‘देशभरातील स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटी आणि घोटाळे’ या विषयावर दिशा विद्यार्थी संघटना आणि नौजवान भारत सभेकडून संयुक्तरीत्या ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले

दि. 22/7/2024 रोजी ‘देशभरातील स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटी आणि घोटाळे’ या विषयावर भगतसिंह जनअधिकार यात्रे अंतर्गत दिशा विद्यार्थी संघटना आणि नौजवान भारत सभेकडून संयुक्तरीत्या ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये देशभरातील पेपर फुटीच्या ज्वलंत मुद्द्यावरती प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. नौजवान भारत सभा (नौभास) आणि दिशा विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींनी पेपर फुटीच्या मुद्द्याला घेऊन प्रमुख वक्तव्य ठेवत विषयाला अनुसरून मांडणी केली.

4 जून 2024 रोजी NEET UG आणि त्यांनतर NEET PG, NET आणि CSIR UGC NET परीक्षेत घोटाळ्यांमुळे झालेला गदारोळ आणि एकंदरीत स्पर्धा परीक्षांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल चर्चा करण्यात आली. त्यासोबत वक्त्यांनी देशातील शिक्षण आणि रोजगाराच्या स्थितीबद्दल मांडणी केली. दिशा विद्यार्थी संघटनेच्या साथी वेदांत ने, 1971 नंतरच्या खाजगीकरण–उदारीकरण–जागतिकीकरण (खाऊजा), नवीन शिक्षण धोरण 2020 आणि रोजगाराच्या क्षेत्रात वाढत्या कंत्राटीकरणाबद्दल मांडणी केली.

चर्चा सत्रात पुढे नौभास कडून हर्षदा यांनी विद्यार्थी चळवळी समोरील आव्हाने, आरक्षण, फासिवाद ह्या विषयाला घेऊन सविस्तर मांडणी केली.

चर्चासत्राच्या शेवटी, भगतसिंह जनअधिकार यात्रे अंतर्गत दिशा विद्यार्थी संघटना आणि नौभास कडून पेपर फुटी विरोधात देशभरात एक महिना प्रदीर्घ अभियान व पुढील 9 ऑगस्ट रोजी जंतर–मंतर दिल्ली येथे होत असलेल्या आंदोलनाला घेऊन माहिती देत देशभरातून जास्तीत जास्त विद्यार्थी युवकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आहे.

Related posts

Leave a Comment

6 − 6 =