शहीद रोशन सिंह अमर रहे

शहीद रोशन सिंह अमर रहे ✊ काकोरी ऍक्शन मधील शहीद अमर रहे ✊ शहीदांचा वारसा जिंदाबाद ✊ शहीदांनी दिला आवाज बदला बदला देश समाज ✊ आज अमर शहीद रोशन सिंह यांचा जन्मदिवस आहे. शहाजहानपूर, उत्तरप्रदेश मध्ये 22 जानेवारी 1892 रोजी त्यांचा जन्म झाला. असहकार आंदोलनात रोशन सिंह सक्रीयरीत्या सहभागी होते आणि 1921-22 या काळात तुरुंगात सुद्धा जाऊन आले. परंतु चौरी-चौरा येथील घटनेनंतर गांधीजींनी आंदोलन मागे घेतल्यामुळे इतर तरुणांसारखेच रोशन सिंह सुद्धा निराश झाले व क्रांतिकार्य करण्यासाठी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच HRA मध्ये सामील झाले. क्रांतिकारक कारवायांसाठी पैसे उभे करणे आवश्यक होते. त्यामुळे HRA सोबत जोडलेले क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्र लाहिडी, अश्फाक उल्ला खान, रोशन सिंह व इतर अन्य साथींनी काकोरी नावाच्या ठिकाणी इंग्रजी खजिना लुटला. त्यानंतर बहुतांशी क्रांतीकारकांना इंग्रजांनी अटक केले. राजेंद्र लाहिडी यांना 17 डिसेंबर व बिस्मिल, अश्फाक आणि रोशन सिंह यांना 19 डिसेंबर 1927 ला फासावर चढवण्यात आले. ‘ज़िंदगी ज़िंदा-दिली को जान ऐ रोशन वरना कितने ही यहां रोज फ़ना होते हैं.’ हे त्यांनी जेलमध्ये असताना त्यांच्या मित्राला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. अशा वीर क्रांतिकारक रोशन सिंह यांना नौजवान भारत सभेचा सलाम

Related posts

Leave a Comment

4 × 2 =