नौजवान भारत सभेद्वारे मानखुर्द, मुंबई येथे मुसळधार पावसात देखील सुरू आहे ‘शहीद सुखदेव फिरते वाचनालय!’

घराघरात प्रगतिशील साहित्य पोहचवण्यासाठी पुढे या! स्वयंसेवी बना! आर्थिक सहयोग करा! पुस्तके द्या!!
नौजवान भारत सभेतर्फे चालवण्यात येणारे फिरते वाचनालय मागील काही वर्षांपासून निरंतरपणे मानखुर्द गोवंडी येथील वेगवेगळ्या भागांत सुरू आहे. त्याचाच आता विस्तार करत ते इतर भागांत देखील सुरू करण्यात आले आहे. रील्स (Reels) आणि सोशल मीडियाच्या काळात विद्यानासोबत जोडलेली बरीच माहिती, गोष्टी, कविता आणि अभ्यासापासून मुलांना नियोजित पद्धतीने दूर ढकलले जात आहे, ज्यामुळे लहानपणापासूनच मुलांची बौद्धिक आणि सांस्कृतिक स्तरावर घसरण होत आहे. अशात अत्यंत गरजेचे आहे की शक्य ते प्रयत्न करून मुलांना वैज्ञानिकदृष्ट्या परिपक्व आणि एक संवेदनशील माणूस बनवणे! त्यासाठीच अशी प्रगतिशील पुस्तके आणि फिरती वाचनालये मोठ्या प्रमाणावर सुरू करणे गरजेचे आहे. म्हणूनच मुंबईतील मुसळधार पावसात सुद्धा नौभास शहीद सुखदेव फिरते वाचनालय मानखुर्द गोवंडीच्या वस्त्यांमध्ये चालवत आहे.
नौजवान भारत सभा मानखुर्द येथे शहीद भगतसिंह वाचनालय चालवत आहे जिथे नौभासतर्फे नियमितरित्या चर्चासत्रे, फिल्म स्क्रिनिंग, इत्यादी उपक्रम घेतले जातात. तसेच आम्ही 9 वी पासून पुढच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका देखील चालवत आहोत.
स्वयंसेवी बनण्यासाठी संपर्क : 7667230795, 9930095381

Related posts

Leave a Comment

2 × three =