मुंबई मध्ये ‘नौभास’ वार्षिक आढावा बैठक संपन्न…

दि. 7/02/21 रोजी नौजवान भारत सभेच्या मुंबई युनिट ची वार्षिक आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीची सुरवात ‘मेरा रंग दे बसंती चोला’ ह्या गीताने करण्यात आली. साथी अविनाश यांनी नौजवान भारत सभेची ओळख व मुंबईतील मागील वर्षभराच्या कामाची माहिती दिली. डॉ. पूजा यांनी देशभरातील नौभास च्या कामांचा आढावा मांडला. नौजवान भारत सभेच्या सर्व सदस्यांनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद या सर्व क्रांतिकारकांच्या विचारांवर काम करत जनतेच्या सर्व न्यायपूर्ण संघर्षांत त्यांच्यासोबत राहण्याची शपथ घेतली. त्यांनतर पुढील वर्षभरासाठी डॉ.पूजा, प्रज्ञा व अविनाश यांची कार्यकारिणी म्हणून निवड करण्यात आली. शशीप्रकाश यांची ‘अगर तुम युवा हो’ आणि सर्वेश्वर दयाळ सक्सेना यांची ‘देश कागज पर बना नक्शा नहीं होता’ ह्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले. बैठकीच्या शेवटी पुढील महिन्याभराच्या कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्यात आली. ‘आ रे नौजवां’ ह्या स्फूर्तिदायी गीताने बैठकीची सांगता करण्यात आली. आजच्या अन्यायी, विषमतापूर्ण, दमनकारी, फॅसिस्ट परिस्थितीत सत्याच्या बाजूने लढणे हे तरुणांचे कर्तव्य आहे, हीच आपली युवा असण्याची शर्त आहे. म्हणूनच नौजवान भारत सभा आपणालाही शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या संघर्षांत सामील होण्याचे आवाहन करते. नौजवान भारत सभेच्या कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी पुढील क्रमांकांवर संपर्क करा. डॉ. पूजा 7057088323 अविनाश 8826265960 ✊भगतसिंहाने दिला आवाज, बदला बदला देश समाज ✊इंकलाब जिंदाबाद

Related posts

Leave a Comment

sixteen − 4 =