27 फेब्रुवारी, चंद्रशेखर आझाद ह्यांच्या बलिदानदिनाच्या निमित्ताने

 साथींनो, 93 वर्षांपूर्वी म्हणजेच 27 फेब्रुवारी 1931 रोजी इंग्रजांशी लढतांना चंद्रशेखर आझाद शहीद झाले. शहिद चंद्रशेखर आझाद यांनी ज्या स्वप्नासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले ते आजही पूर्ण झालेले नाही. भांडवलशाही-सम्राज्यशाही आणि सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध लढणाऱ्या योद्धांमध्ये चंद्रशेखर आझाद यांचा समावेश आहे. चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी मध्यप्रदेश मधील भाबरा गावात झाला. एका अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला असल्यामुळे त्यांना प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची संधीही मिळाली नव्हती. अगदी बालपणापासूनच चंद्रशेखर आझाद हे स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलनांमध्ये सहभाग घेत. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी 1921 मध्ये सुरू असलेल्या असहकार…