In the midst of one of the worst heatwaves this country has ever faced, Maharastra government clears projects that will end up clearing about 1,800 hectares of forest land. Which will result in about 4,00,000 trees getting cut down. The clearing of forests in Thane, Palghar, Gadchiroli, and Yavatmal is not just about losing trees-it’s about dismantling entire ecosystems. This project which the government claims is to build four mega infrastructure projects, will irreversiblely damage the ecology of Maharastra. The locations of these projects are especially dangerous to the environmental…
Author: nbs_upload
नौजवान भारत सभा द्वारे ऍबी मार्टिनच्या डॉक्युमेंटरीची स्क्रीनिंग – गाझा फाइट्स फॉर फ्रीडम चे आयोजन
पॅलेस्टिनी जनतेवर चालू असलेल्या नरसंहारात दररोज झायनिस्ट वसाहतवादी इस्रायली राज्याकडून केलेल्या अमानुष अत्याचारांच्या नव्या गोष्टी रोज समोर येत आहेत. संपूर्ण जगभरात लोक या अन्यायाविरोधात आवाज उठवत आहेत आणि पॅलेस्टिनी जनतेच्या स्वातंत्र्य लढ्याशी एकजूट दाखवत आहेत. भारतातही पॅलेस्टाइनच्या समर्थनासाठी प्रयत्न होत आहेत, जरी बहुसंख्य जनता अजूनही इस्रायली राज्याच्या प्रचाराच्या प्रभावाखाली येत असली जो पश्चिमी मिडियामार्फत अधिक तीव्र केला जातो. यामुळेच पॅलेस्टाइनच्या मुक्तीच्या लढ्याचा इतिहास समजून घेणे, त्यावर अभ्यास करणे आणि संवाद साधणे अत्यंत आवश्यक झाले आहे — विशेषतः गाझा पट्टी आणि वेस्ट बँकेत राहणाऱ्या लोकांवर दशकानुदशके चाललेली हिंसक दडपशाही समजून घेण्यासाठी.…
नौजवान भारत सभा, मुंबईतर्फे आयोजित केले गेले जालियानवाला बाग हत्याकांडाच्या स्मरणार्थ सरदार उधम चित्रपटाचे स्क्रीनिंग!
106 वर्षांनंतर देखील जालियानवाला बाग हत्याकांड देशाच्या इतिहासातील एक काळा अध्याय आहे. 13 एप्रिल,1919 रोजी ब्रिटीश औपनिवेशिक सरकारच्या आदेशानुसार ब्रिटीश भारतीय फौजेने स्त्री, पुरुष व लहान मुले सामील असलेल्या, रौलेट कायदा 1919, ह्या कठोर, काळ्या कायद्याला शांततामय पद्धतीने विरोध करणाऱ्या जमावावर बेछूट गोळीबार केला. सरकारी आकडेवारीनुसार यात 400 मृत्यू दर्शवले गेलेत तर स्वतंत्र अहवालानुसार मारले गेलेल्यांची संख्या 1200 वर असल्याचे कळले. हे हत्याकांड भारताच्या वसाहतिक इतिहासातील अनेक बर्बर घटनांमधील एक ठळक उदाहरण आहे. स्क्रीनिंगनंतर झालेल्या चर्चेत वसाहतिक काळातील आणि स्वातंत्र्योत्तर काळापासून आलेल्या वेगवेगळ्या सरकारांनी लागू केलेल्या जन विरोधी कायद्यांमधील साधर्म्याबद्दल…
वक्फ (सुधारणा) कायद्याला विरोध करा! मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या फॅशिस्टांच्या रणनीतीला हाणून पाडा!
वक्फ (सुधारणा) कायद्याच्या रूपात मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या फॅशिस्ट हल्ल्याचा नौजवान भारत सभा तीव्र विरोध करते. संसदेमध्ये ह्या विधेयकाच्या चर्चेच्या वेळी अमित शहा यांनी म्हटले की मुस्लिमांच्या धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याचा सरकारचा उद्देश नाहीये तर मुस्लिमांच्या धार्मिक आणि सामाजिक संस्थांचे व्यवस्थापन पारदर्शी व्हावे, भ्रष्टाचार संपावा यासाठी हे विधेयक आणले गेले आहे आणि या कायद्याचा फायदा गरीब मुस्लिमांना, महिलांना होणार आहे. या कायद्याचे समर्थन करताना “लोकशाहीकरण”, “धर्मनिरपेक्षता” यांसारख्या तत्वांचा आधार देण्यात येत आहे, पण खरे पाहता हा मुस्लिमांवर एक फॅशिस्ट हल्लाच आहे. या कायद्याबद्दल समजण्याआधी कुठल्या राजकीय वातावरणात हा कायदा पारित होत…
नौजवान भारत सभा, पुणे तर्फे गेल्या आठवड्यात सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्रीचा ऑस्कर जिंकणारी पहिली पॅलेस्टिनी फिल्म “नो अदर लँड” दाखवण्यात आली.
पॅलेस्टिनी कार्यकर्ता बासेल याद्रा, हमदान बल्लाल आणि इस्रायलच्या कार्यकर्त्यांनी मिळून ही डॉक्युमेंट्री बनवली आहे. या फिल्ममध्ये मासाफेर येता हा इस्रायल व्याप्त वेस्ट बँक मधील भाग इस्रायली सैन्याची जागा म्हणून घोषित केला जाते आणि त्यानंतर पॅलेस्टिनी नागरिकांना कशाप्रकारे त्यांच्या घरातून बेदखल केले जाते याचे चित्रण केले आहे. 2019 – 2023 या काळात या डॉक्युमेंट्रीचे चित्रण करण्यात आले आहे. या निर्णयाच्या विरोधात पॅलेस्टिनी कार्यकर्ते इस्रायलच्या कोर्टात 22 वर्षे लढा देतात आणि त्यानंतर कोर्टाकडून निर्णय येतो की मासाफेर येता हा भाग इस्रायलच्या सैन्याचा प्रशिक्षणासाठी वापरला जाईल. हा निर्णय लागू करण्यासाठी स्थानिक जनतेची घरे…
‘जोतीराव फुले: जीवन आणि राजकारण’ ह्या नौभास आणि दिशा विद्यार्थी संघटनेतर्फे मुंबई येथे आयोजित सत्रात जोतीराव फुलेंचा जीवनपट मांडण्यात आला.
काढलेली पहिली शाळा, दलित, महार, मातंग आणि मागास वर्गासाठी काढलेल्या शिक्षण संस्था, विधवा केशवपनाविरोधात घडवून आणलेला न्हाव्यांचा संप, ग्रंथालय स्थापना, घरातील पाण्याची विहीर सर्वांसाठी खुली करणे, दुष्काळात चालवलेले अन्न्छत्र, बालकाश्रम, बाल हत्या प्रतिबंधक गृह, बॉम्बे मिल हंड्स असोसिअशन, सत्यशोधक विवाह, सत्यशोधक समाजाची स्थापना, इत्यादी जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेली कामे यांच्या अनुषंगाने समाजात अस्तित्वमान जातीभेद, स्त्रियांना मिळणारी दुय्यमत्वाची वागणूक, अवैज्ञानिक दृष्टीकोन, कामगारांची पिळकवणूक, यांविरोधात उचलेले विद्रोही पाऊल आणि जनतेच्या बळावर उभे केलेली संस्थात्मक कामे यांवर चर्चा केली. सुरुवातीला ब्रिटीश सरकारचे प्रशंसक असलेले जोतीराव नंतर वसाहतवादी ब्रिटीश सरकारच्या…
जनता वसाहत, पुणे येथे नौजवान भारत सभा द्वारे संचालित शहीद भगतसिंह वाचनालयाचे उद्घाटन संपन्न!
थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त अभिवादन व चर्चा! दिनांक 11 एप्रिल रोजी जनता वसाहत, पुणे येथे जोतिबा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त नवीन शहीद भगतसिंह वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर साथी अरुण यांनी थोडक्यात नौजवान भारत सभेचा इतिहास व भूमिका यावर वक्तव्य केले. नौजवान भारत सभा देशातील तरुणांच्या, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करत त्यांना एकजूट करण्याचे काम करते, रोजगार, शिक्षण, महागाई, आरोग्य यासारख्या जनतेच्या मुद्द्यांवर संघर्ष करण्यासोबतच समाजात रूढ असलेल्या अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा, जातीयवाद, धर्मांधता याला विरोध करत एका न्यायपूर्ण समाजाचे…
नौजवान भारत सभा, पुणे तर्फे सुरू असलेला आझाद स्पोर्ट्स क्लब निरंतर सुरू
तुम्हाला माहितीच आहे की, गेल्या 2 महिन्यापासून पुण्याच्या सुप्पर, बिबवेवाडी भागात शहीद आझाद स्पोर्ट्स क्लब नियमितपणे सुरू आहे. यामध्ये सध्या मुलांना बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट शिकवले जात आहे. स्पोर्ट्स क्लबमधून वस्तीतील मुलांच्या शारीरिक सोबतच मानसिक स्वास्थ्य यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. म्हणूनच खेळांसोबतच मुलांना विविध प्रकारचे साहित्य, विज्ञान, कला यावरची पुस्तके वाचण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. खेळ खेळताना मुलांशी विविध विषयांवर गप्पा गोष्टी होत असतात. मुलांना वेगवेगळया विषयांबद्दल खूप कुतूहल असते हे यामध्ये दिसून आले. म्हणूनच मुलांना मागील आठवड्यात स्पोर्ट क्लब नौभास तर्फे संचालित वाचनालयावर आणून विविध विषयांवरची पुस्तके वाचण्यासाठी…
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे काल दिनांक 23 मार्च रोजी शहीद स्मृती संकल्प अभियानाचे रॅली काढून समापन!
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे काल दिनांक 23 मार्च रोजी शहीद स्मृती संकल्प अभियानाचे रॅली काढून समापन! 23 मार्च, शहीद दिवस, हा तो दिवस आहे ज्या दिवशी भगतसिंह, सुखदेव राजगुरू देशासाठी शहीद झाले होते. त्याच्या स्मरणार्थ अणि त्यांचा क्रांतिकारी वारसा आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी नौजवान भारत सभा, मुंबई ने शहीद स्मृती संकल्प अभियान यशस्वीरीत्या पार पाडले. ही रॅली मानखुर्द च्या कामगार वस्त्यांमधून काढण्यात आली. रॅलीची सुरवात पीएमजीपीच्या बाजारातून झाली. सुरवातीलाच क्रांतिकारी घोषणांनी पीएमजीपी चा बाजार दणाणून निघाला. रॅलीदरम्यान पत्रके, भाषण अणि क्रांतिकारी गीते गायली गेली. आपल्या भाषणातून नौभासच्या सदस्यांनी भगतसिंह…
‘शहीद स्मृती संकल्प अभियान’ – मानखुर्द-गोवंडी (मुंबई) येथे बुक स्टॉल व पोस्टरिंग प्रदर्शनाचे आयोजन
‘शहीद स्मृती संकल्प अभियान’ – मानखुर्द-गोवंडी (मुंबई) येथे बुक स्टॉल व पोस्टरिंग प्रदर्शनाचे आयोजन दि. 22 मार्च रोजी मानखुर्द-गोवंडी भागातील शिवाजीनगर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर इलाक्यात पुस्तक प्रदर्शन आणि पोस्टरिंग आयोजित करण्यात आले. अभियानादरम्यान पत्रक वाटप करत विद्यार्थी, युवक आणि कामकरी जनतेमध्ये भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांचा क्रांतिकारी वारशाचा महत्व अधोरेखित करण्यात आले. या अभियानाला जनतेमधून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आणि अनेकांनी नौजवान भारत सभा बद्दल जाणून घेण्याची इच्छा दर्शवली. आपल्या क्रांतिकारकांचे विचार जनतेपर्यंत नेण्यासाठी आम्ही पुढे देखील असे अभियान नियमितपणे आयोजित करू. शहीद स्मृती संकल्प अभियानात सामील होण्यासाठी, संपर्क: 7667230795
