जिल्हा रुग्णालय,अहमदनगर समोर नौजवान भारत सभेचे जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या बेजवाबदार आणि असंवेदशील कर्तव्या विरोधात निषेध आंदोलन

दि.29 रोजी सकाळी 11 वा. आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नौजवान भारत सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते. हे आंदोलन सोशल डिस्टसिंग ठेऊन करण्यात आले.
मागील महिन्यात 26 तारखेला दिलेल्या निवेदनाच्या मागण्या पुर्ण न केल्याने हे आंदोलन करण्यात आले. या निवेदनामधे संघटनेच्यावतीने जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सॅनिटायझर स्पॉट बसवणे,बऱ्याच वर्षापासून बंद पडलेली लिफ्ट चालू करणे,स्वच्छता,पिण्याचा पाण्याचा प्रश्न,नॉन कोविड रुग्णाना उपचार,आय.सी.यु मधे सी.सी.टीव्ही कॅमेरे,प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याचा सुरक्षेचा प्रश्न,अपुरे मनुष्यबळ अशा अनेक मागण्यांना घेऊन निवेदन देण्यात आले होते. परंतू एक महिना होऊनही कुठली मागणी पूर्ण न केल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची सुरवात अपेक्षा यांनी क्रांतिकारी गीताने केली. त्यानंतर कार्यकर्त्याची भाषणे झाली.या मधे संघटनेचे अतुल यांनी कोरोना संदर्भात जागतिक आणि देशातंर्गत परिस्थिची स्पष्टता येणारे मुद्दे मांडले. सरकारचे आज पूर्णपणे भांडवलदार वर्गाचे बाजूचे धोरण आणि सरकारी आरोग्य यंत्रणेचे खाजगीकरण करण्याचे सरकारचे नियोजन याबद्दल थोडक्यात माहिती दिली. कुठलीही पूर्व तयारी न करता सरकारने लॉकडाऊन घोषित केले याचा फटका मोठ्या संख्येने कामगार-कष्टकरी वर्गाला बसला व त्यांच्यावर आलेल्या उपासमारीची वेळ व कुचकामी धोरणाचा निषेध केला. यानंतर संघटनेचे संदीप यांनी जिल्हा प्रशासन कोरोना संक्रमण थांबवण्यामधे कशे अपयशी ठरले. सामान्य कष्टकरी-कामगार वर्गातील जनतेला सरकारी रुग्णालयातील अपुरे आरोग्य यंत्रणेमुळे आपला जीव गमवावा लागला.उपचार मिळत नसल्याने कशा भयंकर परिस्थितीला तोंड द्यावे लागले याबद्दल मत मांडले.
या निषेध सभेचे सूत्रसंचालन अविनाश यांनी केले. या निषेध सभेस संघटनेच कार्यकर्ते महेश,अशोक,साक्षी,सरफराज आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts

Leave a Comment

6 + thirteen =