हिंदी आणि कोणत्याही भाषेची सक्ती नाही चालणार ! ऐच्छिक भाषेच्या माध्यम निवडीचा हक्क प्रत्येक भाषिकाला मिळालाच पाहिजे! समान, दर्जेदार, विनामूल्य शिक्षणाशिवाय माध्यमाचा आणि भाषेचा वाद व्यर्थ आहे!

 

नौजवान भारत सभा (नौभास) आणि आमची मुंबई आमची बेस्ट द्वारे मुंबईतील बेस्ट बसच्या भाडेवाढीविरोधात अभियानाचे आयोजन

BEST campaign

30 जून आणि 1 जुलै 2025 रोजी, नौजवान भारत सभा आणि आमची मुंबई आमची बेस्ट द्वारे मुंबईतील बेस्ट बसच्या भाडेवाढीविरोधात पत्रके वाटण्याची मोहीम राबवली. ही मोहीम कुर्ला येथील बेस्ट डेपो आणि चेंबूरमधील वाशी नाका बस स्टॉपवर आयोजित करण्यात आली होती. ही मोहीम सुरु करण्याचे तात्काळ कारण म्हणजे बेस्ट प्रशासनाने घेतलेला भाडेवाढीचा निर्णय. याअंतर्गत किमान भाडे दुप्पट करून 10 रुपये करण्यात आले आहे, तर कमाल भाड्याची पूर्वीची मर्यादा जी 20 रुपये होती ती पूर्णतः काढून टाकण्यात आली आहे. यामुळे, ज्या मार्गासाठी पूर्वी प्रवाशांना 25 कि.मी. अंतरासाठी 20 रुपये भाडे भरावे लागत…