7 जुलै रोजी, नौभासतर्फे साठे नगरमधील शहीद सुखदेव फिरत्या वाचनालयाचे नियमित वाचक आणि शहीद राजगुरु शिक्षण सहाय्यता केंद्रात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “द लेजेंड ऑफ भगतसिंह” चित्रपटाचे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांच्या जीवनावर आणि संघर्षावर आधारित हा चित्रपट नौभासतर्फे वेगवेगळ्या ठिकाणी नियमितपणे दाखवला जातो कारण हा चित्रपट आपल्या क्रांतिकारकांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करतो. जेव्हा प्रतिगामी शक्ती त्यांच्या द्वेषाच्या राजकारणाचे बीज विद्यार्थी तरुणांमध्ये पेरण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत तेव्हा जात, धर्म, वर्गाची भिंत मोडून एका समान आणि न्याय्य समाजासाठी संघर्ष कसा उभा करायचा हा विचार आणि शहीदांचा आदर्श जनसामान्यांमध्ये आणि विशेषतः मुलांमध्ये रुजविणे गरजेचे आहे. आपण पाहतोच की टेलिव्हिजन, चित्रपट, सोशल मीडिया इत्यादींच्या माध्यमातून जो द्वेष पसरवला जात आहे त्याचा आज मुलांच्या मनावर वाईट प्रभाव पडत आहे. अशात त्यांना आपल्या शहीदांची आणि त्यांच्या क्रांतीकारी विचारांची आठवण करून देणे अत्यंत आवश्यक आहे. चित्रपटाच्या स्क्रिनिंग नंतर मुलांनी चित्रपटातून शिकलेल्या गोष्टींबद्दल चर्चा केली – त्यांनी मांडले की अन्याय झाल्याचे पाहून सुद्धा गप्प बसणे चुकीचे आहे आणि जे काही शिकवले जाते, सांगितले जाते आहे त्यावर प्रश्न विचारणे गरजेचे आहे. स्क्रीनिंगच्या शेवटी नौभासच्या सदस्यांनी क्रांतीकारी गीते सादर केली त्यात मुलांनीही त्यांना साथ दिली.
नौभास मानखुर्द-गोवंडी, मुंबईतील वेगवेगळ्या भागात शिक्षण सहाय्यता केंद्र आणि फिरते वाचनालय चालवते.
नौभासमध्ये सामील होण्यासाठी संपर्क करा –
7667230795, 9930095381
