बलात्काऱ्यांच्या समर्थनात आंदोलने: न्यायाची नवीन संघी, भाजपाई व्याख्या!

बलात्काऱ्यांच्या समर्थनात आंदोलने: न्यायाची नवीन संघी, भाजपाई व्याख्या!
देशातील महिलांवरील वाढत्या अपरांधांविरोधात एकजूट व्हा!
फासीवाद नष्ट करा! पितृसत्ता मुर्दाबाद ! संघी गुंड मुर्दाबाद!
मार्ग मुक्तीचा घडवावा लागेल, जगायचं तर लढावं लागेल!

साथींनो, गेल्या काही दिवसांमध्ये बलात्काराच्या दोन अत्यंत निंदनीय घटना समोर आल्या आहेत. कठुआ, जम्मु-काश्मिर येथे आठ वर्षांच्या मुलीवर सहा लोकांनी सात दिवस सामुहिक बलात्कार केला आणि नंतर तीची हत्या करण्यात आली. पोलिसांनी सुद्धा या कामात बलात्काऱ्यांना साथ दिली. उन्नाव, उत्तर प्रदेश येथे भाजपचे आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून एका महिलेचा बलात्कार केला आणि विरोध केला म्हणून तिच्या वडिलांना मारहाण करून ठार मारले. पीडीत महिलेच्या वडीलांना मारण्यात पोलिसांनीही मदत केली. या घटनांना ऐकून कोणताही न्यायप्रिय आणि मानवतावादी व्यक्ती हादरून जाईल आणि पीडीतांसाठी न्यायाची मागणी करेल. पण आज देशात असे लोक निर्माण झाले आहेत जे बलात्काऱ्यांच्या समर्थनात मोर्चे काढत आहेत. याशिवाय, उत्तरप्रदेशातील भाजपचे योगी सरकार माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्या विरोधात 2011 साली दाखल झालेल्या बलात्काराच्या खटल्याला मागे घेत आहे. या सर्व घटनांमधून स्पष्ट आहे की ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘बहुत हुआ नारी पर वार, अबकी बार मोदी सरकार’ अशा घोषणा देणाऱ्या मोदी सरकारच्या ‘अच्छे दिन’च्या राज्यात महिलांसाठी कोणतीही जागा नाहीय़े. भाजप आणि आरएसएसच्या महिला विरोधी चरित्राला दाखवण्यासाठी हेच एक तथ्य पुरेसे आहे की या दोन्ही घटनांमध्ये ते बेशरमपणे बलात्काराच्या आरोपींसाठी आंदोलन करत आहेत. भारताच्या इतिहासातील ही पहिली घटना असेल की कोणी बलात्काराच्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी नाही, तर त्यांना वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत.

बलात्काऱ्यांच्या समर्थनात आंदोलने

कदाचित तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये वाचले असेल की जम्मुच्या कठुआ जिल्ह्यामध्ये आसिफाचे अपहरण करून तिला एका देवस्थानात कैद केले गेले व तिथे तिच्यासोबत सतत बलात्कार करण्यात आला. बलात्कार करणाऱ्यांमध्ये मंदिराच्या पुजाऱ्यासोबत पोलिस सुद्धा सामील झाले. त्या लहान निष्पाप मुलीसोबत जे काही झाले त्यानंतर कोणताही न्यायप्रिय व्यक्ती असा निर्घृण अपराध करणाऱ्या हैवानांना सर्वात कडक शिक्षेचीच मागणी करेल. पण हिंदू एकता मंचाच्या बॅनरखाली जेव्हा बलात्काऱ्यांविरोधात चार्जशीट दाखल होऊ नये म्हणून त्यांच्या समर्थनात आंदोलन केले जाते तेव्हा सर्व हद्दी ओलांडल्या गेल्या आहेत असेच म्हणावे लागेल. आंदोलनात अतिशय बेशरमपणे बलात्काऱ्यांच्या समर्थनात ‘जय श्रीराम’चे नारे लावले गेले. हे नारे लावणाऱ्यांमध्ये संघी गुंड आणि वकिलांसोबतच महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्याच्या बाता मारणाऱ्या मोदी सरकारचे राज्य वन मंत्री चौधरी लाल सिंह आणि व्यापार व उद्योग मंत्री चंद्र प्रकाश गंगा सुद्धा सामील होते. कठुआ बलात्कार प्रकरणात दोषींना शिक्षा देणे तर दूरच, मोदी सरकारचे हे पाईक त्यांच्या समर्थनात हातात तिरंगा घेऊन रस्त्यावर उन्माद करत आहेत.
जम्मू मध्ये जे काही होत आहे, त्यापेक्षा उत्तर प्रदेशच्या उन्नाव मधील स्थिती काही वेगळी नाही. 18 वर्षीय एक युवती, भाजपचे आमदार कुलदिप सिंह सैगर आणि त्यांच्या भावाने बलात्कार केल्यानंतर, न्यायासाठी दारोदार भटकत आहे. प्रत्येक ठिकाणी न्यायाची मागणी केल्यावरही न्याय न मिळाल्यावर त्रस्त होऊन त्या मुलीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्मदाह करण्याचा प्रयत्न केला. पण यानंतरही सरकार ढिम्म हलले नाही आणि बलात्कारी आमदार व त्यांच्या भावाविरोधत कोणतीही कारवाई केली नाही. उलट बलात्कारीत महिलेच्या वडिलांनाच पोलिसांनी अटक केली आणि मुलीसाठी न्यायाची मागणी करणाऱ्या त्या पित्याला इतक्या निर्दयपणे मारहाण केली की त्यांचा मृत्यू झाला. उन्नाव बलात्कार पिडीत महिलेच्या वडिल्यांच्या हत्येला जबाबदार सुद्धा योगी-मोदी सरकारच आहे. मरण्याअगोदर पीडीत महिलेच्या वडिलांचे निवेदन सोशल मीडीयावर व्हिडीओच्या स्वरूपात उपलब्ध आहे ज्यात ते साफ म्हणत आहेत की सैगर यांच्या भावाने आणि पोलिसांनी त्यांना किती निर्दयपणे मारहाण केली. पण न्याय गायब आहे. या हत्या आणि बलात्काराच्या घटनेनंतर इतक्या दिवसांनंतरही 12 एप्रिल रोजी कुलदिप सिंह सैगर यांच्या विरोधात फक्त एफ.आय.आर. दाखल केला आहे, अजून अटक केलेली नाही. या सर्व घटनांमध्ये पीडीत महिलेचा काहीच पत्ता नाही.
मित्रहो, गेल्या काही काळात भाजप अशा एका पक्षाच्या रुपात समोर आली आहे जिच्यामध्ये सर्व पक्षांमधील गुंड, मवाली, हत्यारे आणि बलात्कारी येऊन शरण घेत आहेत. या देशाचे प्रधान सेवक उर्फ चौकीदाराने नुकतेच आपली छप्पन इंचाची छाती फुलवत म्हटले आहे की कमळाचे फूल देशात सगळीकडे पसरत आहे पण खरेतर हे फूल महिला, दलित, अल्पसंख्यांक आणि मजूरांच्या रक्ताने सिंचित आहे. एका बाजूला भयंकर बेरोजगारी आणि दुसरीकडे अशा घटना दाखवतात की सर्व देशामध्ये फासीवादाचे संकट गडद होत आहे. गोरक्षा, लव्ह-जिहाद, भारत माता की जय, राम मंदिराचे फासीवादी राजकारण फक्त आणि फक्त सामान्य जनतेला विभागण्यासाठी आणि आपापसात लढवण्यासाठी केले जात आहे. त्यांची देशाची व्याख्या म्हणजे फक्त कागदावर बनलेला एक नकाशा आहे. वाढत्या निरंकुश स्त्री-विरोधी अपराधांवरून हे जाहीर आहे की संघी लोकांच्या देशाच्या व्याख्येमध्ये महिलांचे स्थान फक्त एका भोगवस्तूचे आहे. भांडवली व्यवस्था आणि पितृसत्तेमुळे आपला समाज ज्या स्त्री विरोधी मानसिकतेने ग्रसित आहे, त्याच्यामुळे फासीवादाच्या या काळात स्त्रियांवर हल्ले अजूनच पाशवी आणि कृर होत चालले आहेत.
इतके सगळे होऊनही जर या देशातील न्यायप्रिय आणि तर्कसंगत लोकांनी भाजपच्या बलात्कारी, दंगलखोर, भ्रष्टाचारी आणि चोरांच्या विरोधात आवाज उठवला नाही तर येणारा काळा यापेक्षाही जास्त अंधकारमय सिद्ध होईल. हे लक्षात घ्या की हेच फासीवादी सरकार एका बाजूला मजुरांचे, दलितांचे संरक्षण करणारे कायदे शिथील करत आहे तर दुसरीकडे अपराध्यांना संरक्षण देत आहे. अशा वेळी जाती-पातीमध्ये न विभागता एकजूट होऊन विरोध करण्याची गरज आहे. या अंधकारमय वेळी आम्ही आवाहन करत आहोत की देशामध्ये वाढणारे स्त्री-विरोधी अपराध आणि शोषितांच्या अधिकारांवर होत असलेल्या फासीवादी हल्याविरोधात वेळीच एकजूट व्हा. लढाई मोठी आहे आणि आज लढणे चालू नाही केले तर खूप उशीर होईल.

 नौजवान भारत सभा  दिशा विद्यार्थी संघटना  बिगुल मजदूर दस्ता
संपर्क: – 9619039793, 9145332849

फेसबुक पेज www.facebook.com/mazdoorbigul, www.facebook.com/naujavanbharatsabha
वेबसाइट www.mazdoorbigul.net, www.naubhas.in

Related posts

Leave a Comment

four × five =