जरी जातीगत अपमानाला दलित नोकरशहा, नेता व इतर उच्‍चवर्गीय दलितांनाही सामोर जावं लागत असले,तरी जातीगत उत्‍पीडनाच्‍या अशा पाशवी घटना प्रामुख्‍याने कष्‍टकरी दलितांच्‍या विरोधातच घटत असतात. एकुण काय, जर आकडे गोळा केले तर दिसेल की जातीय अत्‍याचाराच्या १०० पैकी ९९ प्रकरणांमध्‍ये कष्‍टकरी गरीब दलितचाच बळी जातो.

भगतसिंहाच्या 110व्या जयंतीनिमित्त – शहीदांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी सज्ज व्हा!

संघ परिवार कोणत्यातरी बहाण्याने सतत मुसलमानांना हिंदूंचा शत्रू म्हणून प्रस्तुत करत असतो. संघ परिवाराची राजकीय संघटना असलेल्या भाजपचे सरकार एकीकडे श्रीमंतांच्या फायद्यासाठी जनतेला मिळत असलेल्या सुविधांमध्ये कपात करत चालली आहे, तर दुसरीकडे अनेक प्रकारच्या खोटारड्या मुद्यांवर जोर देत आहे जेणेकरून लोक आपापसात लढत रहावेत आणि यांच्या लूटीवर  प्रश्नच उपस्थित होऊ नये. तरूणांना या विरुद्ध उठावेच लागेल नाहीतर देश भयंकर विध्वंसाकडे चालू लागला आहे. जनतेला हे समजवावेच लागेल की त्यांच्या बरबादीचे कारण एखादा दुसरा देश किंवा धर्म नाही तर लूट आणि अन्यायावर टिकलेली आजची व्यवस्था आहे.

भगतसिंह – हिंदुस्‍तान सोशालिस्‍ट रिपब्लिकन असोसिएशनचा जाहीरनामा

भारतीय भांडवलदारवर्ग आपल्‍याच जनतेचा विश्‍वासघात करून त्‍याच्‍या मोबदल्‍यात परकीय भांडवलदारांकडून  सरकारात काही फुटकळ वाटा मिळवण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहे. म्‍हणूनच कष्‍टकरी वर्गाच्‍या सर्व आशा आता समाजवादावर केंद्रीत झाल्‍या आहेत. त्‍यातूनच संपूर्ण स्‍वातंत्र्य मिळवण्‍याच्‍या, सर्व भेदभाव व विशेषाधिकार नष्‍ट करण्‍याच्‍या दिशेने यशस्‍वी वाटचाल करता येणार आहे. देशाचे भवितव्‍य आता तरुणांच्‍या खांद्यावर आहे. तेच या धरतीचे सुपुत्र आहेत. हालअपेष्‍टा सहन करण्‍याची त्‍यांची तयारी, त्‍यांचे निडर शौर्य आणि आत्‍मबलिदानाची उसळती भावना हेच सांगतात, की भारताचे भवितव्‍य त्‍यांच्‍या हाती सुरक्षित आहे. एका अनुभूतीपूर्ण क्षणी देशबंधू दास म्‍हणाले होते की, “युवक हे भारतमातेचा मानबिंदू आणि आशास्‍थान दोन्‍ही आहेत. या आंदोलनाच्‍या मागे त्‍यांची प्रेरणा, त्‍यांचे बलिदान आणि त्‍यांचा विजय आहे. हाती मशाल घेऊन स्‍वातंत्र्याच्‍या मार्गावर निघालेले आघाडीचे सैनिक हेच आहेत. ते मुक्‍तीच्‍या मार्गावरील तीर्थयात्री आहेत.”

भगतसिंह – बॉॅम्‍बचे तत्‍तवज्ञान

हिंसा या शब्दाचा अर्थ आहे, अन्यायासाठी केला गेलेला बलप्रयोग. परंतु क्रांतिकारकांचा तर हा मुळीच उद्देश नाही. दुसऱ्या बाजूला अहिंसेचा सामान्यतः जो अर्थ समजला जातो, तो म्हणजे आत्मिक शक्तीचा सिद्धांत. त्याचा उपयोग व्यक्तिगत तसेच राष्ट्रीय अधिकार मिळवण्यासाठी केला जातो. आत्मक्लेशाद्वारे शेवटी आपल्या विरोधकाचे हृदय परिवर्तन होऊ शकेल अशी अपेक्षा ठेवली जाते.