रविवार दिनांक 8/3/2020 रोजी सायंकाळी 5:00 वाजता नौजवान भारत सभेच्या वतीने सिद्धार्थनगर,म्यूनिसिपल कॉलनी परिसरामध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी स्त्री मुक्ती लीग च्या कार्यकर्त्या साथी अपेक्षा यांनी ‘अमन के हम रखवाले सब एक है’ हे क्रांती गीत गायले.यानंतर नौजवान भारत सभेचे साथी प्रवीण यांनी उपस्थितांना संबोधित केले.त्यांनी आपल्या बोलण्याची सुरूवात करताना ‘महिलाए अब उठी नही तो जुल्म बढता जायेगा’ क्रांती गीत गायले. 8 मार्च इतिहास सांगताना ते म्हणाले की 8 मार्च 1908 ला अमेरिकेच्या न्यूयार्क शहरामध्ये कापड उद्योगात काम करणार्या महिला कामगारांनी मतदानाचा अधिकार आणि युनियन बनवण्याचा अधिकार…
Author: nbs_upload
पुण्यातील काशेवाडी भागामध्ये नौभास आणि शाहीनबाग, मोमीनपुरा येथील महिला साथींनी एकञित सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात घरोघरी जाऊन अभियान राबविले.
पुण्यातील काशेवाडी भागामध्ये नौभास आणि शाहीनबाग, मोमीनपुरा येथील महिला साथींनी एकञित सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात घरोघरी जाऊन अभियान राबविले. अभियानाला स्थानिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सर्वच धर्मांच्या लोकांनी एनपीआर प्रक्रियेवर सविनय बहिष्कार टाकण्याचे ठरविले. या कायद्याच्या समर्थकांनी दिल्लीमध्ये नुकत्याच केलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काशेवाडी परिसरात हे अभियान चालू होते. त्यामुळे कोणत्याही दंगलखोराला सदर परिसरात घुसू न देण्याचे आव्हान नौभास आणि इतर कार्यकर्त्यांनी केले. लोकांनी या आव्हानाचे प्रचंड स्वागत केले आणि शांतता पाळण्याचे आश्वासनही दिले.
शांतता व एकता रॅली
शांतता व एकता रॅली रविवार 1 मार्च रोजी पुण्यामध्ये ‘हम भारत के लोग’ तर्फे दिल्ली मधील राजसत्तेच्या समर्थनाने झालेल्या हल्ल्याच्या विरोधात, धार्मिक शांततेचे आणि एकतेचे आवाहन करत एक रॅली आयोजित केली गेली. रॅली शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय काढली गेली. नौभास आणि इतर संघटनांचे कार्यकर्ते, सामान्य नागरिक रॅली मध्ये सामील झाले.
सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात शाहीनबाग, मोमीनपुरा येथे सलग ३० दिवस चालू असलेल्या आंदोलनला समर्थन देण्यासाठी दि. २७ फेब्रुवारी रोजी, नौजवान भारत सभेचे कार्यकर्ते हजर होते.
सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात शाहीनबाग, मोमीनपुरा येथे सलग ३० दिवस चालू असलेल्या आंदोलनला समर्थन देण्यासाठी दि. २७ फेब्रुवारी रोजी, नौजवान भारत सभेचे कार्यकर्ते हजर होते. यावेळी प्रा. अभिजीत अ. मी यांनी राजधानी दिल्लीत संघी गुंडांकडून चालू असलेल्या धार्मिक उन्मादावर कडक टिका केली. तसेच डॉ. नेहा मोरखडे यांनी केलेल्या मांडणीमध्ये चूल आणि मूल चौकट मोडून महिला सामाजिक प्रश्नावर बेधडक आणि ठामपणे उभ्या ठाकल्या आहेत याचं महत्व अधोरेखित केलं. दोन्ही कार्यकर्त्यांनी भाषणानंतर जोरदार घोषणाबाजी करत सर्व आंदोलनकार्त्यांमध्ये जोश भरला. आंदोलनातील काही क्षणचित्रे.
एन आर सी, एन पी आर, सी ए ए कायदे काय आहेत ? नागरिकता कायदा काय आहे? एन पी आर आणि एन आर सी चे कनेक्शन काय ? या कायद्यांनी खरंच कोणाला धोका संभवतो ? हा फक्त मुस्लिमांचा प्रश्न आहे का ? आसामचा अनुभव काय आहे ? जाणून घ्या, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओतून
एन आर सी, एन पी आर, सी ए ए कायदे काय आहेत ? नागरिकता कायदा काय आहे? एन पी आर आणि एन आर सी चे कनेक्शन काय ? या कायद्यांनी खरंच कोणाला धोका संभवतो ? हा फक्त मुस्लिमांचा प्रश्न आहे का ? आसामचा अनुभव काय आहे ? जाणून घ्या, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओतून https://www.youtube.com/channel/UCktaWK7aWuQmwzbkc1zSWyg
गोवंडी मानखुर्द मध्ये CAA, NRC आणि NPR या काळया कायद्याच्या विरोधात जन प्रतिरोध रॅली.
गोवंडी मानखुर्द मध्ये CAA, NRC आणि NPR या काळया कायद्याच्या विरोधात जन प्रतिरोध रॅली. दि. १७/०२/२०२० रोजी गोवंडी – मानखुर्द मध्ये ‘जन प्रतिरोध रॅली’ च्या माध्यमातून लोकांना CAA, NRC आणि NPR या काळ या कायद्या संबंधी माहिती देत, हा कायदा फक्त मुस्लिम धर्मीयांना टारगेट करत नसून सर्व जाती धर्मातील गरीब लोकांना धारेवर धरत आहे. त्यामुळे या कायद्याविरोधात सर्वांनी एकत्रित येऊन संघर्षाची मोट उभारली पाहिजे. त्याशिवाय हे फासीवादी बीजेपी सरकार हे काळे कायदे परत घेणार नाही. सोबतच महाराष्ट्र सरकारने १ मे ते १५ जून या दीड महिन्यांमध्ये लागू होत असलेल्या NPR…
जाती-धर्म में नही बटेंगे,मिलजूल कर संघर्ष करेंगे।
दिनांक 16/ 2/ 2020 रोजी सायंकाळी 7:00 ते रात्री 9:00 या वेळेमध्ये अहमदनगर शहरातील सिद्धार्थ नगर, म्युनिसिपल कॉलनी परिसरात NRC,NPR,CAA या गरीब विरोधी विभाजन कारी कायद्याबद्दल नौजवान भारत सभेच्या कार्यकर्त्यांनी जनजागृतीपर अभियान चालविले. यावेळी परिसरात ठिक-ठिकाणी चौक सभा घेऊन या कायद्याबद्दल उपस्थित नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली.तसेच या कायद्याअंतर्गत होणार्या सर्वे ला विरोध करण्याबद्दल सांगण्यात आले. तसेच सायं. 5:00 ते रात्री 9:00 या वेळेत अहमदनगर येथील फकीर वाडा, रहेमानिया कॉलनी या ठिकाणी अहमदनगर शाहीन बाग सूरू झाला असून काल (दि.16) पासून या आंदोलनास सुरुवात झाली अाहे. आणखी दोन दिवस 16,17…
कोई भी विकल्प न चुनना चूप रहना, या बुदबुदाना अस्पष्ट शब्दों को या सुगम सुरक्षित विरोध की कोई नपुंसक राह ढूँढ लेना यह सब कुछ और कुछ भी नहीं है बर्बरता के पक्ष में खडे़ होने के सिवा।
क्रांतीचा आमचा आशय काय आहे, हे स्पष्ट आहे. या शतकात क्रांतीचा फक्त एकच अर्थ असू शकतो तो म्हणजे – जनतेसाठी जनतेने राजकीय सत्ता ताब्यात घेणे.
क्रांतीचा आमचा आशय काय आहे, हे स्पष्ट आहे. या शतकात क्रांतीचा फक्त एकच अर्थ असू शकतो तो म्हणजे – जनतेसाठी जनतेने राजकीय सत्ता ताब्यात घेणे. वास्तवात हीच ‘क्रांती’ आहे. बाकी सारे विद्रोह हे फक्त मालकांच्या पाठिंब्याने चालणाऱ्या परिवर्तनाद्वारे भांडवलशाहीतील सडकेपणाच पुढे रेटत असतात. लोकांविषयी किंवा त्यांच्या प्रश्नांविषयी कितीही सहानुभूती दाखवली तरी जनतेपासून वस्तुस्थिती लपत नाही, लोक कपट ओळखतातच. भारतामध्ये श्रमिकांच्या सत्तेपेक्षा काहीही कमी स्वीकारणे आम्हांला मान्य नाही. भारतातील साम्राज्यवादी – आणि ज्यांची नाळ शोषण हा मूलाधार असलेल्या आर्थिक व्यवस्थेशी जुळलेली आहे, असे त्यांचे हस्तक – यांना हुसकून देऊन भारतीय श्रमिकांना…
वेलेंटाईन डे पर संघी बाज नहीं आते। वेलेंटाइन डे और भगतसिंह को फाँसी की सजा का संघी कुत्साप्रचार
वेलेंटाईन डे पर संघी बाज नहीं आते। वेलेंटाइन डे और भगतसिंह को फाँसी की सजा का संघी कुत्साप्रचार – शहीदों को विरासत को बदनाम करने की साजिश पिछले कुछ वर्षों से वेलेंटाइन डे के दिन संघ व उसके तमाम अनुषंगी संगठन अपने परम्परागत तरीके मार पिटाई के अलावा विरोध का एक ओर तरीका प्रयोग में ला रहे है। उन्होंने इस दिन को किसी ओर दिन के रूप में पेश करने की भी कोशिश शुरू कर दी है। संघ के कुछ लोग इस दिन मातृ-पितृ पूजन दिवस मनाने की वकालत करते…
