राहुल सांकृत्यायन यांच्या स्मृतिदिनी (14 एप्रिल) नौजवान भारत सभेतर्फे ‘राहुल सांकृत्यायन साहित्य वाचन दिवस व चर्चासत्राचे’ आयोजन करण्यात आले होते.

राहुल सांकृत्यायन यांच्या स्मृतिदिनी (14 एप्रिल) नौजवान भारत सभेतर्फे ‘राहुल सांकृत्यायन साहित्य वाचन दिवस व चर्चासत्राचे’ आयोजन करण्यात आले होते. ह्यात राहुल सांकृत्यायन यांनी लिहिलेले विविध साहित्य वाचनासाठी ठेवण्यात आले होते ज्यात तुम्हारी क्षय, दिमागी गुलामी, भागो नही दुनिया को बदलो, घुमक्कड शास्त्र, वोल्गा ते गंगा, साम्यवाद ही क्यों, स्तालिन जीवनी, इत्यादी पुस्तकांचा समावेश होता. सहभागी सर्वांनी वेगवेगळे लेख वाचून शेवटी घेण्यात आलेल्या चर्चा सत्रात आपले वाचतांना आलेले अनुभव, मत मांडले.

महा विद्रोही राहुल सांकृतायान यांच्या जन्मदिवस (9 एप्रिल) व स्मृतिदिनािमित्त (14 एप्रिल) नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे चर्चा सत्र घेण्यात आले.

चर्चा सत्रात प्रथमत राहुल सांकृतायान यांच्या जीवन प्रवासाचा थोडक्यात परिचय करून देण्यात आला व नंतर त्यांनी लिहिलेला ‘ तुमच्या समाजाचा ह्रास’ हा लेख वाचून त्यावर चर्चा करण्यात आली. आज घराघरात परिचित असावी अशी ही व्यक्ती असून देखील भांडवली व्यवस्थेसाठी त्यांचे विचार घातक असल्याने भांडवली विचारधारेचा प्रचार प्रसार करणाऱ्या संपूर्ण प्रणालीने त्यांना घराघरात पोहचू दिले नाही. आज समाजात धार्मिक, जातीय द्वेष पसरवण्याचे काम युद्धस्तरावर होत असतांना, तरुणांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरली असतांना, श्रीमंत – गरीब दरी दिवसेंदिवस वाढत असतांना, गरीब – कष्टकरी जनतेचे अतोनात हाल होत असतांना राहुल सांकृतायान यांचे विचार समाजाला…

काल दिनांक 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त फुलेवाडा, पुणे येथे नौजवान भारत सभे तर्फे बुकस्टॉलचे आयोजन करण्यात आले.

फुलेवाड्यात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले वास्तव्यास होते. याच ठिकाणी ज्योतिराव फुले सत्यशोधक समाजाच्या बैठका घेत असत, म्हणून या जागेचे विशेष महत्व आहे. ज्योतिराव फुल्यांनी पुण्याच्याच भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. विधवा विवाहाला समर्थन, विधवांचे केशवपन थांबविण्‍यासाठी न्हाव्यांचा संप, बाल विवाहाला विरोध, मुलांचे संगोपन अशा एक ना अनेक गोष्‍टींतून ज्योतीराव-सावित्रीबाईंचा स्‍त्री समतेचा, स्‍त्री स्‍वातंत्र्याचा दृष्‍टीकोन सुद्धा समोर येतो. स्‍त्री मुक्‍ती व जातीय उच्‍चाटनाच्‍या संघर्षांमध्‍ये फुल्‍यांनी महत्‍वाचे योगदान दिलेले आहे. बुकस्टॉलला विद्यार्थी युवकांनी व जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. बुकस्टॉलवरील भगतसिंहांचे जाती धर्माचे झगडे सोडा, क्रांतिकारी कार्यक्रमाचा मसुदा, मी…

शहीद दिनाच्या पूर्वसंध्येला 22 मार्च रोजी पुण्याच्या सुपर बिबवेवाडी भागात शहीद भगतसिंह वाचनालयाचे तसेच शिक्षण सहायता केंद्राची सुरवात करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरवात साथी सुस्मितने शहीदांच्या अभिवादनाने केली. भगतसिंह आणि त्यांचे साथीदार ज्या इंकलाबचे स्वप्न पाहत होते ते स्वप्न आजही अपूर्ण आहे. आजच्या तरुणांना शहीदांपासून प्रेरणा घेत आजच्या समाजातील अंधकारमय वातावरणात निराश होऊन न जाता तरुणांमध्ये, कामगार कष्टकऱ्यांमध्ये क्रांतीची चेतना पेटवली पाहिजे. आपल्या संकल्पांमध्ये शहीद भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांचे विचार आजही जिवंत आहेत आणि आपल्या पुढच्या वाटचालीत नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहतील. साथी भीमाने वस्तीतल्या तरुणांची भीषण परिस्थिती मांडली. कामगार कष्टकरी पार्श्वभूमीतून येणाऱ्या तरुणांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी नसल्याने आजचा तरुण व्यसन, गुंडगिरी आणि आत्महत्यांना बळी पडत आहे. तरुणांच्या भविष्यात अंधाराशिवाय…

नौजवान भारत सभेचे(नौभास) पहिले महाराष्ट्र राज्य अधिवेशन संपन्न काल, 23 मार्च 2022 रोजी, शहीद दिनाच्या निमित्ताने नौजवान भारत सभेचे पहिले महाराष्ट्र राज्य संमेलन पुणे येथे संपन्न झाले.

यावेळी मुंबई, पुणे, अहमदनगर आणि राज्याच्या इतर भागातून आलेल्या नौभासच्या सदस्यांनी मिळून आजवरच्या कार्याचा आढावा घेतला, राज्य कार्यकारणीची निवड केली, तत्कालीन पुढील कामांकरिता महत्वाचे ठराव पारित केले; तसेच खुल्या सत्रामध्ये व्याख्याने, क्रांतिकारी गीत व सडक नाटक सादरीकरण केले व शहीद अभिवादन फेरी काढली. नौजवान भारत सभेच्या घटनेनुसार झालेल्या या पहिल्या राज्यसंमेलनाची सुरूवात नौजवान भारत सभेचा झेंडा उभारून आणि शहीदांना क्रांतिकारी अभिवादन करून झाली. यानंतर पुणे समन्वयक रवि यांनी आजवरच्या नौभासच्या राज्यातील कामांचा आढावा मांडला. यावेळी देशपातळीवर झालेले भगतसिंह रोजगार हमी कायद्याकरिताचे (बसनेगा) आंदोलन, प्रदूषणकारी बायोवेस्ट प्रकल्पापासून ते पुरग्रस्तांकरिता आणि झोपडपट्टी…

शनिवार दि. 13 मार्च 2022 रोजी नौजवान भारत सभा, अहमदनगर युनिटची वार्षिक आढावा बैठक पार पडली.

मीटिंगमध्ये डॉ. निखिल यांनी नौभासची ओळख दिली आणि त्यासोबतच कामकरी जनतेच्या हक्क व अधिकारांसाठी, मोफत आणि दर्जेदार शिक्षण आणि सन्मानजनक रोजगाराच्या हक्कासाठी आणि फॅसिझमच्या विरोधात संघटित होण्याचे तरुणांना आवाहन केले. साथी अतुल यांनी नौभास अहमदनगर युनिटच्या मागील 5 वर्षातील कामांचा आढावा मांडला आणि साथी अविनाश यांनी नौभासच्या देशभरातील कामांचा संक्षिप्त आढावा मांडला. वार्षिक मीटिंगमध्ये दोन तरुणींना नविन सदस्यता देण्यात आली. त्यानंतर नौभास सदस्यानी साथी अतुल ह्याला एकमताने 2022 साठी समन्वयक म्हणून निवडून दिले. मीटिंगच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व उपस्थितांनी नौभासच्या एकंदरीत आतापर्यंतच्या कामातील सकारात्मक-नकारात्मक शिकवणी आणि पुढील कामाच्या विस्तारासाठी प्रस्ताव दिले…

नौजवान भारत सभेतर्फे आज “रशिया-युक्रेन युद्ध: कोणाची बाजू योग्य?” या विषयावर सामाजिक-राजकीय घडामोडींचे अभ्यासक प्रा. अभिजित अ. मी. यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

गॅस पाईपलाईन, गॅसचे साठे, तेलाचे साठे, पाण्याचा पुरवठा, संभाव्य सामरिक मोर्चेबांधणी, नाटो आणि रशिया दोघांची विस्तारवादी महत्वकांक्षा आणि या सर्वांमागे असलेले भांडवली आर्थिक संकट ही भौतिक कारणे या युद्धामागे आहेत आणि “लोकशाही”, मैत्री, देशप्रेम हे फक्त प्रसारमाध्यमांद्वारे जनतेसाठी दिखाव्याचे मुद्दे आहेत. हे युद्ध साम्राज्यवादी गटांमधील स्पर्धेचा परिणाम असून रशियन आणि अमेरिकन साम्राज्यवादी गटांच्या आपसातील स्पर्धेत युक्रेन होरपळून निघत आहे. भांडवली प्रसारमाध्यमे त्यांच्या विशिष्ट भांडवली हितसंबंधी गटांच्या बाजूने मांडत कोणी रशियन साम्राज्यवादाला तर कोणी अमेरिकन साम्राज्यवादाला दोषी मानत आहेत, जेव्हा की दोन्ही गट साम्राज्यवादीच आहेत. युक्रेनच्या राजकारणातही कामगार-कष्टकरी वर्गांच्या बाजू कमजोर…

27 फेब्रुवारी, चंद्रशेखर आझाद ह्यांच्या बलिदान दिनाच्या निमित्ताने

कष्टकरी साथींनो आणि तरुण मित्रांनो, जीवनाच्या संघर्षात आणि रोजीरोटीच्या शोधात वणवण करता करता स्वातंत्र्यानंतरच्या पिढ्यांनी खूप काही बघितलं, जाणलं आणि भोगलं आहे. त्यांनी जनतेच्या खऱ्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांच्या सर्वोच्च बलिदानासोबत भांडवलधार्जिण्या पुढाऱ्यांचे तडजोडी देखील बघितल्या आहेत. त्यांनी सत्तासूख आणि निहीत स्वार्थासाठी होणारं देशाचं धार्मिक विभाजन आणि धार्मिक दंगली सुद्धा बघितल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या जमिनीवरून उध्वस्त होणारे शेतकरी व मजूर बघितले आहेत. रोजगाराच्या शोधात वणवण भटकणारे तरुण बघितले आहेत. देशात भरपूर खाद्यान्न असतानासुद्धा भूक आणि कुपोषणाने होणारे मृत्यु बघितले आहेत. देशातील कष्टकरी जनतेची आजची पिढीसुद्धा त्याच समस्या, अडचणी व संघर्षांमध्ये गुंतलेली आहे…

काल चंद्रशेखर आझाद यांच्या बलिदान (२७ फेब्रुवारी) दिनानिमित्त नौजवान भारत सभेच्या सिद्धार्थनगर,अहमदनगर येथील शहीद भगतसिंह वाचनालयात कार्यक्रम घेण्यात आला.

 साथी अतुलने चंद्रशेखर आझाद यांच्या जिवन कार्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. चंद्रशेखर आझाद,भगतसिंह व त्यांच्या इतर साथीदारांनी ज्या धर्मनिरपेक्ष व समतापूर्ण समाजाचे स्वप्न पाहिले होते व त्याच साठी अतिशय कमी वयात देशासाठी बलिदान दिले होते ते स्वप्न आजही पूर्ण झालेले नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७५ वर्ष पूर्ण झाली तरीही आज आपण पाहतोय की बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतेय, महागाईने कळस गाठलाय, शिक्षणाचे खाजगीकरण वाढत आहे, कामगार कष्टकऱ्यांची अवस्था पूर्वीपेक्षा आणखीनच दयनीय होत आहे, धार्मिक तेढ वाढत आहे. शहिदांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. याची जाणीव करून…