पुण्याच्या दांडेकर पूल भागात नौजवान भारत सभेद्वारे संचालित शिक्षण सहायता केंद्रामध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी व आत्मरक्षणाचे वर्ग सुरू करण्यात आले आहे.

पुण्याच्या दांडेकर पूल भागात नौजवान भारत सभेद्वारे संचालित शिक्षण सहायता केंद्रामध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी व आत्मरक्षणाचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. आठवी, नववी व दहावीच्या वर्गांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग चालवले जात आहेत. शिक्षणाचे काम करत असताना हे लक्षात आले आहे की विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास खूप मागे राहिला आहे. आधीच शिक्षणाची दुरावस्था आहे आणि त्यात कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रचंड नुकसान झाले आहे. गरीब विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे बाहेर शिकवणी वर्ग लावू शकत नाही, सरकारी शाळांची अवस्था वाईट आहे आणि खाजगी शाळांमध्ये तेच लोक शिक्षण घेऊ शकतात जे लाखांमध्ये फी भरू शकतात. शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे कामगार कष्टकऱ्यांची मुले शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर फेकले जात आहे. अशा परिस्थितीत शिक्षणाच्या हक्काचा लढा उभारत असतानाच नौजवान भारत सभा शिक्षण सहायता केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. यात मुलांना शिकविण्यात योगदान देण्यासाठी तुम्ही आमच्याशी शिक्षक स्वयंसेवक म्हणून जोडून घेऊ शकता. तसेच आम्हाला हे काम सुरू ठेवण्यासाठी आपल्या आर्थिक सहयोगाची गरज आहे. हे सर्व काम जनसहयोगाच्या बळावरच उभे आहे. सहयोग पाठविण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क करावा. नौजवान भारत सभा, पुणे रवि 8956840785 सुरज 8806038914

Related posts

Leave a Comment

20 − four =