शनिवार दि. 13 मार्च 2022 रोजी नौजवान भारत सभा, अहमदनगर युनिटची वार्षिक आढावा बैठक पार पडली.

मीटिंगमध्ये डॉ. निखिल यांनी नौभासची ओळख दिली आणि त्यासोबतच कामकरी जनतेच्या हक्क व अधिकारांसाठी, मोफत आणि दर्जेदार शिक्षण आणि सन्मानजनक रोजगाराच्या हक्कासाठी आणि फॅसिझमच्या विरोधात संघटित होण्याचे तरुणांना आवाहन केले. साथी अतुल यांनी नौभास अहमदनगर युनिटच्या मागील 5 वर्षातील कामांचा आढावा मांडला आणि साथी अविनाश यांनी नौभासच्या देशभरातील कामांचा संक्षिप्त आढावा मांडला. वार्षिक मीटिंगमध्ये दोन तरुणींना नविन सदस्यता देण्यात आली. त्यानंतर नौभास सदस्यानी साथी अतुल ह्याला एकमताने 2022 साठी समन्वयक म्हणून निवडून दिले. मीटिंगच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व उपस्थितांनी नौभासच्या एकंदरीत आतापर्यंतच्या कामातील सकारात्मक-नकारात्मक शिकवणी आणि पुढील कामाच्या विस्तारासाठी प्रस्ताव दिले व खुली चर्चा झाली. कार्यक्रमाची सांगता क्रांतिकारी गीतांनी करण्यात आली.

Related posts

Leave a Comment

5 × three =