नौजवान भारत सभेतर्फे फ्रीडम फ्लोटिलाच्या कार्यकर्त्यांवरील हल्ला आणि अटकेचा तीव्र निषेध !!

वर्णद्वेषी इजरायल मुर्दाबाद!
मानवसंहार मुर्दाबाद!!
मित्रांनो,
आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या दीड वर्षांपासून इस्रायलद्वारे पॅलेस्टाईनमध्ये मानवसंहार सुरू आहे. ह्यात आतापर्यंत 61,709 लोक मारले गेले आहेत, ज्यामध्ये 17492 मुले आहेत. त्यासोबत लाखो लोक जखमी झाले आहेत. मागील चार महिन्यांपासून इस्रायलने गाझा पट्टीची संपूर्ण नाकेबंदी केली असून, तिथे पाणी, अन्न आणि इतर मानवीय मदतीचा प्रवेश पूर्णपणे रोखण्यात आला आहे. यामुळे गाझामध्ये एक मानवनिर्मित दुष्काळ निर्माण झाला आहे. इस्रायल अन्नाचा वापर “युद्धातील शस्त्र” म्हणून करत आहे.
हा वेढा तोडण्यासाठी फ्रीडम फ्लोटिलाचे ‘मॅडलीन’ जहाज जगभरातील विविध देशांतील कार्यकर्त्यांना घेऊन निघाले होते. हे जहाज समुद्रमार्गे गाझा गाठण्याचा, पॅलेस्टाईनवरील नौदल नाकेबंदी तोडण्याचा आणि पॅलेस्टाईनमधील जनतेला मानवीय मदत पोहचवण्याचा प्रयत्न करत होते.
9 जून 2025 रोजी वसाहतवादी इस्रायलच्या सैन्याने आंतरराष्ट्रीय पाण्याच्या हद्दीत फ्रीडम फ्लोटिलाला अडवले आणि त्यावर हल्ला केला. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. हे कृत्य पॅलेस्टिनी जनतेविरुद्ध इस्रायलने केलेल्या युद्धगुन्ह्यांच्या यादीतील आणखी एक गंभीर गुन्हा ठरतो.
जहाजावरील सर्व निःशस्त्र कार्यकर्त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे असलेली आवश्यक मानवतावादी मदत – विशेषतः नाकेबंदीग्रस्त पॅलेस्टाईनच्या जनतेसाठी अन्न व औषधे – जप्त करण्यात आली आहे.
‘मॅडलीन’ जहाजावरील प्रवाशांनी त्यांचे उद्दिष्ट स्पष्टपणे मांडले होते: क्रूर इस्रायली वेढ्यात अडकलेल्या नागरिकांना शांततापूर्ण मार्गाने जीवनावश्यक मदत पोहोचवणे.
इस्रायली राजवटीचा हा निर्दयी हल्ला पॅलेस्टिनी जनतेबद्दल त्यांच्या अमानवीय व तिरस्कारयुक्त वृत्तीचे प्रतिबिंब आहे. त्यांनी हे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की – किमान मदत पोहोचू देण्यापेक्षा ते एका संपूर्ण लोकसंख्येला उपाशी ठेवण्यास तयार आहेत.
आम्ही जगभरातील सर्व न्यायप्रिय व्यक्ती आणि संघटनांना ह्या मानवसंहाराविरुद्ध आवाज उठवण्याचे आणि गाझावरील अमानवीय वेढ्याचा विरोध करण्याचे आवाहन करतो.
पॅलेस्टाईनचा स्वातंत्र्य संघर्ष चिरायू होवो!
जायनवाद मुर्दाबाद!!

Related posts

Leave a Comment

eight + seven =