दिल्लीतील जंतरमंतर येथे पेपरफुटी आणि नोकरभरतीतील घोटाळ्यांच्या विरोधात देशभरातील विद्यार्थी आणि तरुणांनी केली झुंजार निदर्शने!

पोलिसांनी निर्दयीपणे आंदोलनाचे दमन करून शेकडो विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन कापसहेडा सीमा पोलीस ठाण्यात डांबून ठेवले.
मोदी सरकार आणि दिल्ली पोलिसांचा विद्यार्थी-युवकविरोधी चेहरा पुन्हा एकदा उघडकीस!
पारदर्शक परीक्षा पध्दती आणि भ्रष्टाचारमुक्त नोकरभरती हा आमचा हक्क आहे, पोलिसांच्या दडपशाहीने आमचा संघर्ष थांबणार नाही!
पेपरफुटी आणि भरतीतील हेराफेरीच्या विरोधात भगतसिंह जनअधिकार यात्रेअंतर्गत दिशा-नौभासचे आंदोलन सुरूच राहणार!

Related posts

Leave a Comment

8 − 6 =