उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे घडलेल्या निर्घृण बलात्कार आणि हत्येच्या विरोधात तसेच महिलविरोधी मानसिकता असणाऱ्या योगी सरकार व उत्तर प्रदेश पोलिस प्रशासनाच्या विरोधात 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.00 वाजता संविधान चौक, लल्लूभाई कंपाऊंड, गोवंडी येथे नौजवान भारत सभा, स्त्री मुक्ती लीग आणि अखिल भारतीय जाती विरोधी मंचा तर्फे निदर्शन केले गेले.

देह होत नाही
एक दिवस स्त्री
आणि
उलथापालथ होते
सारे जग अचानक!!
– कात्यायनी
उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे घडलेल्या निर्घृण बलात्कार आणि हत्येच्या विरोधात तसेच महिलविरोधी मानसिकता असणाऱ्या योगी सरकार व उत्तर प्रदेश पोलिस प्रशासनाच्या विरोधात 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.00 वाजता संविधान चौक, लल्लूभाई कंपाऊंड, गोवंडी येथे नौजवान भारत सभा, स्त्री मुक्ती लीग आणि अखिल भारतीय जाती विरोधी मंचा तर्फे निदर्शन केले गेले.
‘फासीवादी योगी-मोदी सरकार मुर्दाबाद’, ‘जातीवाद मुर्दाबाद’, ‘ब्राह्मणवाद मुर्दाबाद’ ‘पितृसत्ता मुर्दाबाद’, ‘हाथरस-बलरामपुरच्या पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे’ ह्या घोषणा देत निदर्शनाची सुरवात करण्यात आली. घडलेल्या क्रूर घटनेला तसेच महिला, अल्पसंख्यांक, दलितांवर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अत्याचारांचे वास्तव व्यापक प्रमाणात लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी पत्रकांचे वितरण करण्यात आले.
नौजवान भारत सभेकडून अविनाशने जातीयवादी, धर्मांध, फासीवादी, पितृसत्तेचे पाईक असणाऱ्या योगी-मोदी सरकरच्या काळात दलित, अल्पसंख्याक, महिला, गरीबांवर वाढत जाणाऱ्या अत्याचारांविषयी सांगितले. गौरक्षा, हिंदू राष्ट्राच्या नावावर होणाऱ्या मॉब लिंचिंग,
जनतेला बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, गरीबी यांसारख्या मूळ मुद्द्यांवरून भटकवण्यासाठी पसरवण्यात येणारी जातीय आणि धर्मीय तेढ यावर प्रकाश टाकत कामगार कष्टकरी जनतेला प्रत्येक प्रकारच्या दमन-शोषणाविरोधात एकजूट होण्याचे आव्हान केले. अखिल भारतीय जाती विरोधी मंचातर्फे बबन ने खैरलांजी पासून ते आजच्या हाथरस-बलरामपूरच्या घटनांविषयी सांगत सत्तेत असणाऱ्या काँग्रेस-भाजपा चे दलित विरोधी चरित्र स्पष्ट केले. जातीवादाविरोधात कामगार-कष्टकरी वर्गीय एकजूटच गरजेचे असल्याचे सांगितले. स्त्री मुक्ती लीग कडून पूजा ने हाथरस बलरामपूर ला घडलेल्या निर्घृण घटनेचे वास्तव सांगून, आजची भांडवली व्यवस्था कशाप्रकारे स्त्रियांना एक उपभोगाची वस्तू म्हणून प्रस्तुत करते आणि त्यामुळे महिलांवर होणाऱ्या अत्याचार-हिंसेच्या घटनांमध्ये होणाऱ्या वाढीबद्दल सांगितले. एका समतामूलक – न्याय्य, महिलांसाठी सुरक्षित समाज घडविण्यासाठी संघटित होऊन भांडवलशाही आणि पितृसत्ता यांना नेस्तनाभूत करावे लागेल व जनतेला एकजूट होऊन रस्त्यावर उतरून अश्या क्रूर, निर्दयी घटनांचा विरोध करायला लागेल हे देखील पूजा ने मांडले.
न्यायप्रिय मित्र-मैत्रिणींनो, आज ह्या क्रूर, अमानवीय घटनांविरोधात आवाज न उठवणे म्हणजे ह्या घटनांना मूक समर्थन करण्यासारखेच आहे. ही आग आपल्या घरालाही कोणत्याही क्षणी पोळून काढून शकते. म्हणून वेळेत सावध होऊन, संघटित होऊन ह्या क्रूर फासीवादी, महिलाविरोधी, भांडवलदारांची सेवा करणाऱ्या सत्तेला उखडून फेकणे गरजेचे आहे.
स्त्रियांवरील अत्याचार थांबलेच पाहिजेत!
हाथरसच्या बलात्काऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे!
जातीय अत्याचार थांबलेच पाहिजेत!
योगी सरकार राजीनामा द्या!
दोषी पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे
आपणही ह्या निदर्शनांमध्ये तसेच अभियानांमध्ये सामील व्हा, सामील होण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.
!
*संपर्क*:
अविनाश 9082861727
बबन 9619039793

Related posts

Leave a Comment

1 × three =