27 फेब्रुवारी हा ‘हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन’ (HSRA) चे आर्मी कमांडर इन चीफ शहीद चंद्रशेखर आझाद यांचा शहादत दिवस. समाजवादाचे स्वप्न उराशी बाळगून देशात क्रांती घडवून आणण्याचा उद्देशाने साम्राज्यवादी इंग्रज सत्तेविरुद्ध लढताना या क्रांतिकारकाने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. पुण्यातील दांडेकर पूल भागात सर्व्हे क्र. 214 येथे नौजवान भारत सभेतर्फे चंद्रशेखर आझाद यांना शहादत दिवसानिमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी साथी रवि यांनी चंद्रशेखर आझाद यांच्याविषयी बोलत असताना त्यांचे आयुष्य, स्वभाव, क्रांतिकारी कारवायांमधील सहभाग याबद्दल महिती दिली आणि क्रांतिकारकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुणांना संघटित होण्याचे आवाहन…
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे दिल्ली स्टेट अंगणवाडी वर्कर्स आणि हेल्पर्स युनियन च्या संपाला पाठिंबा
दिल्लीत आपल्या मानधन, पक्का रोजगार, इत्यादी मागण्यांना घेऊन अंगणवाडी कर्मचारी महिला मागील 19 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे साथी सिमरन यांनी मांडले की भगतसिंहांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य ते आहे ज्यात सर्व कारखाने, शेती – बागा, संपत्ती निर्माणाची साधने यांवर कामगार कष्टकऱ्यांची सामूहिक मालकी असेल. अंगणवाडी महिलांचा हा क्रांतिकारी लढा त्याच स्वप्नपूर्तीच्या मार्गातील एक मैलाचा दगड आहे. कामगार – कष्टकऱ्यांच्या न्याय्य लढ्यासोबत उभे राहणे नौजवान भारत सभा आपले कर्तव्य मानते. ज्या एकजुटतेचे प्रदर्शन करत संघर्षरत महिला हा संप चालवत आहेत त्याची दखल संपूर्ण देशभरात घेतली जात आहे. केजरीवाल…
आज महान क्रांतिकारी, जर्मन नाटककार आणि कवी बेर्टोल्ट ब्रेख्त यांचा जन्मदिवस.
आज महान क्रांतिकारी, जर्मन नाटककार आणि कवी बेर्टोल्ट ब्रेख्त यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त ब्रेख्त यांचं एक उध्दरण सादर करत आहोत. “सर्वात भिकार निरक्षर कुणाला म्हणावं तर राजकीय निरक्षराला. तो ऐकत नाही, बोलत नाही, राजकीय प्रक्रियेत सहभागी होत नाही. त्याला कळत नाही की जगण्याची किंमत, डाळीचे भाव, मासळीचे दर, पिठामिठाची किंमत, घरभाडं, जोड्यांची किंमत, औषधांच्या किमती सारं काही राजकीय निर्णयांवरून ठरतं. आपल्या राजकीय अजाणतेपणाचा त्याला अभिमान सुद्धा वाटतो आणि छाती फुगवून तो सांगत रहातो की मी राजकारणाचा द्वेष करतो. त्या राजकीय बेअक्कल माणसाला हे कळत नाही की त्याच्या राजकीय अज्ञानातूनच जन्माला येते…
शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या विचारसरणीला घाबरणारे आता त्यांच्या शहादतीशी संबंधित अफवा पसरवत आहेत!
या तीन शहीदांना 7 ऑक्टोबर 1930 रोजी फाशीची शिक्षा सुनावली गेली आणि 23 मार्च 1931 रोजी त्यांना फाशी देण्यात आली. या शहीदांना 14 फेब्रुवारीला शिक्षा सुनावण्यात आली, असा खोटा प्रचार संघी निंदक गेल्या काही वर्षांपासून सातत्याने करत आहेत! एकीकडे ते या शहीदांशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करतात, तर दुसरीकडे व्हॅलेंटाइन डेला आपला विरोध सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करतात! भारतीय फॅसिस्टांचे हा गोबेल्स शैलीचे मिथ्या-प्रचार उघड व्हायला हवा! ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा! नौजवान भारत सभा
पुण्याच्या दांडेकर पूल भागात नौजवान भारत सभेद्वारे संचालित शिक्षण सहायता केंद्रामध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी व आत्मरक्षणाचे वर्ग सुरू करण्यात आले आहे.
पुण्याच्या दांडेकर पूल भागात नौजवान भारत सभेद्वारे संचालित शिक्षण सहायता केंद्रामध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी व आत्मरक्षणाचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. आठवी, नववी व दहावीच्या वर्गांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग चालवले जात आहेत. शिक्षणाचे काम करत असताना हे लक्षात आले आहे की विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास खूप मागे राहिला आहे. आधीच शिक्षणाची दुरावस्था आहे आणि त्यात कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रचंड नुकसान झाले आहे. गरीब विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे बाहेर शिकवणी वर्ग लावू शकत नाही, सरकारी शाळांची अवस्था वाईट आहे आणि खाजगी शाळांमध्ये तेच लोक शिक्षण घेऊ शकतात जे लाखांमध्ये फी भरू शकतात.…
बेरोजगारीच्या प्रश्नावर नौजवान भारत सभेतर्फे आयोजित व्याख्यान
रविवार २३ जानेवारी रोजी पुण्यातील सुप्पर बिबवेवाडी येथे ‘बेरोजगारी: मूळ समस्या व उपाय’ ह्या विषयावर नौजवान भारत सभेतर्फे राजकीय अर्थशास्त्राचे अभ्यासक अभिजीत अ. मि. ह्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रास्ताविक करताना साथी निमिष ह्यांनी नौजवान भारत सभेचा विचार व कार्य उपस्थितांसमोर मांडले व आज, आपला समाज एका सर्वव्यापी संकटातून जात असताना समाज परिवर्तनासाठी तरुणांनी एकत्र येऊन कामगार कष्टकऱ्यांपर्यंत योग्य विचार पोचवण्याची गरज अधोरेखित केली. त्यानंतर साथी सुस्मित ह्यांनी बेरोजगारीचे संकट व आजच्या कामगार-कष्टकरी वर्गाची परिस्थिती उपस्थित तरुणांसमोर मांडली. व्याख्यानात प्रा. अभिजित ह्यांनी सर्वप्रथम विविध आकडेवारी मांडत बेरोजगारीच्या संकटाची व्याप्ती…
शहीद रोशन सिंह अमर रहे
शहीद रोशन सिंह अमर रहे ✊ काकोरी ऍक्शन मधील शहीद अमर रहे ✊ शहीदांचा वारसा जिंदाबाद ✊ शहीदांनी दिला आवाज बदला बदला देश समाज ✊ आज अमर शहीद रोशन सिंह यांचा जन्मदिवस आहे. शहाजहानपूर, उत्तरप्रदेश मध्ये 22 जानेवारी 1892 रोजी त्यांचा जन्म झाला. असहकार आंदोलनात रोशन सिंह सक्रीयरीत्या सहभागी होते आणि 1921-22 या काळात तुरुंगात सुद्धा जाऊन आले. परंतु चौरी-चौरा येथील घटनेनंतर गांधीजींनी आंदोलन मागे घेतल्यामुळे इतर तरुणांसारखेच रोशन सिंह सुद्धा निराश झाले व क्रांतिकार्य करण्यासाठी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच HRA मध्ये सामील झाले. क्रांतिकारक कारवायांसाठी पैसे उभे करणे आवश्यक…
शनिवार दि. 15 जानेवारी 2022 रोजी नौजवान भारत सभा, पुणे युनिटची वार्षिक मीटिंग पार पडली.
शनिवार दि. 15 जानेवारी 2022 रोजी नौजवान भारत सभा, पुणे युनिटची वार्षिक मीटिंग पार पडली. मीटिंगमध्ये नौभासच्या जुन्या कार्यकारिणीचे सदस्य डॉ. निखिल यांनी नौभासची ओळख दिली आणि त्यासोबतच कामकरी वर्गाच्या समस्यांसाठी, रोजगारासाठी, शिक्षणाच्या हक्कासाठी आणि फॅसिझमच्या विरोधात तरुणांना संघटित होण्याचे आवाहन केले. साथी रवि यांनी नौभास पुणे युनिटच्या मागच्या वर्षातील कामांचा आढावा मांडला आणि साथी नेहा यांनी नौभासच्या देशभरातील कारवायांची काही प्रातिनिधिक उदाहरणं दिली. वार्षिक मीटिंगमध्ये काही तरुणांना नविन सदस्यता देण्यात आली. त्यानंतर नौभास सदस्यानी साथी रवि, साथी सूरज आणि साथी नेहा यांची 2022 साठी कार्यकारिणी लोकशाहीपद्धतीने निवडून दिली. मीटिंगच्या…
मुंबई में 6 महीने से जारी है ‘फिरते वाचनालय’
किताबें जादू जानती हैं हमें देखना हो बाहर की दुनिया तो खुली खिड़की बन जाती हैं, कभी आईना बन हमारा ख़ुद से सामना कराती हैं, तो कभी उड़न खटोला बन हमें बादलों की सैर कराती हैं, कभी हमारी आत्मा को ठंडा हो जाने से बचाती हैं, गरम कोट बनकर कभी होता है ऐसा भी , तूफानी अंधेरे में लाइट हाउस बन राह दिखा जाती हैं – कोंपल बाल पत्रिका से – मुंबई में 6 महीने से जारी है ‘फिरते वाचनालय’ नौजवान भारत सभा द्वारा पिछले छः महीनों से मुम्बई के…
शहीद उधमसिंग अमर रहे!
शहीद उधमसिंग अमर रहे! अमर शहीदांचे कथन ! चालू ठेवा आंदोलन! जन्म: 26 डिसेंबर 1899 (सुनाम, जिल्हा संगरूर, पंजाब, भारत) शहीद: 31 जुलै 1940 (पेंटोविले जेल, लंडन, यूकेमध्ये फाशी) अमर शहीद उधम सिंह यांचा आज जन्मदिन. उधम सिंग हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक अमर सेनानी आहेत. अमृतसरचे जालियनवाला बाग हत्याकांड कोण विसरू शकेल! येथे 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या दिवशी इंग्रजांनी नि:शस्त्र लोकांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात हजारो लोक जखमी आणि शहीद झाले. गोळीबार करण्याचे आदेश ‘जनरल एडवर्ड हॅरी डायर’ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने दिले होते पण त्यामागे पंजाबचे तत्कालीन…
