पुण्यातील अतिवृष्टी ग्रस्त लोकांच्या स्थितीवर पुढाऱ्यांचे चीड आणणारे वर्तन काल 15 ऑक्टोबर’20 रोजी आय.बी.एन. लोकमत चॅनेलने पुण्यातील विविध पक्षांच्या नेत्यांना पुण्यातील आणि विशेषत: आंबिलओढा परिसरातील पुर परिस्थिती बद्दल चर्चेसाठी बोलावले होते. ही चर्चा खालील लिंक वर बघायला मिळू शकते. https://youtu.be/_R9plWCb4do यामध्ये नौजवान भारत सभा आणि स्थानिक पुरग्रस्त नागरिकांनी सुद्धा सहभाग घेतला आणि सुरुवातीलाच समस्या मांडल्या. सर्वच पक्षांचे नेते असल्यामुळे उपायांबद्दल निश्चित काहीतरी ऐकायला मिळेल अशी जर तुमची अपेक्षा होती तर फक्त भ्रमनिरास मिळेल कारण या चर्चेमध्ये सर्व पुढाऱ्यांचे वागणे फक्त चालढकलण्याचे आणि जबाबदारी टाळण्याचे किंबहुना जबाबदारी जनतेवर ढकलण्याचेच होते. चर्चेमध्ये…
Author: nbs_upload
अतिवृष्टी ग्रस्त आंबिलओढा भागातील नागरिकांसाठी मदतीचे आवाहन
___________________ *नौजवान भारत सभेतर्फे तातडीचे आवाहन* *अतिवृष्टी ग्रस्त आंबिलओढा भागातील नागरिकांसाठी मदतीचे आवाहन* गेल्या वर्षी 2019 प्रमाणेच काल 14 ऑक्टोबर पासून चाललेल्या अतिवृष्टीने पुण्यातील आंबिलओढा परिसरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरून लोकांच्या संसाराची नासधूस आणि हानी चालू झाली आहे. घरांमध्ये पाणी घुसले आहे आणि जनता रस्त्यावर फेकली गेली आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच शासनाचा हलगर्जीपणा चालूच आहे आणि लोकांच्या सुरक्षित राहण्याची सुद्धा व्यवस्था केली गेलेली नाही. नौजवान भारत सभेने सतत पाठपुरावा करूनही महानगरपालिका आणि राज्य सरकारने या प्रश्नाकडे गंभीर दुर्लक्ष केले आहे. आता तर पंचनामा करण्यासही सरकारी अधिकारी येत नाहीत ही स्थिती आहे. नौजवान…
लाला हरदयाल के जन्मदिवस (14 अक्टूबर 1884) के अवसर पर
लाला हरदयाल के जन्मदिवस (14 अक्टूबर 1884) के अवसर पर.. (गदर पार्टी के संस्थापक) http://naubhas.com/archives/1094 अमीर वर्ग की हरामख़ोरी में देशभक्ति और मज़हब आदि भी कोई ख़ास रोल अदा नहीं कर सकते। क्या कभी कोई मुसलमान ज़मींदार अपने खेत-मज़दूरों का लगान इसलिए माफ़ कर देता है कि वे मुसलमान हैं? क्यों जी, कभी कोई हिन्दू साहूकार अपने हिन्दू ऋणदाता से ब्याज लेना इसलिए छोड़ देता है कि वह हिन्दू है? क्या सिख राजे-महाराजे, वजीर, अमीर, अपनी सिख रियासतों के सिख किसानों और मज़दूरों से टैक्स और लगान कम वसूल करते…
अमानवीय बलात्कार व हत्येच्या घटनांविरोधात निदर्शन केले.
झाकीर हुसैन नगर, गोवंडी येथे 8 ऑक्टोबर रोजी विविध संघटनांनी हाथरस-बलरामपूर येथे घडलेल्या क्रूर, यामध्ये नौजवान भारत सभा, स्त्री मुक्ती लीग, अखिल भारतीय जाती विरोधी मंच यांचा देखील सहभाग होता हाथरस येथे घडलेल्या नृशंस घटनेविरोधात देशभरात घडणाऱ्या विरोध निदर्शनांमुळे दबावात येऊन योगी प्रशासनाने काही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले असले तरी उत्तर प्रदेशात बलात्काऱ्यांच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्यांना उत्तर प्रदेश पोलीस व योगी आदित्यनाथ सरकारचे पुरेपूर पाठबळ मिळत आहे. महिलाविरोधी, दलित-अल्पसंख्यांकांविरोधी मानसिकता असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या गुंडांची हिम्मत योगी-मोदी सत्तेत आल्यापासून दिवसागणिक वाढत असून परिणामतः दलित, अल्पसंख्यांक, महिला व गरिबांविरोधी…
मानखुर्द – गोवंडी (मुंबई) मध्ये विरोध निदर्शने
दि ०७/१०/२०२० रोजी, मानखुर्द – गोवंडी मध्ये हाथरस आणि बलरामपूर येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणी मानखुर्द – गोवंडी मधील पिएमजीपी कॉलनी व संविधान चौक, लल्लुभाई कंपाऊंड येथे निदर्शने करण्यात आली. देशभरात स्त्री विरोधी अन्याय अत्याचार आणि बलात्कार प्रकरणे आणि हाथरस व बलरामपुर याठिकाणी झालेल्या बलात्कार आणि हत्या या घटनेवर स्त्री मुक्ती लीग कडून डॉक्टर पूजा यांनी आपले म्हणणे मांडत योगी – मोदी सरकार वर जोरदार हल्ला चढवला. झालेल्या प्रकारात योगी सरकार हे आरोपीच्या बाजूने भूमिका घेत आहे आणि हे पहिल्यांदाच होते असे देखिल नाही. या अगोदर सुद्धा कठुवा, उन्नावं, बीजेपी…
चर्चा सत्र
4 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 ते 10.45 ह्या वेळेत नौजवान भारत सभा, पुणे युनिट कडून दांडेकर पूल परिसरातील सर्व्हे न. 214 वस्ती मधील तरुण व कष्टकरी कामगारांसाठी भगतसिंहाचा क्रांतिकारी विचार व आजची परिस्थिती ह्या विषयावर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले. सोबतच चर्चासत्राच्या शेवटी नागरिकांच्या स्थानिक समस्यांवर सुद्धा चर्चा झाली.
उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे घडलेल्या निर्घृण बलात्कार आणि हत्येच्या विरोधात तसेच महिलविरोधी मानसिकता असणाऱ्या योगी सरकार व उत्तर प्रदेश पोलिस प्रशासनाच्या विरोधात 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.00 वाजता संविधान चौक, लल्लूभाई कंपाऊंड, गोवंडी येथे नौजवान भारत सभा, स्त्री मुक्ती लीग आणि अखिल भारतीय जाती विरोधी मंचा तर्फे निदर्शन केले गेले.
देह होत नाही एक दिवस स्त्री आणि उलथापालथ होते सारे जग अचानक!! – कात्यायनी उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे घडलेल्या निर्घृण बलात्कार आणि हत्येच्या विरोधात तसेच महिलविरोधी मानसिकता असणाऱ्या योगी सरकार व उत्तर प्रदेश पोलिस प्रशासनाच्या विरोधात 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.00 वाजता संविधान चौक, लल्लूभाई कंपाऊंड, गोवंडी येथे नौजवान भारत सभा, स्त्री मुक्ती लीग आणि अखिल भारतीय जाती विरोधी मंचा तर्फे निदर्शन केले गेले. ‘फासीवादी योगी-मोदी सरकार मुर्दाबाद’, ‘जातीवाद मुर्दाबाद’, ‘ब्राह्मणवाद मुर्दाबाद’ ‘पितृसत्ता मुर्दाबाद’, ‘हाथरस-बलरामपुरच्या पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे’ ह्या घोषणा देत निदर्शनाची सुरवात करण्यात आली. घडलेल्या क्रूर…
विरोध प्रदर्शने
दि.०३/१०/२०२० रोजी, हाथरस, बलरामपुर येथील बलात्कार आणि हत्या विरोधात मानखुर्द – गोवंडी मध्ये विरोध प्रदर्शने… सहभागी संघटना :- नौजवान भारत सभा स्त्री मुक्ति लीग अखिल भारतीय जाती विरोधी मंच
नौजवान भारत सभेकडून उत्तरप्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे घडलेल्या बलात्कार आणि जातीयवादी हिंसेच्या घटनेविरुद्ध आज सकाळी शिवाजी नगर, गोवंडी, परिसरातील रफिक नगर वस्ती मध्ये अभियान करण्यात आले.
आता बास नौजवान भारत सभेकडून उत्तरप्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे घडलेल्या बलात्कार आणि जातीयवादी हिंसेच्या घटनेविरुद्ध आज सकाळी शिवाजी नगर, गोवंडी, परिसरातील रफिक नगर वस्ती मध्ये अभियान करण्यात आले. आपणा सर्वांना आव्हान आहे की नौजवान भारत सभेच्या अभियान व आंदोलना मध्ये सामील व्हा. वेळ : सायंकाळी 5.00 वाजता स्थळ : संविधान चौक, लल्लूभाई कंपाऊंड, मानखुर्द, गोवंडी संपर्क : 9082861727 9619039793
शनिवार दि. 3 ऑक्टोबर रोजी उत्तरप्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर जिल्ह्यात उच्च जातीयांकडून दलित महिलांवर बलात्कार आणि खुनाच्या विरोधात नौजवान भारत सभा आणि दिशा विद्यार्थी संघटनेकडून दांडेकर पूल येथे निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये दांडेकर पूल भागात राहणाऱ्या वस्त्यांमधील कामगार कष्टकरी जनतेने निषेध व्यक्त केला.
शनिवार दि. 3 ऑक्टोबर रोजी उत्तरप्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर जिल्ह्यात उच्च जातीयांकडून दलित महिलांवर बलात्कार आणि खुनाच्या विरोधात नौजवान भारत सभा आणि दिशा विद्यार्थी संघटनेकडून दांडेकर पूल येथे निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये दांडेकर पूल भागात राहणाऱ्या वस्त्यांमधील कामगार कष्टकरी जनतेने निषेध व्यक्त केला. यावेळी बोलताना नौभास आणि दिशा संघटनेच्या विविध कार्यकर्त्यांनी भुमिका मांडली की सत्तेतच फॅसिस्ट गुंड असल्यामुळे भाजपच्या योगी सरकार आणि स्थानिक प्रशासनाने नेहमीच हिंदुत्ववादी धार्मिक आणि जातीय हिंसा करणाऱ्यांना संरक्षण दिले आहे. उत्तरप्रदेशात महिला असणे हा एक अपराधच असल्यासारखे वाटते आणि त्यात जर दलित महिला असेल तर…
