नौजवान भारत सभेतर्फे मुंबईतील शहीद भगतसिंह वाचनालयासाठी आर्थिक सहाय्य उभे करत साप्ताहिक अभियाने चालवले जात आहेत!

मित्रांनो, नौभास मानखुर्द, मुंबईतील कष्टकरी वस्ती असलेल्या साठे नगरच्या भागात शहीद भगतसिंह वाचनालय चालवते. जिथे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्र चालवले जाते तसेच नियमितरित्या विविध विषयांवर चर्चासत्रे, फिल्म स्क्रिनिंग आयोजित केले जातात. मानखुर्दमधील इतर भागांत आम्ही शहीद सुखदेव फिरते वाचनालय चालवतो ज्याद्वारे भगतसिंहांच्या पुस्तकांसोबतच इतिहास, भूगोल, इत्यादी विषयांची पुस्तके, जगभरातील प्रगतिशील साहित्य आम्ही घरोघरी पोहचवण्याचा प्रयत्न करतो. नौभासची ही सर्व कामे कुठल्या सरकारी अनुदानावर किंवा कंपन्यांच्या सी.एस. आर फंडस् द्वारे पैसे उभे करून चालत नाही तर मानखुर्दमधील कष्टकरी जनता आणि प्रगतिशील व्यक्तींच्या बळावर चालतात. आम्ही एन. जी.ओ. नाही…

भगतसिंह जनअधिकार पदयात्रा (BSJAY) अंतर्गत परीक्षा आणि भरती मधील पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराविरोधात विशेष अभियान!

‘एन.टी.ए.’ रद्द करा ! तरुणांच्या भविष्यासोबत खेळणे बंद करा! केंद्र आणि राज्यस्तरीय परीक्षांमध्ये झालेल्या पेपरफुटी आणि भरती मध्ये झालेल्या गदारोळाविरोधात 9 ऑगस्ट रोजी चलो जंतर – मंतर, दिल्ली ! मित्र-मैत्रिणींनो, फॅशिश्ट मोदी सरकारचा कार्यकाळ विद्यार्थी तरुणांसाठी एखाद्या भयानक दुःखद स्वप्नापेक्षा कमी नाही. लोकांच्या घरांवर बुलडोझर चालवणारे हे सरकार आता एन.टी.ए.द्वारे विद्यार्थी-तरुणांच्या भविष्यावर देखील बुलडोझर चालवत आहे. राज्यस्तरीय परीक्षा आणि भरती आयोजित करणाऱ्या संस्थांचा देखील असाच आंधळा कारभार सुरू आहे. केंद्रापासून ते राज्यांपर्यंत अंदाधुंदपणे पेपरफुटी होत आहे, भरती रद्द होत आहेत, घोटाळे होत आहेत आणि भ्रष्टाचार शिगेला पोहचला आहे. अलीकडेच एन.टी.ए.…

शिक्षण सहायता मंडळाची सुरुवात – अहमदनगर

नौजवान भारत सभा (अहमदनगर) युनिटच्या वतीने गेल्या मागील चार वर्षापासून शिक्षण सहायता मंडळ चालवण्यात येत आहे. उन्हाळी सुट्टी नंतर पुन्हा नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षण सहायता मंडळाची सुरुवात करण्यात आली आहे. आज देशात शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे बहुसंख्य कामगार कष्टकरी वर्गातून येणाऱ्या मुलांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. शाळांच्या वाढत्या फी, महागडे कोचिंग क्लासेस मुळे विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेतून बाहेर फेकले जात आहेत अशा परिस्थितीत फक्त 24 टक्के विद्यार्थीच उच्च शिक्षणापर्यंत पोहोचतात. “नौजवान भारत सभेच्या” वतीने देशाच्या विविध भागातील कामगार वस्त्यांमध्ये शिक्षण सहायता केंद्र चालवले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांना फक्त परिक्षेपुरतं शिकवणे हा उद्देश नसून…

नौजवान भारत सभेतर्फे शहीद भगतसिंह वाचनालय, मानखुर्द, मुंबई येथे फिल्म स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले.

7 जुलै रोजी, नौभासतर्फे साठे नगरमधील शहीद सुखदेव फिरत्या वाचनालयाचे नियमित वाचक आणि शहीद राजगुरु शिक्षण सहाय्यता केंद्रात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “द लेजेंड ऑफ भगतसिंह” चित्रपटाचे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांच्या जीवनावर आणि संघर्षावर आधारित हा चित्रपट नौभासतर्फे वेगवेगळ्या ठिकाणी नियमितपणे दाखवला जातो कारण हा चित्रपट आपल्या क्रांतिकारकांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करतो. जेव्हा प्रतिगामी शक्ती त्यांच्या द्वेषाच्या राजकारणाचे बीज विद्यार्थी तरुणांमध्ये पेरण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत तेव्हा जात, धर्म, वर्गाची भिंत मोडून एका समान आणि न्याय्य समाजासाठी संघर्ष कसा उभा करायचा हा…

जनता वसाहत, पुणे येथे शिक्षण सहायता केंद्राची नवीन शैक्षणिक वर्षात नव्याने सुरुवात!

‘जनतेची सेवा करा’ या तत्वाला समोर ठेवून नौजवान भारत सभा देशाभरात विविध राज्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सहायता केंद्र, आझाद स्पोर्ट्स क्लब, फिरते वाचनालय यांसारखे विविध उपक्रम राबवते. शिक्षण सहायता केंद्रामध्ये कामगार-कष्टकरी पार्श्वभूमीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल इत्यादी विषयांत अवघड जाणार्‍या संकल्पना सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावल्या जातात, अभ्यास करवून घेतला जातो. एकंदरीतच देशभरात शिक्षणाचा ढासळलेला शिक्षणाचा दर्जा, कामगार-कष्टकऱ्यांच्या आर्थिक आवक्याबाहेर गेलेले दर्जेदार शिक्षण, मोफत शिक्षणाचा अभाव यांमुळे शाळेत शिकून देखील विद्यार्थ्यांना अतिरिक्त वर्गांची गरज पडते. अनेकवेळा हजारो रुपये खर्च करून लावलेल्या खाजगी शिकवण्या पालकांचा खिसा रिकामा करण्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या…

नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे लावण्यात आला प्रगतिशील, क्रांतीकारी पुस्तकांचा स्टॉल!

2 जुलै, 2024 रोजी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे नौभासतर्फे पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला. नौभास आपल्या क्रांतीकारी शहिदांच्या, ज्यांनी एका न्याय्य समाजाच्या निर्मितीसाठी आपले प्राण वेचले, विचारांच्या प्रचार प्रसारासाठी देशभरात 13 राज्यांमध्ये काम करत आहे. आज देशात बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, तसेच जागतिक तापमानवाढीमुळे वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, इत्यादींनी थैमान घातलं आहे. ह्या सर्व मुद्द्यांपासून आपल्यात जाती धर्माच्या राजकारणाचे विष पेरण्याचं काम फॅशिश्ट शक्ती सातत्याने करत आहेत. हा भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांच्या स्वप्नातला भारत नव्हे! यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे ही स्थिती, व्यवस्था समजून घेणे आणि त्यासाठी क्रांतिकारकांनी लिहून…

नौजवान भारत सभेद्वारे मानखुर्द, मुंबई येथे मुसळधार पावसात देखील सुरू आहे ‘शहीद सुखदेव फिरते वाचनालय!’

घराघरात प्रगतिशील साहित्य पोहचवण्यासाठी पुढे या! स्वयंसेवी बना! आर्थिक सहयोग करा! पुस्तके द्या!! नौजवान भारत सभेतर्फे चालवण्यात येणारे फिरते वाचनालय मागील काही वर्षांपासून निरंतरपणे मानखुर्द गोवंडी येथील वेगवेगळ्या भागांत सुरू आहे. त्याचाच आता विस्तार करत ते इतर भागांत देखील सुरू करण्यात आले आहे. रील्स (Reels) आणि सोशल मीडियाच्या काळात विद्यानासोबत जोडलेली बरीच माहिती, गोष्टी, कविता आणि अभ्यासापासून मुलांना नियोजित पद्धतीने दूर ढकलले जात आहे, ज्यामुळे लहानपणापासूनच मुलांची बौद्धिक आणि सांस्कृतिक स्तरावर घसरण होत आहे. अशात अत्यंत गरजेचे आहे की शक्य ते प्रयत्न करून मुलांना वैज्ञानिकदृष्ट्या परिपक्व आणि एक संवेदनशील माणूस…

“पर्चा लीक घोटाला और शिक्षा व्यवस्था”

दिनाँक 23 जून 2024 देशभर के परीक्षाओं में हो रही धाँधली और पर्चा लीक के मुद्दे पर नौजवान भारत सभा, मुम्बई द्वारा “पर्चा लीक घोटाला और शिक्षा व्यवस्था” इस विषय पर परिचर्चा सत्र आयोजित किया गया। परिचर्चा में प्रतियोगी परीक्षाओं में पर्चा लीक होने, परीक्षा केन्द्र पर होते भ्रष्टाचार, परिणामों में हो रही धाँधली और कुल मिलाकर आज की शिक्षा व्यवस्था के बारे में बातचीत हुई। साथी शशांक ने सबसे पहले हालिया दिनों में NEET UG, UGC-NET, CSIR-UGC-NET और फिर NEET PG की परीक्षाओं में हुई धाँधली और पर्चा लीक…

Down with the Anti-student Modi government!! Down with the system that plays with the future of students and youths!!

Naujawan Bharat Sabha participated in the protest demonstration organized at Mumbai University by Disha students organisation against recent paper leaks in the UGC-NET, NEET examinations. The protest was attended by students and youths coming from different fields of education and professions in solidarity with the students whose futures have been played with and against the anti-student character of the present Fascist Modi government. Members of Naujawan Bharat Sabha, while talking to students saw a greal deal of frustration, anger and disappointment in them. The students were appealed to join the…

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या!! एन. टी. ए. खारीज करा!

गेल्या काही दिवसांपासून देशभरात गाजत असलेल्या NEET-UG परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात आणि नुकत्याच समोर आलेल्या यूजीसी नेट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात पुणे येथे नौजवान भारत सभा व दिशा विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे विरोध प्रदर्शन आयोजित करण्यात आले. 33 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अनिश्चिततेत व अंधकारात ढकलणारे हे घोटाळे काही पहिले घोटाळे नाहीत. या घोटाळ्यांमध्ये प्रस्थापित राजकारण्यांपासून तर अधिकारी वर्ग सुद्धा सहभागी आहे. हे घोटाळे बंद करून पारदर्शक पद्धतीने परीक्षा पद्धती लागू व्हावी व घोटाळेबाज लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी, शिक्षणाचे खाजगीकरण बंद करावे इत्यादी मागण्यांसह आज 23 जून रोजी नौजवान भारत सभा व दिशा…