दिनांक ०१/०८/२०१९ रोजी साठेनगर,मानखुर्द, मुंबई येथे ‘लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे शिक्षण सहायत केंद्र’ चा उद्घाटन समारंभ पार पडला.

दिनांक ०१/०८/२०१९ रोजी साठेनगर,मानखुर्द, मुंबई येथे *लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे शिक्षण सहायत केंद्र* चा उद्घाटन समारंभ पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन स्थानिक महिलांच्या हस्ते करण्यात आले. कॉम्रेड नागेश धुर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व कॉम्रेड बबन ठोके यांनी शिक्षणाचे महत्व सांगत आपल्या साठेनगर सारख्या झोपडपट्टी मध्ये शिक्षणाच्या अभावामुळे होणाऱ्या दुर्दशेवर बोट ठेवले. तर आज आपल्याला जे शिक्षण मिळते ते पूर्णपणे भांडवली व नफा-तोटा यावर आधारित शिक्षण आहे आणि ज्यांच्याकडे जेवढा पैसा त्यांना त्या पद्धतीचे शिक्षण असं सूत्र प्रस्थापीत व्यवस्थेने तयार करून ठेवले आहे. खरंतर सर्वांना समान व मोफत शिक्षण मिळायला पाहिजे पण शासनकर्त्या जमातिकडून याबाबत प्रचंड उदासीनता आहे कारण यामागे त्यांचं शैक्षणिक वर्चस्वाचे धोरण व नफा या दोन गोष्टी प्रामुख्याने काम करत आहेत.
असे असताना अण्णाभाऊ साठे यांचे कार्य व त्यांनी जीवनातील अथक संघर्षाने जो साहित्याचा मूल्यवान पसारा उभा केला आहे. त्यापासून प्रेरणा घेत. शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व देवून पावले उचलावीत. या कामात येणाऱ्या काळात ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिक्षण सहायता केंद्र’ महत्वाची भूमिका निभावेल व या कामात सर्वांनचे सहकार्य अपेक्षित आहे. हे सर्व काम सर्वसामान्य कष्टकरी लोकांच्याच बळावर चालू असल्यामुळे यासाठी समोर देखील नियमित आर्थिक सहयोग या कार्यातील महत्वाची भूमिका निभावेल.कारण जनतेचे कार्य हे जनतेच्या बळावर उभे राहत आसते.
शेवटी अण्णाभाऊंच्या संघर्षमय जीवनाचा उलगडा करणारा माहितीपट दाखवून कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.
1 अगस्त को लोकशाहीर अन्नाभाऊ साठे के 99वी जन्मदिवस के वर्षगाँठ पर नौजवान भारत सभा द्वारा मानखुर्द,मुम्बई के साठे नगर इलाके में एक पुस्तकालय और शिक्षा सहायता केंद्र का उद्घाटन किया गया।
अन्नाभाऊ साठे का मराठी साहित्य में अभूतपूर्व योगदान है। इन्होंने मज़दूर-मेहनतकश के जिंदगी के हालातों को कहानी,उपन्यास,कविता और गीतों के माध्यम से आम जन मानस तक पहुँचाने का काम किया है। मुम्बईची लावणी , स्टालिनचा पोवाडा , फकीरा कुछ उल्लेखनीय कृति है।

Related posts

Leave a Comment

nineteen − 5 =