दि. २५ ऑगस्ट रोजी नौजवान भारत सभा द्वारे क्रांतीकारी शहीद राजगुरू यांच्या १११ व्या जयंती निमित्त मानखुर्दमध्ये अभियान चालविण्यात आले.

दरम्यान जागोजागी चौक सभा घेण्यात आल्या व पत्रके वाटण्यात आले. राजगुरू, भगतसिंग, चंद्रशेखर आजाद, सुखदेव, अश्फाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल अशा अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. पण प्रश्न आहे या सर्व क्रांतीकारकांना ज्या जसा स्वतंत्र भारत आज स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतर देखील निर्माण होऊ शकला नाही. क्रांतीकारकांची स्पष्ट भूमिका होती की, काँग्रेस आणि गांधीच्या नेतृत्वामध्ये जे स्वातंत्र्य मिळणार आहे. ते स्वतंत्र अर्धवट स्वतंत्र असेल, त्यामुळे मूठभर इंग्रज निघून जातील आणि भारतीय भांडवलदार, उद्योगपतींचे राज्य येईल आणि स्वतंत्र्या नंतर देखील हे शोषणाचा तंत्र याच पद्धतीने चालू राहील. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्यासाठी…

क्रांतिकारी शहीद राजगुरू यांच्या १११ व्या जयंती निमित्त

राजगुरू यांच्यासारख्या क्रांतिकारकांचे स्वप्न एक शोषणमुक्त, समतामूलक, धर्मनिरपेक्ष, समाजाचे निर्माण करणे हे होते. पुढे चालून एका निश्चित वैचारिक विकासानंतर आपले ध्येय स्पष्टपणे आपल्या संघटनेच्या नावात असायला पाहिजे. त्यामुळे ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनेच्या नावात बदल करत सोशलिस्ट (समाजवाद) शब्द या सर्व क्रांतिकारकांनी जोडला आणि या क्रांतिकारी संघटनेचे नाव ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ म्हणजे एच.एस.आर.ए. (HSRA) असे ठेवण्यात आले. फक्त स्वतंत्र नाही तर नफ्या-तोट्यावर आधारित समाजव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन, कामगार वर्गीय सत्तेचे निर्माण, म्हणजेच ‘क्रांती’ हे त्यांचे ध्येय होते.

दि.१८/०८/२०१९ रोजी ‘नौजवान भारत सभा’ द्वारे साठेनगर, मानखुर्द (मुंबई) येथे ‘भारतीय स्वातंत्र्याचे ७२ वर्ष आणि कलम ३७० चा प्रवास…’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले

आज दि.१८/०८/२०१९ रोजी ‘नौजवान भारत सभा’ द्वारे साठेनगर, मानखुर्द (मुंबई) येथे ‘भारतीय स्वातंत्र्याचे ७२ वर्ष आणि कलम ३७० चा प्रवास…’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. दरम्यान ‘नौवजवान भारत सभा’ कडून अविनाश ने प्रास्ताविक करत असताना गेल्या ७२ वर्षांमध्ये स्वातंत्र्यानंतर देशाची परिस्थिती व आजच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संदर्भामध्ये म्हणणे मांडत असताना. आज सुद्धा बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव, उपासमार, वाढती सांप्रदायिकता, कामगार कपात व ऑटोमोबाईल सेक्टर पासून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वाढत असलेली मंदी व डबघाईस आलेली देशाची परिस्थिती असे असताना बीजेपी सरकारने ‘माहितीचा अधिकार’ (आरटीआय) संपवणे, यूएपीए सारखे अन्यायकारी कायदे सक्तीने…

दिनांक ०१/०८/२०१९ रोजी साठेनगर,मानखुर्द, मुंबई येथे ‘लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे शिक्षण सहायत केंद्र’ चा उद्घाटन समारंभ पार पडला.

दिनांक ०१/०८/२०१९ रोजी साठेनगर,मानखुर्द, मुंबई येथे *लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे शिक्षण सहायत केंद्र* चा उद्घाटन समारंभ पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन स्थानिक महिलांच्या हस्ते करण्यात आले. कॉम्रेड नागेश धुर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व कॉम्रेड बबन ठोके यांनी शिक्षणाचे महत्व सांगत आपल्या साठेनगर सारख्या झोपडपट्टी मध्ये शिक्षणाच्या अभावामुळे होणाऱ्या दुर्दशेवर बोट ठेवले. तर आज आपल्याला जे शिक्षण मिळते ते पूर्णपणे भांडवली व नफा-तोटा यावर आधारित शिक्षण आहे आणि ज्यांच्याकडे जेवढा पैसा त्यांना त्या पद्धतीचे शिक्षण असं सूत्र प्रस्थापीत व्यवस्थेने तयार करून ठेवले आहे. खरंतर सर्वांना समान व मोफत शिक्षण मिळायला पाहिजे…

झुंजार जनएकजूट अभियान – गरीबी, शिक्षणाचा अभाव ,बेरोजगारीच्या कारणांना ओळखा!

शहिदे आजम भगतसिंह यांनी म्हटले होते की सामान्य गरीब कष्टकरी जनतेचा एकच धर्म असतो – वर्गीय एकजूट! आपल्याला सर्व प्रकारच्या धार्मिक कट्टरपंथियांना नाकारावे लागेल आणि त्यांच्या विरोधात लढावे लागेल. आपल्याला शपथ घ्यावी लागेल की आपण आपल्या गल्लीबोळात, मोहल्ल्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कट्टरपंथियांना सांप्रदायिक उन्माद भडकवू देणार नाही आणि त्यांना पिटाळून लावू!

सावित्रीबाई फुले जयंती – नव्या ज्ञानबंदीच्या विरोधात, सर्वांना मोफत शिक्षणासाठी, कटिबध्द होऊयात…!

सावित्रीबाई स्वतःच्या प्रयत्नातून साक्षर झाल्या, पुढे शिक्षकही झाल्या. सामाजिक प्रश्नांबाबत तर त्यांनी अतिशय क्रांतिकारी भूमिका घेतल्याच, पण जोतिराव फुलेच्या मृत्यूनंतर मागे हटल्या नाहीत, तर अंतिम श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहिल्या आणि शेवटीसुद्धा पुण्यातल्या प्लेगच्या साथीत लोकांची सेवा करतानाच त्यांना मरण आले. त्यांच्या संघर्षपूर्ण आयुष्याला दिशा विद्यार्थी संघटना क्रांतिकारी अभिवादन करत आहे व सर्वांना मोफत शिक्षण-सर्वांना काम मिळवण्याच्या संघर्षात सहभागी होण्याचे आवाहन करत आहे.

शहीद भगतसिंहाच्या जन्मदिवसा (28 सप्टेंबर) निमित्ताने नौजवान भारत सभेचे विशेष सदस्यता अभियान

स्वातंत्र्याच्या ज्या रोपट्याला भगतसिंहांसारखा महान शहीदांनी आपल्या रक्ताने शिपलं होतं ते सुकू लागले आहे. या शहीदांची स्वप्ने आमच्या डोळ्यात डोकावत आहेत. चला, या शहीदांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याच्या संघर्षात प्राणपणाने सामील होऊयात. हे पत्रक केवळ नौजवान भारत सभेचा परिचय नाही, तर आवाहन आहे कि तुम्ही नौजवान भारत सभेचे सदस्य बना आणि भगतसिंहांच्या विचारांना पुढे न्या.

कोणीच वाचणार नाही

काय नोटबंदीमुळे मृत्यू होताना जात धर्म विचारला होता काय? जीएसटी लागू झाल्यानंतर जेवढे उद्योग बरबाद झाले आणि त्यामुळे कितीतरी लोक मजबुर होऊन रस्त्यावर आलेत त्यात किती हिंदू होते? मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे देशात जी हलाखी पसरली आहे तीने हिंदू-मुस्लिम भेद नाही केला! परंतु जेव्हा मत घ्यायची वेळ येते तेव्हा हिंदू-मुस्लिम विभाजन पद्धतशीरपणे केले जाते.

महाराष्ट्रातील दलितांवर अन्याय अत्याचारांच्या घटनांचा विरोध करा! जातिव्यवस्थे विरोधात आवाज बुलंद करा!

जातीव्यवस्था आणि जातिगत अन्याय अत्याचार आपल्या समाजावरील एक घाणेरडा डाग आहे आणि हा डाग दिवसेंदिवस जास्तच दुर्गंधी पसरवत आहे. गेल्या 10 जूनला जळगाव येथील जामनेर तालुक्यात वाकडी गावांमध्ये दोन मातंग तरूणांना विहिरीत पोहल्याच्या कारणावरून फक्त बेदम मारलेच नाही तर नागडे करून पाहूर गावामध्ये फिरवत शेतात घेऊन गेले व व्हिडिओ बनवून व्हाट्सअप वर प्रसारित देखील करण्यात आला.

तरुणांना आवाहन – पीटर क्रोपोतकिन, अनुवाद – सोमनाथ केंजळे

प्रिन्स पीटर क्रोपोतकिन (१८४२-१९२१) एक प्रसिद्ध रशियन अराजकतावादी क्रांतीकारी होते. तसेच नावाजलेले भूगर्भ शास्त्रज्ञ आणि भुगोलाचे तज्ज्ञही होते. *पण १८७० च्या दशकांत हे सगळं सोडून क्रांतीकारी आंदोलनात सामील झाले. त्यांना अटक करण्यात आली, मात्र ते निसटून विदेशात गेले आणि १८८६ मध्ये इंगलंडमध्ये स्थायिक झाले. ‘अॅन अपील टू यंग’ नावाचा हा त्यांचा प्रसिद्ध लेख आहे जो त्यांनी आपला व्यवसाय निवडू पाहणाऱ़्या़् युवक-युवतींना संबोधीत करण्यासाठी लिहीला आहे. हा लेख सर्वात प्रथम क्रोपोतकिनचे पत्र ‘ला रिवोल्ट’ मध्ये १८८॰ मध्ये प्रकाशीत केला होता. त्यानंतर जगभरात तो एका पत्रकाच्या रूपामध्ये वारंवार छापण्यांत येत आहे. आजही…