गोवंडी-मानखुर्द (मुंबई) येथील रफीक नगर, गौतम नगर भागांत नौजवान भारत सभेतर्फे राशन वाटप

गोवंडी-मानखुर्द (मुंबई) येथील रफीक नगर, गौतम नगर भागांत नौजवान भारत सभेतर्फे राशन वाटप
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
▫️कोरोनामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका देशभरातील कामगार-कष्टकरी जनतेला बसला आहे.
▫️हाताला काम नाही आणि महागाई दिवसेंदिवस नवीन उंची गाठत आहे. अश्या परिस्थितीत रोजंदारीवर काम करणाऱ्यांपासून ते छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या जनतेला एका वेळचे जेवण देखील अशक्यप्राय झाले आहे.
▫️साथीचा आजार व कोलमडलेले आर्थिक समीकरण यांमुळे त्रस्त असणाऱ्या कामगार कष्टकरी, गरीब जनतेप्रती असलेली जबाबदारी पूर्ण करण्यास *राज्यातील ठाकरे सरकार व केंद्रातील मोदी सरकार पूर्णतः अयशस्वी ठरले आहे.
_ह्याच धर्तीवर नौजवान भारत सभेने ऐन टाळेबंदीच्या काळात स्थानिक कामगार कष्टकऱ्यांच्या मदतीने गोवंडीत साडे तीन महिने सामूहिक स्वयंपाकगृह चालवले, तसेच सतत मदतकार्य सुरू ठेवले आहे._
▫️ सामान्य जनतेला अधिकार आणि हक्कांपासून वंचित ठेवणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचे मालकवर्गाप्रतीच निष्ठा बाळगणारे भांडवली चरित्र लोकांसमोर आज स्पष्ट झाले आहे.
▫️देशभरात राबविण्यात आलेले कामगार संघर्ष संकल्प अभियान गोवंडी येथे नौजवान भारत सभेकडून चालवण्यात आले, ज्यात आपल्या हक्कांसाठी संघर्षाची गरज आणि संघर्षासाठी कामगार वर्गीय एकजुटीचे आव्हान करण्यात आले.
▫️कष्टकरी गरीब जनतेच्या परिस्थितीत आजही तिळमात्र बदल नाही, म्हणूनच न्यायप्रिय लोकांच्या श्रम सहयोग व आर्थिक सहयोगाच्या जोरावर नौजवान भारत सभेकडून पुन्हा एकदा राशन वाटपाचे काम करण्यात आले.
नौजवान भारत सभेच्या कामांसाठी आपणही अधिकाधिक शक्य आर्थिक सहयोग नक्की करावा. आर्थिक सहयोगासाठी तपशील पुढील प्रमाणे :-
Name: Pooja Vijay Chinchole
Account number: 0925010406826
Bank :United bank of India
Branch name: Deccan gymkhana
IFSC: UTBI0DEC632
Google pay: 7588733724
नौजवान भारत सभेच्या अभियानांमध्ये व कामांमध्ये सामील होण्यासाठी सम्पर्क करा.
▫️डॉ.पूजा 7057088323
▫️बबन ठोके 9619039793
✊ इंकलाब जिंदाबाद

Related posts

Leave a Comment

one × one =