शहिद भगतसिंहांच्या 113 व्या जन्मदिवसा निमित्ताने आज 27 सप्टेंबर रोजी दांडेकर पूल सर्व्हे नं 133 येथे नौजवान भारत सभा, पुणे युनिट द्वारे ‘शहीद भगतसिंह वाचनालयाची’ सुरूवात करण्यात आली

शहिद भगतसिंहांच्या 113 व्या जन्मदिवसा निमित्ताने आज 27 सप्टेंबर रोजी दांडेकर पूल सर्व्हे नं 133 येथे नौजवान भारत सभा, पुणे युनिट द्वारे ‘शहीद भगतसिंह वाचनालयाची’ सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमावेळी शारीरिक अंतर पाळत वस्तीतील कामगार कष्टकरी आणि नौभासचे कार्यकर्ते उपस्थित होते.
उदघाटनाची सुरुवात भगतसिंहांना अभिवादन करणाऱ्या क्रांतिकारी गीताने केली गेली. यानंतर नौभास, पुणेचे समन्वयक डॉ निखिल यांनी भगतसिंहांचे संक्षिप्त चरित्र व त्यांचे क्रांतिकारी विचार व आजच्या परिस्थितीमध्ये त्यांची प्रासंगिकता यावर विचार मांडले. समतापूर्ण समाजाची निर्मिती करायची असेल तर आज भगतसिंहाची प्रेरणा घेऊन देशभरातील तरुण-तरुणींना, कामगार कष्टकऱ्यांना जातीभेद विसरून आपल्या न्याय्य अधिकारांसाठी एकजुट होऊन लढावे लागेल, क्रांतिकारी परिवर्तनाचा विचार स्विकारून आपले लढे उभे करावे लागतील ही मांडणी केली.
साथी अश्विनी यांनी वाचनालयात उपलब्ध असलेल्या पुस्तिकांबद्दल मांडत वाचनाचे महत्त्व मांडले.
यानंतर भगतसिंहांना अभिवादन करणाऱ्या घोषणा देत कार्यक्रम संपला.
संपर्क:
रवि: 8956840785
निखिल: 8669735643

Related posts

Leave a Comment

three × 4 =