शहीद भगतसिंहाच्या 113 व्या जन्मदिनानिमित्ताने नौजवान भारत सभेचे विशेष सदस्यता अभियान पुणे येथील राजेंद्र नगर, येरवडा मार्केट, सर्व्हे नं 133, 134 दांडेकर पूल, 52 चाळ येथे दि. 22 ते 26 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात आले

शहीद भगतसिंहाच्या 113 व्या जन्मदिनानिमित्ताने नौजवान भारत सभेचे विशेष सदस्यता अभियान पुणे येथील राजेंद्र नगर, येरवडा मार्केट, सर्व्हे नं 133, 134 दांडेकर पूल, 52 चाळ येथे दि. 22 ते 26 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात आले. आज देशाला स्वातंत्र मिळून 73 वर्षे उलटल्यानंतर सुद्धा स्तिथी अशी आहे की देशातले कोट्यवधी लोक महागाई, बेकारी, टाळेबंदी, कामगार कपात, लूट आणि भ्रष्टाचार यांचा मार भोगत आहेत. शिक्षण, आरोग्य, पाणी ,वीज या सारख्या मूलभूत सुविधा मिळवणे सुद्धा जनतेसाठी अधिकच कठीण झाले आहे. अशा समाजात जर परिवर्तन आणायचे असेल तर विचारी, साहसी आणि प्रत्येक प्रकारच्या बलिदानासाठी तयार असलेल्या तरुण-तरुणींना पुढे यावे लागेल आणि एकजूट होऊन आपल्या प्रत्येक न्याय्य अधिकारासाठी झगडावेच लागेल, हा भगतसिंहाचा संदेश घेऊन नौभासच्या पुणे युनिटचे कार्यकर्ते घरोघरी गेले आणि तरुण-तरुणींना भगतसिंहांच्या विचारांवर चालणाऱ्या नौजवान भारत सभेचे सदस्यत्व घेण्याचे आवाहन केले. कोरोनाच्या काळात कामगार-कष्टकरी वर्गाला अतोनात हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. बेरोजगारी, राशन, घरभाडे, वीजबिल, कोरोनापासून संरक्षण होण्यासाठीच्या सुविधा, कोरोना झाल्यानंतर उपचार, कामगार कायद्यांवर राज्य आणि केंद्र सरकारांनी केलेला प्रहार अशा अनेक प्रश्नांना रोज सामोरे जात कामगार-कष्टकरी आपले आयुष्य जगत आहेत. कामगार कायद्यांमध्ये केलेले बदल रद्द केले जावे, राशन उपलब्ध करून दिले जावे, कोरोनापासून बचावासाठी योग्य ती संसाधने देण्यात यावी, मोफत उपचार, घरभाडे आणि वीजबिल माफी या नौजवान भारत सभेच्या देशव्यापी मागण्यांवर तरुणांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.
“सद्य:स्थितीत आम्ही तरुणांना असे सांगू शकत नाही की त्यांनी बॉम्ब आणि पिस्तुले हातात घ्यावीत. आज विद्यार्थ्यांसमोर यापेक्षा अधिक महत्त्वाची कामे आहेत….क्रांतीचा हा संदेश तरुणांनी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचा आहे. गिरण्या, कारखान्यांची क्षेत्रे, शहरातील गलिच्छ वस्त्या आणि खेड्यातील जीर्ण झोपड्यांमध्ये राहणाऱ्या कोट्यावधी लोकांमध्ये तरुणांनी क्रांतीची चेतना जागवली पाहीजे. त्यातूनच स्वातंत्र्य प्राप्ती होईल आणि मग एका माणसाकडून दुसऱ्या माणसाची होणारे शोषण अशक्य होऊन जाईल.” -भगतसिंह
संपर्क:
रवि: 8956840785
निखिल: 8669735643

Related posts

Leave a Comment

11 − 5 =