गोवंडी-मानखुर्द (मुंबई) येथील रफीक नगर, गौतम नगर भागांत नौजवान भारत सभेतर्फे राशन वाटप

गोवंडी-मानखुर्द (मुंबई) येथील रफीक नगर, गौतम नगर भागांत नौजवान भारत सभेतर्फे राशन वाटप कोरोनामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका देशभरातील कामगार-कष्टकरी जनतेला बसला आहे. हाताला काम नाही आणि महागाई दिवसेंदिवस नवीन उंची गाठत आहे. अश्या परिस्थितीत रोजंदारीवर काम करणाऱ्यांपासून ते छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या जनतेला एका वेळचे जेवण देखील अशक्यप्राय झाले आहे. साथीचा आजार व कोलमडलेले आर्थिक समीकरण यांमुळे त्रस्त असणाऱ्या कामगार कष्टकरी, गरीब जनतेप्रती असलेली जबाबदारी पूर्ण करण्यास *राज्यातील ठाकरे सरकार व केंद्रातील मोदी सरकार पूर्णतः अयशस्वी ठरले आहे. _ह्याच धर्तीवर नौजवान भारत सभेने ऐन टाळेबंदीच्या काळात स्थानिक कामगार कष्टकऱ्यांच्या…

पुस्तक प्रदर्शन

नौजवान भारत सभेकडून क्रांतिकारकांच्या विचारांच्या प्रचार प्रसारासाठी व प्रगतिशील साहित्य जनतेपर्यंत पोहोचावे म्हणून लावण्यात येत असणारे छोटेखानी पुस्तक प्रदर्शन काल संध्याकाळी, FC कॉलेज रोड ला लावण्यात आले, ज्याला विशेष करून विद्यार्थी व त रुणांचा नेहमीप्रमाणेच चांगला प्रतिसाद मिळाला.

हरियाणा सरकार : वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या फी मधील वाढ रद्द करा! विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरील हल्ला बंद करा! जनतेच्या औषध उपचाराच्या हक्कावरील हल्ला बंद करा!

हरियाणा सरकार : वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या फी मधील वाढ रद्द करा! विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरील हल्ला बंद करा! जनतेच्या औषध उपचाराच्या हक्कावरील हल्ला बंद करा! हरियाणात वैद्यकीय शिक्षणाच्या फी मध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. सरकारी कॉलेज व संस्थानांमध्ये एम. बी. बी. एस. म्हणजेच वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची फी जी 53000 रुपये होती ती आता वाढून 80000 रुपये झाली आहे. एवढेच नव्हे तर यात दरवर्षी 10 टक्के वाढ केली जाणार आहे. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश घेताना फी व्यतिरिक्त 10 लाखांचा बॉण्ड पण भरायचा आहे (फी वजा करून). म्हणजे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याची फी असेल 80000…

स्वातंत्र्यलढ्यातले शहीद क्रांतिकारक जतिंद्रनाथ दास यांच्या जन्मदिनी त्यांना क्रांतिकारक अभिवादन !

स्वातंत्र्यलढ्यातले शहीद क्रांतिकारक जतिंद्रनाथ दास यांच्या जन्मदिनी त्यांना क्रांतिकारक अभिवादन ! राष्ट्रीय चळवळीतील एका महान आदर्शासाठी आपले प्राण अर्पण करणारे क्रांतिकारक जतिंद्रनाथ दास (जतिन दा) यांचा आज जन्मदिवस आहे. क्रांतिकारक चळवळीत सामील होण्यापूर्वी जतिंद्रनाथ दास असहकार चळवळीत सक्रियपणे सहभागी झाले होते आणि त्यांनी अनेक तुरूंगयात्रा केल्या होत्या. जतिंद्रनाथ दास यांनी ‘द रेव्होल्यूशनरी’ आणि ‘पीला पर्चा’ या एच.आर.ए. च्या दोन महान कागदपत्रांच्या प्रकाशनाची व्यवस्था केली. ‘दि रिवोल्यूशनरी’ संपूर्ण देशभरात वितरित केले गेले होते याची जबाबदारी बंगालमध्ये जतिंद्रनाथ दास यांनी आपल्या साथीदारांसह घेतली. जतिंद्रनाथ दास हे संघटनेसाठी निधी आणि शस्त्रे जमा करण्यात…

लेखणीचे सैनिक गणेश शंकर विद्यार्थी यांच्या जन्मदिनानिमित्त (२६ ऑक्टोंबर)

लेखणीचे सैनिक गणेश शंकर विद्यार्थी यांच्या जन्मदिनानिमित्त (२६ ऑक्टोंबर) आजचा काळ असा काळ आहे जेव्हा फॅसिझमची काळी सावली समाजावर पसरलेली आहे, प्रत्येक उत्कृष्ट गोष्टीवर धूळ-राख टाकली जात आहे, मुक्त व स्वतंत्र विचारांचे दमन केले जात आहे, जनपक्षधर बुद्धिजीवी-विचारवंतांवर हल्ले केले जात आहे. अशा काळात गणेश शंकर विद्यार्थींसारख्या लेखणीच्या खरा सैनिकाच्या स्मृती जागवणे अधिक महत्त्वाचे बनले आहे. अलाहाबादच्या अतरसुइया येथे जन्मलेल्या गणेश शंकर विद्यार्थी यांनी राष्ट्रीय आंदोलनाच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण नियतकालिकांमध्ये लिखाण केले आणि हिंदी पट्ट्यात राष्ट्रीय चेतना पसरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ‘स्वराज्य’, ‘अभ्युदय’, ‘हितवार्ता’ सारख्या नियतकालिकांमध्ये लिखाण करण्याव्यतिरिक्त ते ‘सरस्वती’…

लेखणीचे सैनिक आणि झुंझार पत्रकार गणेश शंकर विद्यार्थी ह्यांच्या जयंतीनिमित्त सादर आहेत त्यांची काही निवडक उद्धरणे

लेखणीचे सैनिक आणि झुंझार पत्रकार गणेश शंकर विद्यार्थी ह्यांच्या जयंतीनिमित्त सादर आहेत त्यांची काही निवडक उद्धरणे ‘मी हिंदू-मुस्लिम संघर्षाचे मूळ कारण निवडणुक, इत्यादीला समजतो आणि कौन्सिलमध्ये गेल्यानंतर व्यक्ती देश आणि जनतेच्या कामाचे उरत नाहीत.’ ‘काही लोक हिंदू राष्ट्र – हिंदु राष्ट्र’ हा जयघोष करतात. आम्ही नाही म्हटले तर आम्हाला माफ करा. आपण यावर भर देऊयात की ते एक मोठी चूक करत आहेत आणि त्यांना अद्याप राष्ट्र या शब्दाचा अर्थ समजलेला नाही. आम्ही भविष्यवेत्ते नाही, पण ही अवस्था आपल्याला सांगते आहे की यापुढे जगात हिंदू राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही.’ ‘ते…

भगतसिहं राष्‍ट्रीय रोज़गार गारण्‍टी कानून पारित करो!

भगतसिहं राष्‍ट्रीय रोज़गार गारण्‍टी कानून पारित करो! ________________________________________ अब नींद से जागो! झूठे मुद्दों में उलझने की जगह बेरोज़गारी के खिलाफ़ एकजुट हो ! साथियो! देश में बेरोज़गारी विकराल रूप ग्रहण कर चुकी है। सरकार इसे दैवीय आपदा बताकर अपना पिण्‍ड छुड़ाना चाहती है। कोरोना महामारी का बहाना बनाकर बेरोज़गारी को आकस्मिक आन पड़ी आपदा बताया जा रहा है। परन्‍तु नौजवानों ने मोदी सरकार की असलियत को समझते हुए प्रधानमन्‍त्री और भाजपा के खिलाफ़ सोशल मीडिया चैनलों पर अपना रोष व्‍यक्‍त किया। सितम्‍बर माह में दो बार बेरोज़गारों ने सड़कों…

अमर शहीद अश्फाक उल्ला खान यांची जयंती

आज अमर शहीद अश्फाक उल्ला खान यांची जयंती आहे. शहाजहानपूर, उत्तरप्रदेश मध्ये 22 ऑक्टोबर 1900 ला त्यांचा जन्म झाला. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच HRA चे ते अग्रणी नेते होते. क्रांतिकारक कामांसाठी या संघटनेसोबत जोडलेले क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्र लाहिडी, अश्फाक उल्ला खान, रोशन सिंह व इतर अन्य साथींनी काकोरी नावाच्या ठिकाणी इंग्रजी खजिना लुटला. त्यानंतर बहुतांशी क्रांतीकारकांना इंग्रजांनी अटक केले. राजेंद्र लाहिडी यांना 17 डिसेंबर व बिस्मिल, अश्फाक आणि रोशन सिंह यांना 19 डिसेंबर 1927 ला फासावर चढवण्यात आले. अश्फाक उल्ला खान आणि रामप्रसाद बिस्मिल यांची मैत्री अतुलनीय…

सदस्यता नोंदणी व ऑक्टोबर क्रांतीच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने

आज दि.20 ऑक्टोबर रोजी नौजवान भारत सभा, अहमदनगर युनिटच्यावतीने नौजवान भारत सभेच्या अभियानाअंतर्गत सदस्यता नोंदणी व ऑक्टोबर क्रांतीच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामधे सिध्दार्थनगर वस्तीमधील युवक व युवतींना सदस्यता देण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात क्रांतिकारी गीताने करण्यात आली.यानंतर ऑक्टोबर क्रांतीच्या आठवणींना उजाळा देत आजच्या काळात कामगार कष्टकरी वर्गासाठी त्याचे काय महत्व आहे याबद्दल साथी अतुल ने मांडणी केली.यानंतर नौजवान भारत सभेची भूमिकेबद्दल साथी अपेक्षाने मांडणी केली. यानंतर सदस्यता नोंदणी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साथी अविनाशने के ले.