शनिवार दि. 15 जानेवारी 2022 रोजी नौजवान भारत सभा, पुणे युनिटची वार्षिक मीटिंग पार पडली. मीटिंगमध्ये नौभासच्या जुन्या कार्यकारिणीचे सदस्य डॉ. निखिल यांनी नौभासची ओळख दिली आणि त्यासोबतच कामकरी वर्गाच्या समस्यांसाठी, रोजगारासाठी, शिक्षणाच्या हक्कासाठी आणि फॅसिझमच्या विरोधात तरुणांना संघटित होण्याचे आवाहन केले. साथी रवि यांनी नौभास पुणे युनिटच्या मागच्या वर्षातील कामांचा आढावा मांडला आणि साथी नेहा यांनी नौभासच्या देशभरातील कारवायांची काही प्रातिनिधिक उदाहरणं दिली. वार्षिक मीटिंगमध्ये काही तरुणांना नविन सदस्यता देण्यात आली. त्यानंतर नौभास सदस्यानी साथी रवि, साथी सूरज आणि साथी नेहा यांची 2022 साठी कार्यकारिणी लोकशाहीपद्धतीने निवडून दिली. मीटिंगच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व उपस्थितांनी नौभासच्या 2022 च्या कामांसाठी प्रस्ताव दिले आणि ते प्रस्ताव अंमलात आणण्यासाठी झटून काम करू असा संकल्प केला. कार्यक्रमाची सांगता “मशाले लेकर चलना” या गीताने झाली.
शनिवार दि. 15 जानेवारी 2022 रोजी नौजवान भारत सभा, पुणे युनिटची वार्षिक मीटिंग पार पडली.
