शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या बलिदान दिनानिमित्त नौभास, मुंबई तर्फे कार्यक्रम व रॅलीचे आयोजन

27 फेब्रुवारी शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या बलिदानाला आज 90 वर्षे पूर्ण झालीत. त्याच पार्श्वभूमीवर नौभास, स्त्री मुक्ती लीग, बिगुल मजदूर दस्ता, मुंबई तर्फे गोवंडीतील रफिक नगर भागात शहीद स्मृती अभियान व रॅली चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात ‘मेरा रंग दे बसंती चोला’, ‘लडाई जारी है’ ह्या क्रांतिकारी गीतांची प्रस्तुती करण्यात आली. चंद्रशेखर आझाद ह्यांच्या जीवनाबद्दल, तसेच क्रांतिकारकांच्या ‘स्वातंत्र्याच्या स्वप्नांबद्दल’ चर्चा करण्यात आली. त्यांनतर रफिक नगर भागात एक रॅली काढून पत्रकांचे वितरण करण्यात आले.

नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे चंद्रशेखर आझाद यांच्या शहीद दिनानिमित्त फिल्म स्क्रिनिंग चे आयोजन करण्यात आले.

नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे चंद्रशेखर आझाद यांच्या शहीद दिनानिमित्त फिल्म स्क्रिनिंग चे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत गोवंडी भागातील रफिक नगर मध्ये ‘द लेजन्ड ऑफ भगतसिंग’ हा चित्रपट दाखवण्यात आला. लहान मुलांपासून ते महिला व पुरुषांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपटाद्वारे फक्त नावे माहीत असलेल्या क्रांतिकरकांबद्दल अधिक माहिती मिळाल्याची तसेच भगतसिंग, चन्द्रशेखर आझाद व त्यांच्या क्रांतिकारी सहकाऱ्यांच्या स्वप्नातले स्वातंत्र्य आजही आपल्याला मिळाले नसल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी नोंदवली.

आज दिनांक 17 फेब्रुवारी 2021, बुधवार, रोजी नौजवान भारत सभा (नौभास) आणि पुण्यातील इतर अनेक परिवर्तनशील संघटनांनी आणि सामान्य नागरिकांनी मिळून बालगंधर्व चौक, पुणे येथे सायंकाळी 6 वाजता, दिशा रवी तसेच इतर पर्यावरणवादी, मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या दमनाविरोधात निदर्शने केली.

आज दिनांक 17 फेब्रुवारी 2021, बुधवार, रोजी नौजवान भारत सभा (नौभास) आणि पुण्यातील इतर अनेक परिवर्तनशील संघटनांनी आणि सामान्य नागरिकांनी मिळून बालगंधर्व चौक, पुणे येथे सायंकाळी 6 वाजता, दिशा रवी तसेच इतर पर्यावरणवादी, मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या दमनाविरोधात निदर्शने केली. दिशा रवी या पर्यावरण कार्यकर्त्या आहेत. शेतकरी आंदोलनासंदर्भात एक अभियान चालवण्यासाठी त्यांनी एक ‘टूलकीट’ बनवली होती. ही टूलकीट इंटरनेटवर उपलब्ध आहे. या टूलकीट मध्ये हिंसाचाराबद्दल अवाक्षरही नाही. सोशल मिडीय़ा अभियान चालवण्यासाठी अशाप्रकारच्या टूलकीट बनवण्याची पद्धत अनेक संघटना अवलंबत असतात. भाजपच्या सोशल मिडीया सेलचे कामही असेच चालते. तरीही दिशा रवी यांच्यावर त्या देशविरोधी…

सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विरोधकांचे दमन बंद करा ! दिशा ए रवी आणि तमाम समाजसेवक, पत्रकार आणि विचारवंतांची तात्काळ सुटका करा !

आपणास ठाऊकच असेल की दिशा ए रवी नावाच्या पर्यावरण कार्यकर्तीला दिल्ली पोलिसांनी शेतकरी चळवळीच्या समर्थनार्थ टूलकिटचा प्रचार केल्याप्रकरणी अटक केली आहे आणि पाच दिवसांच्या पोलिस रिमांडवर पाठवले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर, शेतकरी चळवळीच्या पाठिंब्यावर दबाव आणण्यासाठी तयार केलेल्या ‘टूलकिट’च्या आधारे दिशा रवीवर देशद्रोहासारखे गंभीर आरोप लावले गेले आहेत. या प्रकरणात वकील निकिता जेकब आणि सामाजिक कार्यकर्ते शांतनु यांच्याविरोधात एफआयआरदेखील दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत पोलिसांना हेच सांगता आले नाही की या ‘टूलकिट’मध्ये हिंसाचारासाठी चिथावणी कोठेदिली गेली आहे. ‘टूलकिट’ प्रत्यक्षात मार्गदर्शक तत्त्वे आणि योजनांचा एक संच आहे. एखाद्या विशिष्ट प्रसंगी…

मुंबई मध्ये ‘नौभास’ वार्षिक आढावा बैठक संपन्न…

दि. 7/02/21 रोजी नौजवान भारत सभेच्या मुंबई युनिट ची वार्षिक आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीची सुरवात ‘मेरा रंग दे बसंती चोला’ ह्या गीताने करण्यात आली. साथी अविनाश यांनी नौजवान भारत सभेची ओळख व मुंबईतील मागील वर्षभराच्या कामाची माहिती दिली. डॉ. पूजा यांनी देशभरातील नौभास च्या कामांचा आढावा मांडला. नौजवान भारत सभेच्या सर्व सदस्यांनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद या सर्व क्रांतिकारकांच्या विचारांवर काम करत जनतेच्या सर्व न्यायपूर्ण संघर्षांत त्यांच्यासोबत राहण्याची शपथ घेतली. त्यांनतर पुढील वर्षभरासाठी डॉ.पूजा, प्रज्ञा व अविनाश यांची कार्यकारिणी म्हणून निवड करण्यात आली. शशीप्रकाश यांची ‘अगर तुम युवा…

रविवार दिनांक 24 जानेवारी रोजी नौभास पुणे युनिट ची वार्षिक आढावा बैठक संपन्न झाली.

रविवार दिनांक 24 जानेवारी रोजी नौभास पुणे युनिट ची वार्षिक आढावा बैठक संपन्न झाली. याप्रसंगी नवीन सभासदांनी सदस्यता शपथ घेतली तसेच वर्ष 2021 साठी डॉ निखिल एकडे, डॉ नेहा, आणि रवी पूर्णे यांची कार्यकारणी बहुमताने निवडली गेली.

भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागून 10 बालकांच्या मृत्यूचा घटनेचा निषेध करण्यासाठी निदर्शने

भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागून 10 बालकांचा मृत्यु झाला. सुरक्षा यंत्रणा नसतानाही या विभागाचे 2015 मध्ये उद्घाटन झाले होते. गेल्या पाच वर्षात भाजपा आणि आघाडी, दोन्ही सरकारांनी या रुग्णालयात सुरक्षा यंत्रणेच्या व्यवस्थेसाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. दिवसेंदिवस आरोग्य सेवेत कंत्राटीकरण वाढवून, खाजगीकरण वाढवून, सरकारी दवाखाने खाजगी कंपन्यांच्या ताब्यात देऊन, खर्च कमी करुन सरकारी व्यवस्थेचे खच्चीकरण करुन, सरकारी आरोग्य व्यवस्था ‘खराबच’ असते अशी धारणा वाढवून खाजगी नफेखोर हॉस्पिटलचा धंदा वाढवण्याचे काम आज सर्व भांडवली पक्षांच्या सरकारांद्वारे केले जात आहे. मूलभूत सुविधांच्या व सुरक्षा यंत्रणेच्या अभावाने भंडारा…

सुरक्षा यंत्रणेच्या अभावी 10 नवजात बालकांचा बळी : हा अपघात नाही, तर नफाकेंद्रीत व्यवस्थेकडून झालेली संस्थागत हत्या आहे!

सुरक्षा यंत्रणेच्या अभावी 10 नवजात बालकांचा बळी : हा अपघात नाही, तर नफाकेंद्रीत व्यवस्थेकडून झालेली संस्थागत हत्या आहे! दोषींना शिक्षा, पीडीतांना न्याय मिळालाच पाहिजे! आरोग्यसेवेचे राष्ट्रीयकरण झालेच पाहिजे! 9 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात एक हृदयद्रावक आणि चीड आणणारी घटना घडली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला मध्यरात्री 2 च्या सुमारास आग लागून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. यातील 7 मुलांचा गुदमरून आणि 3 मुलांचा आगीने भाजून मृत्यू झाला. 2015 मधेच भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाचे उद्घाटन झाले तेव्हा विभागामध्ये अग्निशमनाची व्यवस्था नव्हती. त्यानंतर…

रविवार, दि. 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दांडेकर पूल परिसरात सावित्रीबाईंच्या संघर्षाला अभिवादन करण्यासाठी प्रभातफेरी आयोजित करण्यात आली होती.

रविवार, दि. 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दांडेकर पूल परिसरात सावित्रीबाईंच्या संघर्षाला अभिवादन करण्यासाठी प्रभातफेरी आयोजित करण्यात आली होती. वस्तीतील युवक सुद्धा ह्यात सहभागी झाले. प्रभातफेरी नंतर वस्तीतील शहीद भगतसिंह वाचनालया जवळ अभिवादन सभा घेण्यात आली. सावित्रीबाई फुलेंनी त्या काळच्या सरंजामी-ब्राह्मणवादी व्यवस्थेने महिला आणि शुद्रातीशूद्रांवर लादलेल्या ज्ञानबंदीच्या विरोधात, स्त्री गुलामी व जातिव्यवस्थेच्या विरोधात लढा पुकारला. सावित्रीबाई-ज्योतिबांनी रूढी, परंपरा, अंधश्रद्धांनी बरबटलेल्या समाजात आपल्या कुटुंबा पासून समाजात अविरत संघर्ष केला. आपले अवघे आयुष्य ह्या महत्कार्याला अर्पण केले. त्यांच्या संघर्षापासून आज तरुण-तरुणींनी प्रेरणा घेण्याची गरज आहे. आजच्या भांडवली व्यवस्थेत शिक्षणाचे…