हत्येला धार्मिक रंग देऊन सामाजिक शांतता भंग करणाऱ्यांना अटक करा ! गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी पालघर येथे गाडीने सुरतला चाललेल्या तीन व्यक्तींची जमावाद्वारे हत्या केली गेली. मृत व्यक्तींमध्ये गाडीचे ड्रायव्हर निलेश तेलगडे (वय 30) तसेच सुशिलगिरी महाराज (वय 35) आणि चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (वय 70) हे साधू सामील आहेत. लॉकडाऊनच्या काळात पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही चोर दरोडेखोर येतात आणि किडन्या काढून नेतात अशा अफवा नागरिकांमध्ये पसरत होत्या. याच अफवांमधून जमावाने तीन जणांची हत्या केल्याचं स्पष्टपणे पोलिस अहवालामध्ये म्हटले आहे. या प्रकरणात 110 जणांवर गुन्हाही दाखल झाला आहे. अशा…
ज़हरखुरानी गोदी मीडिया से सावधान!!!
बांद्रा, मुम्बई में हज़ारों प्रवासी मज़दूरों के व्यवस्थागत फूटे गुस्से को सांप्रदायिक रंग देने की साज़िश को नाकाम करो !! बांद्रा, मुम्बई में हज़ारों प्रवासी मज़दूर सड़क पर उतर आए। जिन पर पुलिस द्वारा लाठीचार्ज भी किया गया। देश भर की मेहनतकश आबादी बिना किसी प्लानिंग के किये गए लॉक डाउन से परेशान थी।सरकार के गैर जिम्मेदाराना रवैये से मज़दूरों के आजीविका के सारे प्रबंध कराए बिना यह फैसला ले लिया गया था। ऐसे में आज मज़दूरों का गुस्सा व्यवस्थागत दिक्कतों से फूटा है। पर गोदी मीडिया इसे भी साम्प्रदायिक…
आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांच्या अटकेचा तीव्र निषेध !
आज 14 एप्रिल रोजी लोकशाही व नागरी अधिकार कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राष्ट्रीय तपास संस्थेेने (NIA) ने अटक केली आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार भडकवण्याच्या आरोपाखाली या आधी अनेक लोकशाही व नागरी अधिकार कार्यकर्त्यांना UAPA सारख्या मानवद्रोही कायद्यांखाली अटक करण्यात आली आहे. UAPA देशातील त्या काळ्या कायद्यांपैकी आहे जे सरकारला कोणत्याही व्यक्तीला विना खटला अनेक महिने तुरुंगात टाकण्याचे, अत्यंत लोकशाही विरोधी अधिकार देतात. सुप्रिम कोर्टाचे न्यायाधिश चंद्रचूड यांनी या केसच्या खोटेपणाबद्दल आपल्या निकालात मत दिले होते. महाराष्ट्र सरकारने सुद्धा या केसच्या खोट्या असल्याबद्दल आपले मत…
नौजवान भारत सभेच्यावतीने काल 18 मार्च रोजी, 23 मार्च शाहिद दिनानिमित्त अहमदनगर शहरात वॉल पेंटिंग करण्यात आली.
अहमदनगर मध्ये सीएए, एनआरसी,एनपीआर विरोधात जनजागृती सभा
✊✊✊ *जाती-धर्म नही बटेंगे, मिलजूल कर संघर्ष करेंगे!* अहमदनगर मध्ये सीएए, एनआरसी,एनपीआर विरोधात जनजागृती सभा रविवार दिनांक 15/3/2020 रोजी नौजवान भारत सभा व संविधान बचाव जन आंदोलनाच्या वतीने CAA,NRC,NPR या गरीबविरोधी काळ्या कायद्याच्या विरोधात बाराइमाम कोटला, (इमामबाड़ा) अहमदनगर येथे जनजागृती अभियान चालविण्यात आले.यावेळी बोलताना संविधान बचाव जनआंदोलनाचे युनूस भाई तांबटकर म्हणाले की, सरकारला जर विदेशी नागरिकांना बाहेर काढायचे आहे तर त्यांनी खुशाल बाहेर काढावे, परंतु त्यासाठी संपूर्ण देशातील जनतेला लाईनमध्ये लावण्याची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित केला. शेवटी त्यांनी उपस्थित महिलांना आवाहन केले, की या काळ्या कायद्याच्या विरोधात येत्या 20,21व…
स्त्री मुक्ती लीग व नौजवान भारत सभेच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर मधील सिद्धार्थनगर भागामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा*
रविवार दिनांक 8/3/2020 रोजी सायंकाळी 5:00 वाजता नौजवान भारत सभेच्या वतीने सिद्धार्थनगर,म्यूनिसिपल कॉलनी परिसरामध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी स्त्री मुक्ती लीग च्या कार्यकर्त्या साथी अपेक्षा यांनी ‘अमन के हम रखवाले सब एक है’ हे क्रांती गीत गायले.यानंतर नौजवान भारत सभेचे साथी प्रवीण यांनी उपस्थितांना संबोधित केले.त्यांनी आपल्या बोलण्याची सुरूवात करताना ‘महिलाए अब उठी नही तो जुल्म बढता जायेगा’ क्रांती गीत गायले. 8 मार्च इतिहास सांगताना ते म्हणाले की 8 मार्च 1908 ला अमेरिकेच्या न्यूयार्क शहरामध्ये कापड उद्योगात काम करणार्या महिला कामगारांनी मतदानाचा अधिकार आणि युनियन बनवण्याचा अधिकार…
पुण्यातील काशेवाडी भागामध्ये नौभास आणि शाहीनबाग, मोमीनपुरा येथील महिला साथींनी एकञित सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात घरोघरी जाऊन अभियान राबविले.
पुण्यातील काशेवाडी भागामध्ये नौभास आणि शाहीनबाग, मोमीनपुरा येथील महिला साथींनी एकञित सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात घरोघरी जाऊन अभियान राबविले. अभियानाला स्थानिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सर्वच धर्मांच्या लोकांनी एनपीआर प्रक्रियेवर सविनय बहिष्कार टाकण्याचे ठरविले. या कायद्याच्या समर्थकांनी दिल्लीमध्ये नुकत्याच केलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काशेवाडी परिसरात हे अभियान चालू होते. त्यामुळे कोणत्याही दंगलखोराला सदर परिसरात घुसू न देण्याचे आव्हान नौभास आणि इतर कार्यकर्त्यांनी केले. लोकांनी या आव्हानाचे प्रचंड स्वागत केले आणि शांतता पाळण्याचे आश्वासनही दिले.
शांतता व एकता रॅली
शांतता व एकता रॅली रविवार 1 मार्च रोजी पुण्यामध्ये ‘हम भारत के लोग’ तर्फे दिल्ली मधील राजसत्तेच्या समर्थनाने झालेल्या हल्ल्याच्या विरोधात, धार्मिक शांततेचे आणि एकतेचे आवाहन करत एक रॅली आयोजित केली गेली. रॅली शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय काढली गेली. नौभास आणि इतर संघटनांचे कार्यकर्ते, सामान्य नागरिक रॅली मध्ये सामील झाले.
सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात शाहीनबाग, मोमीनपुरा येथे सलग ३० दिवस चालू असलेल्या आंदोलनला समर्थन देण्यासाठी दि. २७ फेब्रुवारी रोजी, नौजवान भारत सभेचे कार्यकर्ते हजर होते.
सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात शाहीनबाग, मोमीनपुरा येथे सलग ३० दिवस चालू असलेल्या आंदोलनला समर्थन देण्यासाठी दि. २७ फेब्रुवारी रोजी, नौजवान भारत सभेचे कार्यकर्ते हजर होते. यावेळी प्रा. अभिजीत अ. मी यांनी राजधानी दिल्लीत संघी गुंडांकडून चालू असलेल्या धार्मिक उन्मादावर कडक टिका केली. तसेच डॉ. नेहा मोरखडे यांनी केलेल्या मांडणीमध्ये चूल आणि मूल चौकट मोडून महिला सामाजिक प्रश्नावर बेधडक आणि ठामपणे उभ्या ठाकल्या आहेत याचं महत्व अधोरेखित केलं. दोन्ही कार्यकर्त्यांनी भाषणानंतर जोरदार घोषणाबाजी करत सर्व आंदोलनकार्त्यांमध्ये जोश भरला. आंदोलनातील काही क्षणचित्रे.
एन आर सी, एन पी आर, सी ए ए कायदे काय आहेत ? नागरिकता कायदा काय आहे? एन पी आर आणि एन आर सी चे कनेक्शन काय ? या कायद्यांनी खरंच कोणाला धोका संभवतो ? हा फक्त मुस्लिमांचा प्रश्न आहे का ? आसामचा अनुभव काय आहे ? जाणून घ्या, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओतून
एन आर सी, एन पी आर, सी ए ए कायदे काय आहेत ? नागरिकता कायदा काय आहे? एन पी आर आणि एन आर सी चे कनेक्शन काय ? या कायद्यांनी खरंच कोणाला धोका संभवतो ? हा फक्त मुस्लिमांचा प्रश्न आहे का ? आसामचा अनुभव काय आहे ? जाणून घ्या, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओतून https://www.youtube.com/channel/UCktaWK7aWuQmwzbkc1zSWyg
