2 जुलै, 2024 रोजी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे नौभासतर्फे पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला. नौभास आपल्या क्रांतीकारी शहिदांच्या, ज्यांनी एका न्याय्य समाजाच्या निर्मितीसाठी आपले प्राण वेचले, विचारांच्या प्रचार प्रसारासाठी देशभरात 13 राज्यांमध्ये काम करत आहे. आज देशात बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, तसेच जागतिक तापमानवाढीमुळे वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, इत्यादींनी थैमान घातलं आहे. ह्या सर्व मुद्द्यांपासून आपल्यात जाती धर्माच्या राजकारणाचे विष पेरण्याचं काम फॅशिश्ट शक्ती सातत्याने करत आहेत. हा भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांच्या स्वप्नातला भारत नव्हे! यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे ही स्थिती, व्यवस्था समजून घेणे आणि त्यासाठी क्रांतिकारकांनी लिहून ठेवलेली पुस्तके वाचणे! म्हणून नौभास क्रांतिकारकांचे लेख लोकांपर्यंत पोहचावेत म्हणून देशभरात पुस्तकांचे स्टॉल्स लावत असते.
प्रगतिशील विद्यार्थी आणि तरुणांना जमिनीवर काम करण्याचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे जर आपल्याला प्रतिक्रियावादी शक्तींना, ज्या आज भांडवली प्रसारमाध्यमं आणि जमिनीवरच्या कामांमुळे त्यांचे फसवे, खोटे मुद्दे लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करतात, मात द्यायची असेल तर. म्हणून नौभास सर्व न्यायप्रिय तरुणांना एका समतामूलक, न्याय्य समाजाच्या निर्मितीसाठी पुढे येण्याचे आवाहन करत आहे.
जोडून घेण्यासाठी/ सामील होण्यासाठी संपर्क करा :- 7667230795
