इंकलाब झिंदाबाद!! भांडवलशाही, साम्राज्यवाद मुर्दाबाद!! जाती-धर्माचे झगडे सोडा, खऱ्या लढाईशी नाते जोडा!!
नौजवान भारत सभा द्वारा क्रान्तिकारी बटुकेश्वर दत्त की स्मृति दिवस पर, बच्चों के बीच बटुकेश्वर दत्त का जीवन परिचय दिया गया
क्रान्तिकारी बटुकेश्वर दत्त की विरासत अमर रहें! अमर शहीदों का पैगाम, जारी रखना है संग्राम!! नौजवान भारत सभा द्वारा मुम्बई के मानखुर्द-गोवंडी इलाके में संचालित ‘शहीद राजगुरु शिक्षा सहायता केन्द्र’ और ‘कोंपल शिक्षा मण्डल’ में, महान क्रान्तिकारी बटुकेश्वर दत्त की स्मृति दिवस पर, बच्चों के बीच बटुकेश्वर दत्त का जीवन परिचय दिया गया। बच्चों को बताया कि बटुकेश्वर दत्त बंगाल में जन्मे थे। जब वह पढ़ाई करने कानपुर में आए, तो क्रान्तिकारी धारा से परिचित हुए और हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन (HSRA) से जुड़ गए। 8 अप्रैल 1929 को अंग्रेज…
‘देशभरातील स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटी आणि घोटाळे’ या विषयावर दिशा विद्यार्थी संघटना आणि नौजवान भारत सभेकडून संयुक्तरीत्या ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले
दि. 22/7/2024 रोजी ‘देशभरातील स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटी आणि घोटाळे’ या विषयावर भगतसिंह जनअधिकार यात्रे अंतर्गत दिशा विद्यार्थी संघटना आणि नौजवान भारत सभेकडून संयुक्तरीत्या ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये देशभरातील पेपर फुटीच्या ज्वलंत मुद्द्यावरती प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. नौजवान भारत सभा (नौभास) आणि दिशा विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींनी पेपर फुटीच्या मुद्द्याला घेऊन प्रमुख वक्तव्य ठेवत विषयाला अनुसरून मांडणी केली. 4 जून 2024 रोजी NEET UG आणि त्यांनतर NEET PG, NET आणि CSIR UGC NET परीक्षेत घोटाळ्यांमुळे झालेला गदारोळ आणि एकंदरीत स्पर्धा परीक्षांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल चर्चा करण्यात आली. त्यासोबत…
नौजवान भारत सभेतर्फे मुंबईतील शहीद भगतसिंह वाचनालयासाठी आर्थिक सहाय्य उभे करत साप्ताहिक अभियाने चालवले जात आहेत!
मित्रांनो, नौभास मानखुर्द, मुंबईतील कष्टकरी वस्ती असलेल्या साठे नगरच्या भागात शहीद भगतसिंह वाचनालय चालवते. जिथे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्र चालवले जाते तसेच नियमितरित्या विविध विषयांवर चर्चासत्रे, फिल्म स्क्रिनिंग आयोजित केले जातात. मानखुर्दमधील इतर भागांत आम्ही शहीद सुखदेव फिरते वाचनालय चालवतो ज्याद्वारे भगतसिंहांच्या पुस्तकांसोबतच इतिहास, भूगोल, इत्यादी विषयांची पुस्तके, जगभरातील प्रगतिशील साहित्य आम्ही घरोघरी पोहचवण्याचा प्रयत्न करतो. नौभासची ही सर्व कामे कुठल्या सरकारी अनुदानावर किंवा कंपन्यांच्या सी.एस. आर फंडस् द्वारे पैसे उभे करून चालत नाही तर मानखुर्दमधील कष्टकरी जनता आणि प्रगतिशील व्यक्तींच्या बळावर चालतात. आम्ही एन. जी.ओ. नाही…
भगतसिंह जनअधिकार पदयात्रा (BSJAY) अंतर्गत परीक्षा आणि भरती मधील पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराविरोधात विशेष अभियान!
‘एन.टी.ए.’ रद्द करा ! तरुणांच्या भविष्यासोबत खेळणे बंद करा! केंद्र आणि राज्यस्तरीय परीक्षांमध्ये झालेल्या पेपरफुटी आणि भरती मध्ये झालेल्या गदारोळाविरोधात 9 ऑगस्ट रोजी चलो जंतर – मंतर, दिल्ली ! मित्र-मैत्रिणींनो, फॅशिश्ट मोदी सरकारचा कार्यकाळ विद्यार्थी तरुणांसाठी एखाद्या भयानक दुःखद स्वप्नापेक्षा कमी नाही. लोकांच्या घरांवर बुलडोझर चालवणारे हे सरकार आता एन.टी.ए.द्वारे विद्यार्थी-तरुणांच्या भविष्यावर देखील बुलडोझर चालवत आहे. राज्यस्तरीय परीक्षा आणि भरती आयोजित करणाऱ्या संस्थांचा देखील असाच आंधळा कारभार सुरू आहे. केंद्रापासून ते राज्यांपर्यंत अंदाधुंदपणे पेपरफुटी होत आहे, भरती रद्द होत आहेत, घोटाळे होत आहेत आणि भ्रष्टाचार शिगेला पोहचला आहे. अलीकडेच एन.टी.ए.…
शिक्षण सहायता मंडळाची सुरुवात – अहमदनगर
नौजवान भारत सभा (अहमदनगर) युनिटच्या वतीने गेल्या मागील चार वर्षापासून शिक्षण सहायता मंडळ चालवण्यात येत आहे. उन्हाळी सुट्टी नंतर पुन्हा नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षण सहायता मंडळाची सुरुवात करण्यात आली आहे. आज देशात शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे बहुसंख्य कामगार कष्टकरी वर्गातून येणाऱ्या मुलांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. शाळांच्या वाढत्या फी, महागडे कोचिंग क्लासेस मुळे विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेतून बाहेर फेकले जात आहेत अशा परिस्थितीत फक्त 24 टक्के विद्यार्थीच उच्च शिक्षणापर्यंत पोहोचतात. “नौजवान भारत सभेच्या” वतीने देशाच्या विविध भागातील कामगार वस्त्यांमध्ये शिक्षण सहायता केंद्र चालवले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांना फक्त परिक्षेपुरतं शिकवणे हा उद्देश नसून…
नौजवान भारत सभेतर्फे शहीद भगतसिंह वाचनालय, मानखुर्द, मुंबई येथे फिल्म स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले.
7 जुलै रोजी, नौभासतर्फे साठे नगरमधील शहीद सुखदेव फिरत्या वाचनालयाचे नियमित वाचक आणि शहीद राजगुरु शिक्षण सहाय्यता केंद्रात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “द लेजेंड ऑफ भगतसिंह” चित्रपटाचे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांच्या जीवनावर आणि संघर्षावर आधारित हा चित्रपट नौभासतर्फे वेगवेगळ्या ठिकाणी नियमितपणे दाखवला जातो कारण हा चित्रपट आपल्या क्रांतिकारकांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करतो. जेव्हा प्रतिगामी शक्ती त्यांच्या द्वेषाच्या राजकारणाचे बीज विद्यार्थी तरुणांमध्ये पेरण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत तेव्हा जात, धर्म, वर्गाची भिंत मोडून एका समान आणि न्याय्य समाजासाठी संघर्ष कसा उभा करायचा हा…
जनता वसाहत, पुणे येथे शिक्षण सहायता केंद्राची नवीन शैक्षणिक वर्षात नव्याने सुरुवात!
‘जनतेची सेवा करा’ या तत्वाला समोर ठेवून नौजवान भारत सभा देशाभरात विविध राज्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सहायता केंद्र, आझाद स्पोर्ट्स क्लब, फिरते वाचनालय यांसारखे विविध उपक्रम राबवते. शिक्षण सहायता केंद्रामध्ये कामगार-कष्टकरी पार्श्वभूमीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल इत्यादी विषयांत अवघड जाणार्या संकल्पना सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावल्या जातात, अभ्यास करवून घेतला जातो. एकंदरीतच देशभरात शिक्षणाचा ढासळलेला शिक्षणाचा दर्जा, कामगार-कष्टकऱ्यांच्या आर्थिक आवक्याबाहेर गेलेले दर्जेदार शिक्षण, मोफत शिक्षणाचा अभाव यांमुळे शाळेत शिकून देखील विद्यार्थ्यांना अतिरिक्त वर्गांची गरज पडते. अनेकवेळा हजारो रुपये खर्च करून लावलेल्या खाजगी शिकवण्या पालकांचा खिसा रिकामा करण्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या…
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे लावण्यात आला प्रगतिशील, क्रांतीकारी पुस्तकांचा स्टॉल!
2 जुलै, 2024 रोजी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे नौभासतर्फे पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला. नौभास आपल्या क्रांतीकारी शहिदांच्या, ज्यांनी एका न्याय्य समाजाच्या निर्मितीसाठी आपले प्राण वेचले, विचारांच्या प्रचार प्रसारासाठी देशभरात 13 राज्यांमध्ये काम करत आहे. आज देशात बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, तसेच जागतिक तापमानवाढीमुळे वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, इत्यादींनी थैमान घातलं आहे. ह्या सर्व मुद्द्यांपासून आपल्यात जाती धर्माच्या राजकारणाचे विष पेरण्याचं काम फॅशिश्ट शक्ती सातत्याने करत आहेत. हा भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांच्या स्वप्नातला भारत नव्हे! यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे ही स्थिती, व्यवस्था समजून घेणे आणि त्यासाठी क्रांतिकारकांनी लिहून…
नौजवान भारत सभेद्वारे मानखुर्द, मुंबई येथे मुसळधार पावसात देखील सुरू आहे ‘शहीद सुखदेव फिरते वाचनालय!’
घराघरात प्रगतिशील साहित्य पोहचवण्यासाठी पुढे या! स्वयंसेवी बना! आर्थिक सहयोग करा! पुस्तके द्या!! नौजवान भारत सभेतर्फे चालवण्यात येणारे फिरते वाचनालय मागील काही वर्षांपासून निरंतरपणे मानखुर्द गोवंडी येथील वेगवेगळ्या भागांत सुरू आहे. त्याचाच आता विस्तार करत ते इतर भागांत देखील सुरू करण्यात आले आहे. रील्स (Reels) आणि सोशल मीडियाच्या काळात विद्यानासोबत जोडलेली बरीच माहिती, गोष्टी, कविता आणि अभ्यासापासून मुलांना नियोजित पद्धतीने दूर ढकलले जात आहे, ज्यामुळे लहानपणापासूनच मुलांची बौद्धिक आणि सांस्कृतिक स्तरावर घसरण होत आहे. अशात अत्यंत गरजेचे आहे की शक्य ते प्रयत्न करून मुलांना वैज्ञानिकदृष्ट्या परिपक्व आणि एक संवेदनशील माणूस…
