नौजवान भारत सभा द्वारे संचालित शिक्षण सहाय्यता केंद्राची सुरुवात 12 डिसेंबर पासून दांडेकर पूल सर्वे नंबर 133 मध्ये करण्यात आली. कामगार वर्गातील मूला-मुलींच्या शिक्षणाची स्थिती आपल्याला माहीतच आहे. या भांडवली शिक्षण व्यवस्थेने कामगार वर्गातील विद्यार्थ्यांना कायमच शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. ज्या थोड्या बहुत सरकारी शाळा आहेत त्या सुद्धा वाईट अवस्थेत आहेत. कोरोना महामारी मुळे शिक्षणाची स्थिती अजूनच वाईट बनली आहे. सर्व ठिकाणी ऑनलाइन वर्ग घेण्यावर जोर दिला जात आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी लागणारी संसाधने मात्र सरकार द्यायला तयार नाही. अशात कामगार कष्टकरी वर्गातील मुला-मुलींसाठी शिक्षण घेणे अशक्य बनले आहे. वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मुला-मुलींना शिक्षणात मदत व्हावी, त्यांच्या मध्ये वैज्ञानिक विचार रुजावा यासाठी नौजवान भारत सभेने शिक्षण सहाय्यता केंद्राची पुन्हा सुरुवात केली आहे. शिक्षण सहाय्यता केंद्राची सुरुवात इंग्रजी च्या वर्गापासून करण्यात आली. या पुढे इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे विषय शिकवल्या जातील.
तरी सर्व न्यायप्रिय जनतेला आम्ही आवाहन करतो की शिक्षण सहायता केंद्र अविरत सुरू ठेवण्यासाठी आपण आर्थिक सहाय्य करावे तसेच आपल्याला शिकवणी वर्ग घेण्यास शक्य असेल तर त्यासाठीही आमच्यासोबत संपर्क करावा.

