‘चंद्रशेखर आझाद स्पोर्ट्स क्लब’

नौजवान भारत सभा, पुणे द्वारे संचालित ‘चंद्रशेखर आझाद स्पोर्ट्स क्लब’ कडून पुन्हा विद्यार्थी व तरुण-तरुणींसाठी व्यायाम आणि खेळांचा सराव सुरू करण्यात आला.
लॉकडाऊनच्या काळामध्ये बंद असलेला स्पोर्ट्स क्लब आज दिनांक 05/12/2020 रोजी पासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. आज सर्व्हे न. 133 वस्तीतील विद्यार्थ्यांनी क्लब मध्ये फुटबॉलचा सराव सुरू केला. खेळून झाल्यानंतर क्लबमध्ये सहभागी झालेले नवीन खेळाडूंना क्लब व नौभास ची थोडक्यात माहिती देण्यात आली.
विद्यार्थी, युवकांचा सर्वांगीण विकास घडण्यासाठी संधीची, योग्य वातावरणाची, पोषक आहाराची व वेगवेगळ्या सांस्कृतिक माध्यमांची गरज असते. परंतु देशातील बहुसंख्य कष्टकरी-कामगारांच्या मुलांना आपल्या बौद्धिक, सांस्कृतिक व शारीरिक क्षमतांचा विकास करण्याची संधीच या बाजारू व्यवस्थेत उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत नौभास व्यवस्थात्मक परिवर्तनासाठी संघर्ष करत असतांना आपल्या क्षमतेनुसार जनसहयोगाच्या आधारावर विद्यार्थी-तरुणांना ह्या संधी उपलब्ध करवण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहे. खेळ व व्यायामाच्या संधी साठी धपडणाऱ्या सर्व विद्यार्थी, तरुण-तरुणींसाठी चंद्रशेखर आजाद स्पोर्ट्स क्लब खुला आहे व ह्याला पूर्णतः जनसहयोगाच्या माध्यमातून उभे करण्याचा आमचा ध्यास आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी, तरुण-तरुणींनी ह्यात सहभागी व्हावे असे आम्ही आपणाला आवाहन करतो आहे.
नौजवान भारत सभा, पुणे
*आर्थिक सहयोगासाठी आवाहन*
अ) बॅंक अकाउंट
Name: Ravishankar Purne
HDFC bank, Hinjawadi branch
Acc/no: 50100240225836
IFSC: HDFC0000794
ब) गुगल पे
Google Pay
UPI: ravismail96@okhdfcbank
Mobile: 8956840785
क) फोन पे
PhonePe
UPI: ravishankarbm@ybl
Mobile: 8956840785
आपण निधी पाठवल्यावर कृपया वरील फोन नंबरवर एक मेसेज करुन कळवणे. पावती आपल्या पर्यंत पोहोचवण्याची सोय आम्ही करु.
संपर्क
सुरज- 8806038914

Related posts

Leave a Comment

4 × two =