स्वातंत्र्यलढ्यातले शहीद क्रांतिकारक जतिंद्रनाथ दास यांच्या जन्मदिनी त्यांना क्रांतिकारक अभिवादन !

स्वातंत्र्यलढ्यातले शहीद क्रांतिकारक जतिंद्रनाथ दास यांच्या जन्मदिनी त्यांना क्रांतिकारक अभिवादन !
राष्ट्रीय चळवळीतील एका महान आदर्शासाठी आपले प्राण अर्पण करणारे क्रांतिकारक जतिंद्रनाथ दास (जतिन दा) यांचा आज जन्मदिवस आहे. क्रांतिकारक चळवळीत सामील होण्यापूर्वी जतिंद्रनाथ दास असहकार चळवळीत सक्रियपणे सहभागी झाले होते आणि त्यांनी अनेक तुरूंगयात्रा केल्या होत्या. जतिंद्रनाथ दास यांनी ‘द रेव्होल्यूशनरी’ आणि ‘पीला पर्चा’ या एच.आर.ए. च्या दोन महान कागदपत्रांच्या प्रकाशनाची व्यवस्था केली. ‘दि रिवोल्यूशनरी’ संपूर्ण देशभरात वितरित केले गेले होते याची जबाबदारी बंगालमध्ये जतिंद्रनाथ दास यांनी आपल्या साथीदारांसह घेतली. जतिंद्रनाथ दास हे संघटनेसाठी निधी आणि शस्त्रे जमा करण्यात मोलाची भूमिका बजावत होते. भगतसिंग आणि त्याच्या साथीदारांना आग्रा येथील बॉम्ब बनवण्याच्या कारखान्यात प्रशिक्षण देण्याचे काम जतिंद्रनाथ दास यांनी केले.
तुरुंगात उपोषणाचा निर्णय घेण्यात आल्यानंतर जतिंद्रनाथ दास म्हणाले होते की, “हा संप जाहीर करून आम्ही एका दीर्घ संघर्षात उतरत आहोत जे एका प्रकारे रिव्हॉल्व्हर किंवा पिस्तूलच्या लढाईपेक्षा कठीण आहे. उपोषण करुन इंच इंच मरणाच्या जवळ जाण्यापेक्षा पोलिसांच्या गोळ्याला बळी पडून किंवा फ़ासावर लटकून मरणे सोपे आहे आणि एकदा तुम्ही उपोषणाच्या मैदानात उतरल्यानंतर माघार घेणे म्हणजे क्रांतिकारकांची प्रतिष्ठा धूळीत मिसळवण्यासारखे असेल. अशा संघर्षाच्या परिस्थितीतुन माघार घेण्यापेक्षा सुरुवातीपासूनच संघर्षात भाग न घेणे हे बरे होईल.”
त्यांनी असेही म्हटले होते की, जोपर्यंत त्यांचा प्रश्न आहे, एकदा उपोषण सुरू झाले की सरकारने आमचे मागणीपत्र स्वीकारल्याशिवाय ते मागे हटणार नाहीत. त्यांनी इतर सहकाऱ्यांना एक दिवसाचा वेळ काढून स्वतः चा अंदाज नीटपणे घेण्याचा सल्ला दिला जेणेकरुन एखाद्याचा स्वतःवर शेवटपर्यंत टिकण्याचा पूर्ण विश्वास नसल्यास त्याने कोणत्याही परिस्थितीत उपोषण करू नये. उपोषणात भाग न घेणारे सहकारी इतर लोकांप्रमाणेच आम्हाला आदरणीय असतील असेही त्यांनी स्पष्ट केले. उपोषण सुरू झाले आणि जतिन दा उपोषणाच्या ६३ व्या दिवशी १३ सप्टेंबर रोजी शहीद झाले. जतिन दा यांची अंत्ययात्रा बाहेर पडली तेव्हा जवळपास ६ लाख लोक हजर झाले.
‘इंकलाब जिंदाबाद’ वर टीका करणाऱ्या मॉडर्न रिव्ह्यूच्या संपादकाला उत्तर देताना भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त आपल्या प्रसिद्ध पत्रात जतिंद्रनाथ दास यांच्या बलिदानाचे उदाहरण प्रस्तुत करताना लिहितात की -‘ जेव्हा आम्ही जतिंद्रनाथ जिंदाबादचा नारा देतो तेव्हा त्याचे तात्पर्य असे की आपण त्यांच्या जीवनातील महान आदर्श आणि कायमस्वरूपी अथक आवेश कायम टिकवून ठेवू , ज्या आदर्शांनी या महान क्रांतिकारकाला अकल्पनीय दु:ख सहन करण्यास व अनंतकाळच्या बलिदानास सामोरे जाण्यासाठी या प्रेरित केले. या घोषणेद्वारे आमची तळमळ दिसून येते की आम्हीसुद्धा आपल्या आदर्शांकरिता असा उत्साह स्वीकारला पाहिजे. ह्याच भावनेची आम्ही प्रशंसा करतो.
आज आम्ही या महान क्रांतिकारकाच्या जन्मदिवशी (२७ ऑक्टोबर १९०४) नौजवान भारत सभेच्या वतीने क्रांतिकारक अभिवादन सादर करतो!

Related posts

Leave a Comment

five − three =