अतिवृष्टी ग्रस्त आंबिलओढा भागातील नागरिकांसाठी मदतीचे आवाहन

___________________
*नौजवान भारत सभेतर्फे तातडीचे आवाहन*
*अतिवृष्टी ग्रस्त आंबिलओढा भागातील नागरिकांसाठी मदतीचे आवाहन*
गेल्या वर्षी 2019 प्रमाणेच काल 14 ऑक्टोबर पासून चाललेल्या अतिवृष्टीने पुण्यातील आंबिलओढा परिसरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरून लोकांच्या संसाराची नासधूस आणि हानी चालू झाली आहे. घरांमध्ये पाणी घुसले आहे आणि जनता रस्त्यावर फेकली गेली आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच शासनाचा हलगर्जीपणा चालूच आहे आणि लोकांच्या सुरक्षित राहण्याची सुद्धा व्यवस्था केली गेलेली नाही. नौजवान भारत सभेने सतत पाठपुरावा करूनही महानगरपालिका आणि राज्य सरकारने या प्रश्नाकडे गंभीर दुर्लक्ष केले आहे. आता तर पंचनामा करण्यासही सरकारी अधिकारी येत नाहीत ही स्थिती आहे.
नौजवान भारत सभा सर्व संवेदनशील, न्यायप्रिय, जनाभिमुख युवकांना आवाहन करत आहे की त्यांनी आपल्या कष्टकरी-कामगार भावा-बहिणींच्या मदतीला धावून यावे आणि अतिवृष्टी/पुरामुळे बाधितांच्या घरातील शिरलेला गाळ व पाणी काढणे तसेच स्वच्छतेच्या कामामध्ये स्वयंसेवी योगदान द्यावे.
काम सुरू झाले आहे आणि तातडीने आपल्या सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे.
येणाऱ्या प्रत्येकाने कोरोनाचा धोका लक्षात घेता मास्क नक्की घालून येणे.
संपर्क
डॉ निखिल 99705 76130
रवी 89568 40785

Related posts

Leave a Comment

19 − 2 =