दि.२९/०९/२०२० रोजी सकाळी संविधान चौक, लल्लुभाई कंपाऊंड, मानखुर्द, (मुंबई) या ठिकाणी ‘शहीद स्मृती संकल्प अभियान’ अंतर्गत शहीद भगतसिंह व अन्य क्रांतिकारी साहित्याचे प्रदर्शन लावण्यात आले.
जिल्हा रुग्णालय,अहमदनगर समोर नौजवान भारत सभेचे जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या बेजवाबदार आणि असंवेदशील कर्तव्या विरोधात निषेध आंदोलन
दि.29 रोजी सकाळी 11 वा. आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नौजवान भारत सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते. हे आंदोलन सोशल डिस्टसिंग ठेऊन करण्यात आले. मागील महिन्यात 26 तारखेला दिलेल्या निवेदनाच्या मागण्या पुर्ण न केल्याने हे आंदोलन करण्यात आले. या निवेदनामधे संघटनेच्यावतीने जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सॅनिटायझर स्पॉट बसवणे,बऱ्याच वर्षापासून बंद पडलेली लिफ्ट चालू करणे,स्वच्छता,पिण्याचा पाण्याचा प्रश्न,नॉन कोविड रुग्णाना उपचार,आय.सी.यु मधे सी.सी.टीव्ही कॅमेरे,प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याचा सुरक्षेचा प्रश्न,अपुरे मनुष्यबळ अशा अनेक मागण्यांना घेऊन निवेदन देण्यात आले होते. परंतू एक महिना होऊनही कुठली मागणी पूर्ण न केल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची सुरवात…
अहमदनगर येथे नौजवान भारत सभेच्यावतीने २८ सप्टेंबर, शहीद भगतसिंह जन्मदिना निमित्त भगतसिंहाना अभिवादन करून शहीद भगतसिंह स्मृती संकल्प व नौजवान भारत सभा सदस्यता अभियानाला सुरुवात करण्यात आली
शहीद भगत सिंह स्मृति संकल्प अभियान के तहत 27-28 सितम्बर को सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन
नौजवान भारत सभा द्वारा मुम्बई में ‘शहीद भगत सिंह स्मृति संकल्प अभियान’ के तहत 27-28 सितम्बर को गोवंडी -मानखुर्द में सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया गया। सांस्कृतिक कार्यक्रम के तहत तमाशा नाटक , गीत,कविता पाठ और पुस्तक प्रदर्शनी रखी गई। कार्यक्रम में बात रखते हुए नैभास की तरफ से अविनाश ने कहा कि कोरोना के समय मोदी सरकार के गैरजिम्मदाराना तरीके से लॉकडॉउन लागू किया,जिससे आम मेहनतकश आबादी को कष्ट उठाना पड़ा । मगर अब तो हालात और बदतर हो गए है । रोजाना लाखों की संख्या में कोरोना मरीज़…
शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियान अंतर्गत नौभास सदस्यता आव्हान आणि पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन
दि. २६/०९/२०२० रोजी सायं. गौतमनगर, (गोवंडी, मुंबई) येथे नौभास कडून सदस्यता अभियान चालवण्यात आले. समाजात दुही माजवण्यासाठी सांप्रदायिक शक्ती जाती धर्माच्या नावाने विष पेरून तरुण पिढ्यांना पोखरून बर्बाद करण्याचे काम मीडिया आणि सांप्रदायिक संघ परिवार करत आहे. अशा काळात तरुणांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, अशा अनेक प्रगतिशील सामाजिक व राजकीय मुद्द्यावर संघटित करून निर्णायक लढा उभा करण्याचा प्रामाणिक प्रयत्नाचा आणि क्रांतिकारी वारशाच्या अभियानाचा एक भाग म्हणून सदस्यता अभियान चालविण्यात येत आहे. यामध्ये पुस्तके हे सर्वात महत्त्वाची आणि मानव निर्मित समस्त चमत्काराचा भाग म्हणून नेहमीच महत्त्वाची भूमिका निभावत असतात म्हणून जागोजागी पुस्तक…
शहीद भगतसिंहाच्या 113 व्या जन्मदिनानिमित्ताने नौजवान भारत सभेचे विशेष सदस्यता अभियान पुणे येथील राजेंद्र नगर, येरवडा मार्केट, सर्व्हे नं 133, 134 दांडेकर पूल, 52 चाळ येथे दि. 22 ते 26 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात आले
शहीद भगतसिंहाच्या 113 व्या जन्मदिनानिमित्ताने नौजवान भारत सभेचे विशेष सदस्यता अभियान पुणे येथील राजेंद्र नगर, येरवडा मार्केट, सर्व्हे नं 133, 134 दांडेकर पूल, 52 चाळ येथे दि. 22 ते 26 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात आले. आज देशाला स्वातंत्र मिळून 73 वर्षे उलटल्यानंतर सुद्धा स्तिथी अशी आहे की देशातले कोट्यवधी लोक महागाई, बेकारी, टाळेबंदी, कामगार कपात, लूट आणि भ्रष्टाचार यांचा मार भोगत आहेत. शिक्षण, आरोग्य, पाणी ,वीज या सारख्या मूलभूत सुविधा मिळवणे सुद्धा जनतेसाठी अधिकच कठीण झाले आहे. अशा समाजात जर परिवर्तन आणायचे असेल तर विचारी, साहसी आणि प्रत्येक प्रकारच्या बलिदानासाठी तयार…
शहिद भगतसिंहांच्या 113 व्या जन्मदिवसा निमित्ताने आज 27 सप्टेंबर रोजी दांडेकर पूल सर्व्हे नं 133 येथे नौजवान भारत सभा, पुणे युनिट द्वारे ‘शहीद भगतसिंह वाचनालयाची’ सुरूवात करण्यात आली
शहिद भगतसिंहांच्या 113 व्या जन्मदिवसा निमित्ताने आज 27 सप्टेंबर रोजी दांडेकर पूल सर्व्हे नं 133 येथे नौजवान भारत सभा, पुणे युनिट द्वारे ‘शहीद भगतसिंह वाचनालयाची’ सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमावेळी शारीरिक अंतर पाळत वस्तीतील कामगार कष्टकरी आणि नौभासचे कार्यकर्ते उपस्थित होते. उदघाटनाची सुरुवात भगतसिंहांना अभिवादन करणाऱ्या क्रांतिकारी गीताने केली गेली. यानंतर नौभास, पुणेचे समन्वयक डॉ निखिल यांनी भगतसिंहांचे संक्षिप्त चरित्र व त्यांचे क्रांतिकारी विचार व आजच्या परिस्थितीमध्ये त्यांची प्रासंगिकता यावर विचार मांडले. समतापूर्ण समाजाची निर्मिती करायची असेल तर आज भगतसिंहाची प्रेरणा घेऊन देशभरातील तरुण-तरुणींना, कामगार कष्टकऱ्यांना जातीभेद विसरून आपल्या न्याय्य अधिकारांसाठी…
नौजवान भारत सभा द्वारा मुम्बई में ‘शहीद भगत सिंह स्मृति संकल्प अभियान’ चलाया जा रहा है
नौजवान भारत सभा द्वारा मुम्बई में ‘शहीद भगत सिंह स्मृति संकल्प अभियान’ चलाया जा रहा है। जिसके तहत कल 25 सितम्बर को गोवंडी मानखुर्द के रफीक नगर में पुस्तक प्रदर्शनी और अभियान चलाया गया। अभियान में साथी पूजा ने बात रखते हुए कहा कि आज देश की हालत बद से बदतर होती जा रही है। रोजाना लाखों लोग कोरोना के शिकार हो रहे है और अस्पतालों में ऑक्सीजन की कमी देखने को मिल रही है। एक तरफ देश में बेरो़गारी लगातर बढ़ रही है और दूसरी तरफ सरकार अडानी अम्बानी…
कामगार-कष्टकरी जनता ओढ्याच्या पात्रालगत घाणीत मरणाची हौस पूर्ण करण्यासाठी वास्तव्य करते असे शासन-प्रशासनाला वाटते की काय?
22 सप्टेंबर ला तहसीलदार कार्यलया कडून आंबिल ओढ्यालगतच्या वस्त्यांमध्ये एक ‘नम्र आवाहन’ करणारी नोटीस लावण्यात आलेली आहे. ह्याला नम्र आवाहन म्हणायचे की असंवेदनशील, बेजबाबदार व आसन्न संकटाचा सर्व भार पीडित जनतेवर लोटणारा व कष्टकरी कामगार जनतेला रस्त्यावर आणणारा क्रुर आदेश? ठीक एक वर्षाआधी 25 सप्टेंबर 2019 ला आंबिल ओढा परिसरात पुर आला होता. ह्यात ओढ्यालगत अत्यंत असुरक्षित परिस्थितीत राहणाऱ्या कामगार कष्टकरी जनतेची अतोनात हानी झाली. जनतेने निर्धाराने संघर्ष करून, अनेकदा लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांकडे मागण्यांसाठी चप्पल झिजवून सुद्धा महानगरपालिका व राज्य सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. अनेकांच्या घरांचे नुकसान झालेले असतांना…
नौजवान भारत सभा व आंबीलओढा पूरग्रस्त नागरिक संघर्ष समितीच्या वतीने आंबीलओढ्यालगतच्या भिंतीचे काम पूर्णत्वास न्यावे आणि सदर वस्त्यांमधील नाल्यांचे आणि चेंबर्सच्या दुरुस्तीचे आणि स्वच्छतेचे काम येत्या दोन दिवसात करून द्यावे ह्या मागण्या घेऊन पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना दि. २२ सप्टेंबर २०२० रोजी निवेदन देण्यात आले
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत आलेल्या पुरामुळे आंबिलओढ्यालगतची भिंत फुटून ओढ्यालगत राहणाऱ्या हजारो नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. येत्या काळात भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार कधीही अतिवृष्टी होऊ शकते आणि पूर येऊ शकतो म्हणून सर्व्हे नं 133, 134, 214 दांडेकर पूल भागात नौजवान भारत सभेच्या कार्यकर्त्यांनी पूर्वपरिस्थितीपासून बचाव होण्यासाठी कोणती कामे बाकी आहेत याची घरोघरी जाऊन चर्चा केली. चर्चेदरमान्य नागरिकांचा प्रशासनाबद्दल प्रचंड राग दिसून आला. एक वर्ष पूर्ण झाले तरी प्रशासनाने आंबीलओढ्या लगतच्या भिंतीचे काम पूर्ण केलेले नाही. वस्त्यामधील नाल्यांचे आणि चेंबर्सचे काम सुद्धा पूर्ण झालेली नाही. भीतीदायक वातावरणात येथील कामगार कष्टकऱ्यांना राहावे…
