शनिवार दि. 3 ऑक्टोबर रोजी उत्तरप्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर जिल्ह्यात उच्च जातीयांकडून दलित महिलांवर बलात्कार आणि खुनाच्या विरोधात नौजवान भारत सभा आणि दिशा विद्यार्थी संघटनेकडून दांडेकर पूल येथे निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये दांडेकर पूल भागात राहणाऱ्या वस्त्यांमधील कामगार कष्टकरी जनतेने निषेध व्यक्त केला.

यावेळी बोलताना नौभास आणि दिशा संघटनेच्या विविध कार्यकर्त्यांनी भुमिका मांडली की सत्तेतच फॅसिस्ट गुंड असल्यामुळे भाजपच्या योगी सरकार आणि स्थानिक प्रशासनाने नेहमीच हिंदुत्ववादी धार्मिक आणि जातीय हिंसा करणाऱ्यांना संरक्षण दिले आहे. उत्तरप्रदेशात महिला असणे हा एक अपराधच असल्यासारखे वाटते आणि त्यात जर दलित महिला असेल तर तिच्यावर अत्याचार करण्यासाठी खुली सूट मिळते. संपत्तीधारक वर्ग आज आपल्या पूर्वापारच्या जातीय़ अस्मितांचा वापर करत शोषित, दलित, कामगार-कष्टकऱ्यांवर आपले प्रभुत्व गाजवण्याच्या हत्याराच्या रुपाने स्त्रियांवर बलात्काराच्या हत्याराचा वापर करत आहेत. म्हणून आता संघटित होऊन ह्या वाढत्या अत्याचाराच्या विरोधात आपण रस्त्यावर उतरायला पाहिजे आणि समतामूलक आणि न्याय्य समाजच्या निर्मितीसाठी एका हाताने भांडवलशाही आणि दुसऱ्या हाताने जातीव्यवस्था आणि पितृसत्तेला पायदळी तुडवले पाहिजे.
या दोन्ही घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, योगी सरकारने राजीनामा दिला पाहिजे, दोषी पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Related posts

Leave a Comment

fifteen − fourteen =