मनुस्मृति दहन (25 दिसम्बर, 1927) की 92 वीं वर्षगाँठ पर जाति उन्मूलन आन्दोलन को प्रतीकवाद, सुधारवाद और अर्जियाँ देने से आगे ले जाने का संकल्प लो! नौजवान भारत सभा अखिल भारतीय जाति-विरोधी मंच, महाराष्ट्र द्वारा जारी परचा। आज से 89 वर्ष पहले महाड़ में मेहनतकश दलितों ने एक बग़ावत शुरू की थी। इसकी शुरुआत 19-20 मार्च 1927 को बहिष्कृत सम्मेलन से हुई थी। लेकिन वास्तव में इस सम्मेलन का विचार आर बी मोरे ने मई 1924 में पेश किया, जिन्हें बाद में कॉमरेड आर बी मोरे के नाम से जाना…
काकोरी कटातील शहीद रामप्रसाद बिस्मिल, अशफ़ाक़उल्ला ख़ाँ, रोशन सिंह आणि राजेन्द्रनाथ लाहिरी यांच्या स्मृति दिनानिमित्त प्रभात फेरी
__________________ काकोरी कटातील शहीद रामप्रसाद बिस्मिल, अशफ़ाक़उल्ला ख़ाँ, रोशन सिंह आणि राजेन्द्रनाथ लाहिरी यांच्या स्मृति दिनानिमित्त प्रभात फेरी शहीदांचा वारसा जिंदाबाद शहीदांनी दिला आवाज बदला बदला देश समाज जाती धर्माचे झगडे सोडा खऱ्या लढाईशी नाते जोडा अशफ़ाक़-बिस्मिल का संदेश हिंदु-मुस्लिम सबका देश काकोरी कटातील शहीद अमर रहे इंकलाब जिंदाबाद १७ डिसेंबर व १९ डिसेंबर १९२७ साली स्वातंत्र्य लढ्यासाठी रामप्रसाद बिस्मिल, अशफ़ाक़उल्ला ख़ाँ, रोशन सिंह आणि राजेन्द्रनाथ लाहिरी हे चार शूर क्रांतिकारक फासावर चढले. या घटनेला आता ९३ वर्ष उलटून गेली आहेत. यां शहीदांच्या स्मृति दिनानिमित्त नौजवान भारत सभा, पुणे द्वारे…
शिक्षण सहाय्यता केंद्राची सुरुवात
नौजवान भारत सभा द्वारे संचालित शिक्षण सहाय्यता केंद्राची सुरुवात 12 डिसेंबर पासून दांडेकर पूल सर्वे नंबर 133 मध्ये करण्यात आली. कामगार वर्गातील मूला-मुलींच्या शिक्षणाची स्थिती आपल्याला माहीतच आहे. या भांडवली शिक्षण व्यवस्थेने कामगार वर्गातील विद्यार्थ्यांना कायमच शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. ज्या थोड्या बहुत सरकारी शाळा आहेत त्या सुद्धा वाईट अवस्थेत आहेत. कोरोना महामारी मुळे शिक्षणाची स्थिती अजूनच वाईट बनली आहे. सर्व ठिकाणी ऑनलाइन वर्ग घेण्यावर जोर दिला जात आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी लागणारी संसाधने मात्र सरकार द्यायला तयार नाही. अशात कामगार कष्टकरी वर्गातील मुला-मुलींसाठी शिक्षण घेणे अशक्य बनले आहे. वस्त्यांमध्ये राहणाऱ्या…
‘चंद्रशेखर आझाद स्पोर्ट्स क्लब’
नौजवान भारत सभा, पुणे द्वारे संचालित ‘चंद्रशेखर आझाद स्पोर्ट्स क्लब’ कडून पुन्हा विद्यार्थी व तरुण-तरुणींसाठी व्यायाम आणि खेळांचा सराव सुरू करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळामध्ये बंद असलेला स्पोर्ट्स क्लब आज दिनांक 05/12/2020 रोजी पासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. आज सर्व्हे न. 133 वस्तीतील विद्यार्थ्यांनी क्लब मध्ये फुटबॉलचा सराव सुरू केला. खेळून झाल्यानंतर क्लबमध्ये सहभागी झालेले नवीन खेळाडूंना क्लब व नौभास ची थोडक्यात माहिती देण्यात आली. विद्यार्थी, युवकांचा सर्वांगीण विकास घडण्यासाठी संधीची, योग्य वातावरणाची, पोषक आहाराची व वेगवेगळ्या सांस्कृतिक माध्यमांची गरज असते. परंतु देशातील बहुसंख्य कष्टकरी-कामगारांच्या मुलांना आपल्या बौद्धिक, सांस्कृतिक व…
जनसहयोगासाठी आवाहन
नौजवान भारत सभा (नौभास), पुणे तर्फे फिरते वाचनालय संचालित जनसहयोगासाठी आवाहन साथींनो, पुणे शहरातील विविध वस्त्यांमध्ये राहणाऱ्या कष्टकरी-कामगार वर्गापर्यंत ज्ञानाचा वारसा पोहोचवण्यासाठी नौजवान भारत सभा फिरते वाचनालय गेल्या 2 महिन्यांपासून चालवत आहे. याचा भाग म्हणून नौभासचे साथी झोळीमध्ये पुस्तके घेऊन दारोदारी जातात आणि जनतेला पुस्तके उपलब्ध करुन देतात. अपेक्षेपेक्षा अत्यंत चांगला प्रतिसाद या वाचनालयाला मिळत आहे आणि अनेक पुस्तकांची मागणी लोकांकडून येत आहेत. नौभासचे संपूर्ण काम फक्त जनसहयोगातूनच चालते. आंबिलओढा परिसरातील वाचनालय सुद्धा आपल्या सहयोगातूनच सुरू होऊ शकले. सध्या फिरत्या वाचनालयाकरिता जास्तीत जास्त पुस्तके घेण्याचा प्रयत्न आहे. आम्ही आपणास आवाहन…
गोवंडी-मानखुर्द (मुंबई) येथील रफीक नगर, गौतम नगर भागांत नौजवान भारत सभेतर्फे राशन वाटप
गोवंडी-मानखुर्द (मुंबई) येथील रफीक नगर, गौतम नगर भागांत नौजवान भारत सभेतर्फे राशन वाटप कोरोनामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका देशभरातील कामगार-कष्टकरी जनतेला बसला आहे. हाताला काम नाही आणि महागाई दिवसेंदिवस नवीन उंची गाठत आहे. अश्या परिस्थितीत रोजंदारीवर काम करणाऱ्यांपासून ते छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या जनतेला एका वेळचे जेवण देखील अशक्यप्राय झाले आहे. साथीचा आजार व कोलमडलेले आर्थिक समीकरण यांमुळे त्रस्त असणाऱ्या कामगार कष्टकरी, गरीब जनतेप्रती असलेली जबाबदारी पूर्ण करण्यास *राज्यातील ठाकरे सरकार व केंद्रातील मोदी सरकार पूर्णतः अयशस्वी ठरले आहे. _ह्याच धर्तीवर नौजवान भारत सभेने ऐन टाळेबंदीच्या काळात स्थानिक कामगार कष्टकऱ्यांच्या…
पुस्तक प्रदर्शन
नौजवान भारत सभेकडून क्रांतिकारकांच्या विचारांच्या प्रचार प्रसारासाठी व प्रगतिशील साहित्य जनतेपर्यंत पोहोचावे म्हणून लावण्यात येत असणारे छोटेखानी पुस्तक प्रदर्शन काल संध्याकाळी, FC कॉलेज रोड ला लावण्यात आले, ज्याला विशेष करून विद्यार्थी व त रुणांचा नेहमीप्रमाणेच चांगला प्रतिसाद मिळाला.
हरियाणा सरकार : वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या फी मधील वाढ रद्द करा! विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरील हल्ला बंद करा! जनतेच्या औषध उपचाराच्या हक्कावरील हल्ला बंद करा!
हरियाणा सरकार : वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या फी मधील वाढ रद्द करा! विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरील हल्ला बंद करा! जनतेच्या औषध उपचाराच्या हक्कावरील हल्ला बंद करा! हरियाणात वैद्यकीय शिक्षणाच्या फी मध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. सरकारी कॉलेज व संस्थानांमध्ये एम. बी. बी. एस. म्हणजेच वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची फी जी 53000 रुपये होती ती आता वाढून 80000 रुपये झाली आहे. एवढेच नव्हे तर यात दरवर्षी 10 टक्के वाढ केली जाणार आहे. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश घेताना फी व्यतिरिक्त 10 लाखांचा बॉण्ड पण भरायचा आहे (फी वजा करून). म्हणजे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याची फी असेल 80000…
स्वातंत्र्यलढ्यातले शहीद क्रांतिकारक जतिंद्रनाथ दास यांच्या जन्मदिनी त्यांना क्रांतिकारक अभिवादन !
स्वातंत्र्यलढ्यातले शहीद क्रांतिकारक जतिंद्रनाथ दास यांच्या जन्मदिनी त्यांना क्रांतिकारक अभिवादन ! राष्ट्रीय चळवळीतील एका महान आदर्शासाठी आपले प्राण अर्पण करणारे क्रांतिकारक जतिंद्रनाथ दास (जतिन दा) यांचा आज जन्मदिवस आहे. क्रांतिकारक चळवळीत सामील होण्यापूर्वी जतिंद्रनाथ दास असहकार चळवळीत सक्रियपणे सहभागी झाले होते आणि त्यांनी अनेक तुरूंगयात्रा केल्या होत्या. जतिंद्रनाथ दास यांनी ‘द रेव्होल्यूशनरी’ आणि ‘पीला पर्चा’ या एच.आर.ए. च्या दोन महान कागदपत्रांच्या प्रकाशनाची व्यवस्था केली. ‘दि रिवोल्यूशनरी’ संपूर्ण देशभरात वितरित केले गेले होते याची जबाबदारी बंगालमध्ये जतिंद्रनाथ दास यांनी आपल्या साथीदारांसह घेतली. जतिंद्रनाथ दास हे संघटनेसाठी निधी आणि शस्त्रे जमा करण्यात…
लेखणीचे सैनिक गणेश शंकर विद्यार्थी यांच्या जन्मदिनानिमित्त (२६ ऑक्टोंबर)
लेखणीचे सैनिक गणेश शंकर विद्यार्थी यांच्या जन्मदिनानिमित्त (२६ ऑक्टोंबर) आजचा काळ असा काळ आहे जेव्हा फॅसिझमची काळी सावली समाजावर पसरलेली आहे, प्रत्येक उत्कृष्ट गोष्टीवर धूळ-राख टाकली जात आहे, मुक्त व स्वतंत्र विचारांचे दमन केले जात आहे, जनपक्षधर बुद्धिजीवी-विचारवंतांवर हल्ले केले जात आहे. अशा काळात गणेश शंकर विद्यार्थींसारख्या लेखणीच्या खरा सैनिकाच्या स्मृती जागवणे अधिक महत्त्वाचे बनले आहे. अलाहाबादच्या अतरसुइया येथे जन्मलेल्या गणेश शंकर विद्यार्थी यांनी राष्ट्रीय आंदोलनाच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण नियतकालिकांमध्ये लिखाण केले आणि हिंदी पट्ट्यात राष्ट्रीय चेतना पसरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ‘स्वराज्य’, ‘अभ्युदय’, ‘हितवार्ता’ सारख्या नियतकालिकांमध्ये लिखाण करण्याव्यतिरिक्त ते ‘सरस्वती’…
