भगतसिंह जनअधिकार पदयात्रा (BSJAY) अंतर्गत परीक्षा आणि भरती मधील पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराविरोधात विशेष अभियान!

‘एन.टी.ए.’ रद्द करा ! तरुणांच्या भविष्यासोबत खेळणे बंद करा!
केंद्र आणि राज्यस्तरीय परीक्षांमध्ये झालेल्या पेपरफुटी आणि भरती मध्ये झालेल्या गदारोळाविरोधात 9 ऑगस्ट रोजी चलो जंतर – मंतर, दिल्ली !
मित्र-मैत्रिणींनो, फॅशिश्ट मोदी सरकारचा कार्यकाळ विद्यार्थी तरुणांसाठी एखाद्या भयानक दुःखद स्वप्नापेक्षा कमी नाही. लोकांच्या घरांवर बुलडोझर चालवणारे हे सरकार आता एन.टी.ए.द्वारे विद्यार्थी-तरुणांच्या भविष्यावर देखील बुलडोझर चालवत आहे. राज्यस्तरीय परीक्षा आणि भरती आयोजित करणाऱ्या संस्थांचा देखील असाच आंधळा कारभार सुरू आहे. केंद्रापासून ते राज्यांपर्यंत अंदाधुंदपणे पेपरफुटी होत आहे, भरती रद्द होत आहेत, घोटाळे होत आहेत आणि भ्रष्टाचार शिगेला पोहचला आहे. अलीकडेच एन.टी.ए. (नॅशनल टेस्टिंग एजंसी) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या नीट यू.जी., यू.जी.सी. नेट, सी.एस.आय.आर. नेट, इत्यादी परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे समोर आले आहेत. ‘नीट यू.जी.’ परीक्षेत झालेला भ्रष्टाचार स्वतंत्र भारताच्या इतिहासातील परीक्षांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यातील सर्वात मोठा घोटाळा सिद्ध झाला आहे. याबाबत काही शंका नाही की सद्यस्थितीत देशातील कोट्यवधी विद्यार्थी-तरुणांच्या आयुष्यासोबत खेळले जात आहे. हे असे भ्रष्टाचार म्हणजे आपले नशीब आहे का? आपल्या भविष्यावर होणाऱ्या ह्या हल्ल्याला आपण असेच मूकदर्शक बनून बघत राहणार आहोत का? नाही! दोस्तांनो, आपल्याला याविरोधात लढायलाच लागेल आणि आपण आपल्या संघटित प्रतिकाराच्या जोरावरच ह्या स्थितीला बदलवू शकतो. परीक्षा आणि भरती यांमध्ये पारदर्शकता आपला हक्क आहे आणि आपण तो मिळवणारच!
परीक्षा आणि भरती यांमध्ये भ्रष्टाचार : डाळीत काळंबेरं नसून सगळी डाळच काळी आहे!
आज एन.टी.ए. असो किंवा राज्यस्तरीय परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्था असोत, या सर्वांनीच विद्यार्थी-तरुणांचा विश्वास पूर्णतः गमावला आहे. यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी काहीही देणे घेणे राहिलेले नाही. मागच्या अनेक वर्षांपासून एन.टी.ए.च्या क्षमतांवर प्रश्न उचलले जात आहेत. कुठल्याही गडबड-गोंधळाशिवाय परीक्षा आयोजित करण्याबाबत ही संस्था पुन्हापुन्हा अयशस्वी सिद्ध होत आहे. एकीकडे एन.टी.ए. तर्फे आयोजित नीट यू.जी. परीक्षेत भ्रष्टाचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत तर एन.बी.इ.एम.एस. तर्फे आयोजित नीट पी.जी. परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. यासोबतच 18 जून रोजी झालेल्या यूजीसी नेट परीक्षेला रद्द करण्यात आले आणि सी.एस.आय.आर. नेट परीक्षेला देखील पुढे ढकलण्यात आले आहे. एन.टी.ए.चे ह्या पद्धतीने घेतलेले निर्णय लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याव्यतिरिक्त दुसरे काही नाही. ह्या परीक्षा पुन्हा झाल्यात तरी याची काही शाश्वती नाही की येणाऱ्या काळात सर्व काही ठीक होईल! आत्तापर्यंत घडलेल्या पेपरफुटीच्या घटनांमधून ना एन.टी.ए.ने आणि ना मोदी सरकारने कुठला धडा घेतला आहे. राज्यस्तरीय परीक्षा मंडळ देखील विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करण्यात कुठेही कमी नाही. मागील दहा वर्षांत 80 पेक्षा जास्त भरत्यांमध्ये पेपरफुटी झाली आहे तर कित्येक भरती रद्द करण्यात आल्या आहेत. आधी अर्ज भरण्यासाठी आपले पैसे खर्च करवले जातात, त्यानंतर आपण परीक्षेसाठी जीवाचं रान करतो आणि शेवटी ह्या गोष्टीची काहीही शाश्वती नसते की पेपरफुटी होणार नाही किंवा भरतीच्या प्रक्रियेत काही गदारोळ होणार नाही. अशा परीक्षांसाठी सुद्धा आपल्याकडून हजारो, लाखो रुपये वसूल केले गेले आहेत ज्यांच्या भरती घोटाळ्यांमुळे रद्द केल्या गेल्यात. वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी घेतल्यानंतर सुद्धा नोकरीची काहीही शाश्वती नाही. प्रत्येक वर्षी 2 कोटी रोजगाराचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारच्या कार्यकाळात 2014 ते 2022 दरम्यान 22,05,99,238 तरुणांनी नोकरीसाठी आवेदन दिले परंतु फक्त 7,22,311 तरुणांच्या ‘नशिबी’ नोकरी आली. सद्यस्थिती बघता देशभरातील सरकारी खात्यात अनेक पदे रिक्त आहेत आणि कोट्यवधी नवीन पदांची निर्मिती केली जाऊ शकते. हीच कारणे आहेत की आज तरुणांमध्ये दिशाहीनता, औदासीन्य आणि आत्मघातकी नैराश्य यांची पकड मजबूत झाली आहे.
एन.टी.ए. म्हणजे ‘नॉन ट्रस्टेबल एजंसी’
नॅशनल टेस्टिंग एजंसीची सुरुवात 2018 मध्ये झाली होती. केंद्रीयस्तरीय परीक्षांसाठी याप्रकारची एखादी संरचना असणे याबाबत पहिल्यांदा 1992 मध्ये ‘प्रोग्राम ऑफ ॲक्शन’ मध्ये बोलले गेले होते. 2010 मध्ये ह्या संरचनेच्या निर्माणाची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली. त्यावेळी आय.आय.टी.च्या संचालकांची एक समिती निवडण्यात आली जिने एन.टी.ए. बनवण्याचा प्रस्ताव दिला. 2013 मध्ये ‘एम.एच.आर.डी.’ च्या सात सदस्यांची एक ‘टास्क फोर्स’ बनवली गेली, जिची मुख्य जबाबदारी होती एन.टी.ए.च्या योजनेला पुढे घेऊन जाण्यासाठी एक परिपक्व योजना बनवणे. 2017 मध्ये त्यावेळच्या अर्थमंत्रींनी आपल्या भाषणात एन.टी.ए.ची घोषणा केली आणि विनीत जोशी यांची महासंचालक म्हणून निवड केली गेली. समकालीन शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी 7 जुलै, 2018 रोजी विविध केंद्रस्तरीय परीक्षा एन.टी.ए. अंतर्गत घेतल्या जाण्याची अधिकृत घोषणा केली.
2018 मध्ये एन.टी.ए. कार्यरत झाल्यानंतर लगेचच परीक्षा प्रक्रियांवर संशय निर्माण होणे सुरू झाले. आत्ताच समोर आलेली नीट, नेट, सी.एस.आय.आर. नेट व इतर परीक्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली अव्यवस्था ही यापूर्वी कधीही नव्हती. असं नाहीये की यापूर्वी परीक्षांमध्ये घोटाळे झाले नव्हते. यापूर्वी देखील अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटी समवेत परीक्षा रद्द होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, परंतु नेट आणि नीट सारख्या परिक्षांमध्ये पेपरफुटी आणि इतक्या मोठ्या स्तरावर तांत्रिक गदारोळ यापूर्वी कधीही झाला नव्हता. इतर परिक्षांमधील घोटाळ्यांना रोखण्याऐवजी मोदी सरकारच्या कार्यकाळात त्या परीक्षांमध्ये सुद्धा गडबड होऊ लागली आहे ज्यांमध्ये घोटाळे झाल्याच्या घटना याआधी कधी घडल्या नव्हत्या. ही सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एन.टी.ए. सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत तिचे जे कुणी महासंचालक राहिले आहेत त्यांचा सरळ संबंध संघ परिवार आणि भाजपासोबत राहिलेला आहे किंवा त्यांच्याशी जवळीक राहिली आहे.
परीक्षांमध्ये घोटाळे आता अपवाद नव्हे तर नियम बनले आहेत.
कोट्यावधी विद्यार्थ्यांचे भविष्य दावणीला टांगले असतांना परीक्षेवर चर्चा करणारे मोदीजी तोंडाला कुलूप लावून गप्प बसले आहेत. परीक्षांमध्ये झालेले घोटाळे, पेपरफुटी ही कुठली अचानक घडलेली घटना नसून यामागचे वास्तव अत्यंत गंभीर आणि सखोल आहे. मागील 10 वर्षांच्या दरम्यान देशभरात ऐंशीहून अधिक पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत, कित्येक परीक्षांना पुढे ढकलले गेले आहे. अनेक घटनांमध्ये विद्यार्थी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या फेऱ्या मारत आहेत. मागच्या दहा वर्षांत पेपरफुटी आणि घोटाळ्यांमुळे कोट्यवधी विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे आणि लाखो विद्यार्थी औदासीन्य आणि नैराश्याचे शिकार झाले आहेत आणि अनेकांनी आत्महत्येसारखे पाऊल देखील उचलले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर घोटाळे होऊन सुद्धा मोदी सरकार आणि त्यांच्या सर्व संस्थांनी आत्तापर्यंत तपासणीच्या नावाखाली लपवालपवी करण्याचेच काम केले आहे. प्रत्येकवेळी अशा घटना घडल्यानंतर मोठमोठी भाषणं आणि खोटे वायदे केले जातात. काही लहान-मोठ्या कर्मचाऱ्यांच्या, काही विद्यार्थ्यांच्या माथी याची संपूर्ण जबाबदारी मारून अत्यंत धूर्तपणे खऱ्या गुन्हेगारांना वाचवले जाते. हेच कारण आहे की मोदी सरकारच्या शासनकाळात आत्तापर्यंत नीट यूजी आणि नेटच्या बाबतीत ना कुठली मोठी अटक झाली आहे ना कुठली खास कारवाई झाली आहे.
दिल्ली, कोटा, अलाहाबाद, बनारस, पटना, हैदराबाद, पुणे, चंदीगड, रोहतक सारख्या अनेक शहरांमध्ये कोचिंगच्या नावावर विद्यार्थ्यांसोबत जो करार केला जातो तो कुणापासूनही लपलेला नाही. ह्या व्यवस्थेने आपल्याला परीक्षा देऊन एखाद्या नोकरीमागे एकमेकांचे पाय खेचत पुढे धावण्याच्या चढाओढीत ढकलून दिले आहे. तयारीसाठी लाखो रुपये खर्च करून सुद्धा विद्यार्थी जेव्हा आपली मेहनत वाया जातांना बघतात तेव्हा त्यांचे नैराश्याच्या कवेत शिरणे सहाजिकच आहे. देशातल्या विद्यार्थ्यांच्या एकूण लोकसंख्येपैक्की एक मोठी संख्या अशा विद्यार्थ्यांची आहे ज्याचे पालक पोटाला चिमटा देऊन त्यांना शिकवत आहेत. जो विद्यार्थी एका एका पैश्यासाठी काटकसरीने जीवन जगत असेल त्याला परीक्षा देण्यासाठी प्रवासाचे भाडे खर्च करवून वणवण भटकण्यासाठी भाग पाडणे म्हणजे त्याच्या जीवन जगण्याच्या अधिकारावर चढवलेला हल्ला नाही का? अभ्यास-तयारी-परीक्षा-भरती ह्या संपूर्ण प्रक्रियेमधून जातांना आपण कुठल्या प्रकारच्या मानसिक तणावातून जातो हे फक्त आपणच समजू शकतो. असतो का असा एखादा दिवस ज्यात कोणतातरी एक विद्यार्थी आपला जीव कायमचा गमावून बसत नाही? विद्यार्थ्यांमध्ये असलेला तणाव आणि नैराश्य याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आजची परीक्षा व्यवस्था आणि भरतीची प्रक्रिया!
दोस्तांनो, ही जीवघेणी व्यवस्था आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना हताशा, नैराश्य आणि आत्मदाहक औदासीन्यच देऊ शकते. फक्त आपणच नाही तर आपले पालक आणि जवळचे लोकं कुठल्या मानसिक तणावातून जातात हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. परंतु कुणी मरो अथवा जगो देशाच्या नेत्यामंत्र्यांना आणि नोकरशाहीला ह्या गोष्टीने काहीही फरक पडत नाही कारण त्यांच्या मुला-मुलींचे आयुष्य तर आधीपासूनच सुरक्षित झाले आहे. यांच्या मुला-मुलींना तर पद आणि खुर्ची फुकटात मिळते. अमित शाहाच्या मुलाने बी.सी.सी.आय.चा सेक्रेटरी बनण्यासाठी कोणती परीक्षा दिली होती? परदेशात शिकणारे नेते-नोकरशहा मंडळींच्या मुलांकडे काही विशेष प्रतिभा असते का? नाही! मित्रांनो, आपल्या भविष्याशी खेळणाऱ्यांच्या मुलांचे भविष्य तर शिखरावर असते आणि त्यांचे कुटुंब पूर्णतः सुरक्षित असते. परीक्षा व्यवस्था आणि भरती प्रक्रियेचे सगळे प्रतिकूल परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात!
भविष्याच्या अनिश्चिततेमुळे विद्यार्थी-तरुण आणि पालक कुठल्याही किमतीवर आपल्या भविष्याला सुरक्षित करू इच्छितात. ह्याच वाढत्या असुरक्षिततेचा फायदा शिक्षण माफिया उचलतात आणि शासकीय यंत्रणेवर असलेल्या आपल्या पकडीच्या जोरावर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा व्यापार करून कोट्यवधी रुपये कमावतात. पेपरफुटी किंवा घोटाळा करणे हे सामान्य विद्यार्थ्यांसाठी अशक्य आहे. सत्य तर हे आहे की नेते, अधिकारी, शिक्षण माफिया यांच्या संगनमताशिवाय भ्रष्टाचाराचे याप्रकारचे तंत्र अस्तित्वात येऊच शकत नाही. एन.टी.ए.तर्फे परीक्षा करवण्यासाठी प्रश्नपत्रिका छापण्यापासून ते परीक्षा केंद्रापर्यंतचे अनेक कंत्राटं खाजगी कंपन्यांना देण्यात येतात. अनेकदा या कंपनी शिक्षण माफिया, नोकरशहा आणि नेत्यांच्या छत्रछायेखालीच प्रश्नपत्रिका फोडण्याचे काम करतात. आता याचे अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. नीट घोटाळ्याच्या बाबतीत पटनामध्ये अनुराग यादव नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती परीक्षेच्या एका रात्रीपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अतिथीगृहात कुण्या मंत्र्याच्या शिफारशीवर थांबला होता. यातून हे स्पष्ट आहे की ह्या घोटाळ्यात बिहारच्या जदयू-भाजपा प्रणित सरकारचा कुणी मंत्री सुद्धा सामील आहे. सहाजिकच नेतेमंडळींच्या अशा सहभागाने चौकशी सुद्धा प्रभावित होते. उत्तरप्रदेश पोलीस आणि आरओ-एआरओ परीक्षा प्रश्नपत्रिका छापखान्यातून गहाळ करण्यात आली होती. अलीकडेच यूपीपीसीएसजे च्या मुख्य परीक्षेत सुद्धा उत्तरपत्रिका बदलण्याचा प्रकार समोर आला आहे. 2017 मध्ये झालेल्या सीबीएसईच्या पेपरफुटीमध्ये कोचिंग संचालक आणि एबीव्हीपीच्या संयोजकांसहित 15 लोक सामिल होते. नोकऱ्यांमध्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीत व्यापम घोटाळ्याचे ‘खुले गुपित’ खचितच कुणापासून लपले असेल जेव्हा मध्यप्रदेशात समकालीन भाजपा सरकार आणि शिवराज सिंह चौहानच्या शासनकाळात सर्व साक्षीदार संशयपूर्ण परिस्थितीत मारले गेले. मागच्या 10 वर्षांत भाजपाने शैक्षणिक संस्थांमध्ये अनेक अकार्यक्षम आणि पात्र नसलेल्या लोकांना घुसवले आहे ज्यांचा भ्रष्टचाराव्यतिरिक्त दुसरे काहीही करण्याचा मानस नसतो. प्रश्नपत्रिका बनवण्यापासून ते परीक्षेच्या आयोजनापर्यंत अशा खाजगी कंपन्यांना कंत्राटं दिले जातात ज्यांच्यावर आधीपासूनच अनेक आरोप असतात. ही बाब आता दिवसाच्या लख्ख प्रकाशाप्रमाणे स्पष्ट झाली आहे की परीक्षा आणि नोकऱ्यांमध्ये होणारे घोटाळे सरकारी प्रणालीच्या संगनमताशिवाय शक्य नाही.
परीक्षा आणि भरतीप्रक्रिया यांमधील पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराविरोधातील अभियानात सामील व्हा!
मित्र-मैत्रिणींनो, दिशा विद्यार्थी संघटना आणि नौजवान भारत सभेने हे विशेष अभियान सुरू केले आहे. याचे उद्दिष्ट परीक्षा आणि भरतीप्रक्रिया यांमध्ये व्यापक स्तरावर होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात विद्यार्थी तरुणांना संघटित करणे आहे. आम्ही हजारोंच्या संख्येने 9 ऑगस्ट रोजी देशाच्या राजधानी असलेल्या दिल्लीतील जंतर मंतर येथे जमणार आहोत. इथूनच आम्ही आपला एकजूट आवाज सत्तेपर्यंत पोहचवू. आम्ही ह्या फॅशिश्ट सत्तेला विद्यार्थी तरुणांच्या भविष्याशी खेळताना नाही बघू शकत. दावणीला जुंपलेल्या बैलाप्रमाणे कोचिंग संस्था आणि परीक्षा केंद्रांवर फेऱ्या मारणे हे आपले प्रारब्ध नाही. आपण एका चांगल्या जीवनाच्या आशेत जगतो परंतु आपल्या तारुण्याची बहुमोल वर्षे ही व्यवस्था उध्वस्त करत आहे. आज क्षमता आणि यशालासुद्धा विकला जाणारा माल बनवले गेले आहे ज्याला पैशांच्या जोरावर कुणीही विकत घेऊ शकतं. ह्या आंधळ्या कारभाराविरोधात त्यांनाच पुढे यायला लागेल ज्यांच्या भविष्याला तुडवले जात आहे आणि ज्यांच्या स्वप्नांना चिरडले जात आहे. जर आपण आजही संघर्षाचे बिगुल फुंकले नाही तर आपण आपल्या कित्येक मित्रांना असचं आपल्यापासून दुरावतांना बघत राहू आणि ह्या नैराश्याने भरलेल्या वातावरणात कुणास ठाऊक पुढचा क्रमांक आपलाच असेल!
मित्रांनो, आपण हे मानून चालणार आहोत काय की परीक्षा व्यवस्था आणि भरती प्रक्रिया यांमध्ये बोकाळलेल्या भ्रष्टाचारामुळे ज्या विद्यार्थ्यांचा जीव गेला आहे त्यात सरकारची काहीही एक जबाबदारी नाही? हजारो विद्यार्थ्यांना नैराश्याच्या गर्तेत जातांना पाहून आपले रक्त उसळत नाही का? जर तुम्ही ह्या सर्व प्रश्नांवर विचार करत असाल तर चला! ह्या फॅशिश्ट सत्तेला विद्यार्थ्यांच्या एकजुटीच्या ताकदीचा पुन्हा एकदा परिचय करवून देऊ! एकदा पुन्हा आपण आपल्या मागण्यांना घेऊन उठून उभे राहुयात जेणेकरून हे सरकार येणाऱ्या दिवसांत विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळू शकणार नाही!
मित्र-मैत्रिणींनो, हे अभियान परीक्षा आणि भरती सारख्या आपल्या आयुष्याशी जोडलेल्या मूलभूत मुद्यांशी निगडित आहे. याला यशस्वी बनवण्यात आपले संपूर्ण सहकार्य करा! याअंतर्गत स्वाक्षरी अभियानात उत्स्फूर्तता दाखवत भागीदारी करा! यासाठी त्यागाच्या भावनेसह शक्य तितके अधिक आर्थिक सहकार्य करा! ही आपल्या भविष्याला वाचवण्याची लढाई आहे त्यामुळे आपण देखील यात नक्की सामील व्हा! अभियान चालवणाऱ्या टीम्सला तुमचा संपर्क क्रमांक द्या आणि पत्रक वाचून त्यात दिलेल्या क्रमांकांवर स्वतः संपर्क करा! परीक्षा आणि भरत्यांची सद्यस्थिती म्हणजे काही आपले भाग्यलिखित नाही! ह्या परिस्थितीला बदलता येऊ शकते आणि निश्चितच आपण ती बदलवणारच! परीक्षा आणि भरती यांमध्ये पारदर्शकता आपला मूलभूत अधिकार आहे आणि तो आपण मिळवणारच!
आमच्या मागण्या :
1. एन.टी.ए.ला तत्काळ रद्द करुन परीक्षा आयोजनाची प्रभावी आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था विकसित केली जावी.
2. राज्यांत भरती आयोजित करणाऱ्या संस्थांच्या कार्यप्रणाली त्वरित दोषमुक्त करण्यात याव्यात!
3. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, इत्यादी क्षेत्रांतील पदांना तत्काळ दहापटीने वाढवण्यात यावे.
4. पेपरफुटी आणि भरती यांमध्ये भ्रष्टाचारासाठी दोषी असलेल्या व्यक्ती, अधिकारी, नेतेमंडळी यांच्यावर कठोर कलमं लावून गुन्हे दाखल करून त्यांना कठोरतम शिक्षा करण्यात यावी.
5. प्रश्नपत्रकांची छपाई खाजगी छापखान्यांमधून न करता सरकारी छपाईखान्यांमधून केली जावी.
6. परिक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांमुळे प्रभावीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या नुकसानीचे मूल्यांकन करून त्यांना योग्य ती भरपाई देण्यात यावी.
7. केंद्र आणि राज्य विभागांतील रिक्त पदांना तत्काळ आणि ठराविक कालमर्यादेत भरण्यात यावे.
8. कंत्राटीकरण आणि जुजबीकरणावर रोख लावून सर्व कर्मचाऱ्यांना पक्के केले जावे.
9. सर्वांसाठी समान तसेच निःशुल्क शिक्षण आणि सर्वांसाठी रोजगाराची सोय करण्यात यावी.
10. ‘भगतसिंह राष्ट्रीय रोजगार हमी कायदा’ पारित करण्यात यावा.
11. घटनादुरुस्ती करून शिक्षण-रोजगार-आरोग्य-निवासाला मूलभूत अधिकार बनवण्यात यावा.
– क्रांतिकारी अभिवादनासहित
दिशा विद्यार्थी संघटना
नौजवान भारत सभा
भगतसिंह जनअधिकार पदयात्रा (BSJAY)
संपर्क : दिल्ली : 9852838689, 9971672425 उत्तरप्रदेश : 9891951393, 8858288593 हरियाणा : 8010156365, 9992130268 चंदिगढ: 8196803093 बिहार : 6297974751, 7070571498 महाराष्ट्र : 8956840785, 8826265960 उत्तराखंड : 7042740669 तेलंगणा : 7013936466 आंध्रप्रदेश: 9052244546, 9133844498
Facebook : @disha.studentsorg @naubhas @bsjayatra
Instagram : @disha.studentsorg @nbs.naujawan_bharat_sabha @bsjayatra

Related posts

Leave a Comment

seventeen + 20 =