आज महान क्रांतिकारी, जर्मन नाटककार आणि कवी बेर्टोल्ट ब्रेख्त यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त ब्रेख्त यांचं एक उध्दरण सादर करत आहोत. “सर्वात भिकार निरक्षर कुणाला म्हणावं तर राजकीय निरक्षराला. तो ऐकत नाही, बोलत नाही, राजकीय प्रक्रियेत सहभागी होत नाही. त्याला कळत नाही की जगण्याची किंमत, डाळीचे भाव, मासळीचे दर, पिठामिठाची किंमत, घरभाडं, जोड्यांची किंमत, औषधांच्या किमती सारं काही राजकीय निर्णयांवरून ठरतं. आपल्या राजकीय अजाणतेपणाचा त्याला अभिमान सुद्धा वाटतो आणि छाती फुगवून तो सांगत रहातो की मी राजकारणाचा द्वेष करतो. त्या राजकीय बेअक्कल माणसाला हे कळत नाही की त्याच्या राजकीय अज्ञानातूनच जन्माला येते वेश्या, बेवारस मूल, दरोडेखोर आणि सर्वात वाईट म्हणजे भ्रष्ट अधिकारी, शोषणकारी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे तळवेचाटू नोकर.” – बेर्टोल्ट ब्रेख्त (10 फेब्रुवारी 1898 – 14 ऑगस्ट 1956)
आज महान क्रांतिकारी, जर्मन नाटककार आणि कवी बेर्टोल्ट ब्रेख्त यांचा जन्मदिवस.
