झाकीर हुसैन नगर, गोवंडी येथे 8 ऑक्टोबर रोजी विविध संघटनांनी हाथरस-बलरामपूर येथे घडलेल्या क्रूर,
यामध्ये नौजवान भारत सभा, स्त्री मुक्ती लीग, अखिल भारतीय जाती विरोधी मंच यांचा देखील सहभाग होता
यामध्ये नौजवान भारत सभा, स्त्री मुक्ती लीग, अखिल भारतीय जाती विरोधी मंच यांचा देखील सहभाग होताहाथरस येथे घडलेल्या नृशंस घटनेविरोधात देशभरात घडणाऱ्या विरोध निदर्शनांमुळे दबावात येऊन योगी प्रशासनाने काही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले असले तरी उत्तर प्रदेशात बलात्काऱ्यांच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्यांना उत्तर प्रदेश पोलीस व योगी आदित्यनाथ सरकारचे पुरेपूर पाठबळ मिळत आहे. महिलाविरोधी, दलित-अल्पसंख्यांकांविरोधी मानसिकता असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या गुंडांची हिम्मत योगी-मोदी सत्तेत आल्यापासून दिवसागणिक वाढत असून परिणामतः दलित, अल्पसंख्यांक, महिला व गरिबांविरोधी अपराधांना उधाण आले आहे. न्यायपालिका, प्रसारमध्यमांपासून सर्वांनाच खिशात ठेवणाऱ्या भाजपाविरोधात रस्त्यावर उतरून, संघटित होऊन संघर्ष करण्याखेरीज दुसरा पर्याय नाही.
न्यायप्रिय मित्र-मैत्रिणींनो, आज ह्या क्रूर, अमानवीय घटनांविरोधात आवाज न उठवणे म्हणजे ह्या घटनांना मूक समर्थन करण्यासारखेच आहे. ही आग आपल्या घरालाही कोणत्याही क्षणी पोळून काढून शकते. म्हणून वेळेत सावध होऊन, संघटित होऊन ह्या क्रूर फासीवादी, महिलविरोधी, भांडवलदारांची सेवा करणाऱ्या सत्तेला उखडून फेकणे गरजेचे आहे.
आपणही ह्या निदर्शनांमध्ये तसेच अभियानांमध्ये सामील व्हा, सामील होण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.
