काकोरी कटातील शहीद रामप्रसाद बिस्मिल, अशफ़ाक़उल्ला ख़ाँ, रोशन सिंह आणि राजेन्द्रनाथ लाहिरी यांच्या स्मृति दिनानिमित्त प्रभात फेरी

__________________
काकोरी कटातील शहीद रामप्रसाद बिस्मिल, अशफ़ाक़उल्ला ख़ाँ, रोशन सिंह आणि राजेन्द्रनाथ लाहिरी यांच्या स्मृति दिनानिमित्त प्रभात फेरी
शहीदांचा वारसा जिंदाबाद✊
शहीदांनी दिला आवाज
बदला बदला देश समाज✊
जाती धर्माचे झगडे सोडा
खऱ्या लढाईशी नाते जोडा✊
अशफ़ाक़-बिस्मिल का संदेश
हिंदु-मुस्लिम सबका देश✊
काकोरी कटातील शहीद अमर रहे✊
इंकलाब जिंदाबाद✊
१७ डिसेंबर व १९ डिसेंबर १९२७ साली स्वातंत्र्य लढ्यासाठी रामप्रसाद बिस्मिल, अशफ़ाक़उल्ला ख़ाँ, रोशन सिंह आणि राजेन्द्रनाथ लाहिरी हे चार शूर क्रांतिकारक फासावर चढले. या घटनेला आता ९३ वर्ष उलटून गेली आहेत. यां शहीदांच्या स्मृति दिनानिमित्त नौजवान भारत सभा, पुणे द्वारे १३३ वसाहत, दांडेकर पुल येथे अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी वस्तीमध्ये अभिवादनाच्या घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये नौभास चे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व किशोर मुले सामील झाली. त्यानंतर शहीद भगतसिंह वाचनालयासमोर एक छोटीशी सभा घेण्यात आली. यावेळी या क्रांतिकरकांच्या जीवनाचा आणि विचारांचा परिचय मांडला गेला आणि, प्रश्न उपस्थित केले गेले की आपण खरच स्वतंत्र आहोत का? गरीब-श्रीमंत दरी ही वाढतच चालली आहे. बेरोजगारी दिवसेंदिवस वाढतच आहे. आज आपल्या मुला-बाळांना शिकवण्याची पण भ्रांत आहे. घरात कोणी आजारी पडलं तर घर दार विकायची पाळी येते. लाखो रुपयांचे बिलं भरावी लागतात आणि इलाजावाचून माणूस मरून जातो ही आत्ताची परिस्थिती आहे. आपल्याला निवडणुकीत मत द्यायचं स्वातंत्र्य आहे. आपल्याला सरकार निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. पण आपल्याला सन्मानाने जगण्याचं स्वातंत्र्य आहे का? हेच का ते स्वातंत्र्य ज्यासाठी हे चार शहीद आणि त्यांचे भगतसिंह, सुखदेव, राजगुरू सारखे साथी फासावर गेले? असे अनेक प्रश्न यावेळी तर्फे उपस्थित केले गेले आणि शहीदांच्या विचारधारेचा अभ्यास करण्याचा निर्धार व्यक्त केला गेला.
शेवटी घोषणा देऊन कार्यक्रमाचा समारोप केला. त्यानंतर वाचनालयात क्रांतिकारक गीत गायली गेली आणि निदा फाजली लिखित आणि जगजीत सिंह यानी गायलेलं ‛ये कैसी आजादी है’ हे गाणं दाखवण्यात आलं व चर्चा घेण्यात आली.

Related posts

Leave a Comment

five + 5 =