गोवंडी मानखुर्द मध्ये CAA, NRC आणि NPR या काळया कायद्याच्या विरोधात जन प्रतिरोध रॅली. दि. १७/०२/२०२० रोजी गोवंडी – मानखुर्द मध्ये ‘जन प्रतिरोध रॅली’ च्या माध्यमातून लोकांना CAA, NRC आणि NPR या काळ या कायद्या संबंधी माहिती देत, हा कायदा फक्त मुस्लिम धर्मीयांना टारगेट करत नसून सर्व जाती धर्मातील गरीब लोकांना धारेवर धरत आहे. त्यामुळे या कायद्याविरोधात सर्वांनी एकत्रित येऊन संघर्षाची मोट उभारली पाहिजे. त्याशिवाय हे फासीवादी बीजेपी सरकार हे काळे कायदे परत घेणार नाही. सोबतच महाराष्ट्र सरकारने १ मे ते १५ जून या दीड महिन्यांमध्ये लागू होत असलेल्या NPR या काळ या कायद्याला विधानसभेमध्ये ठराव पास करून राज्यात लागू करणार करणार नाही! अशी स्पष्ट भूमिका घ्यावी. नाहीतर आम्ही बीजेपी च्या बाजूने आहोत असे तरी स्पष्टपणे सांगावे. धर्मनिरपेक्षतेचे ढोंग करून सत्तेची मलाई खाणारी राज्य सरकार जनतेबरोबर करत असलेली गद्दारी ही सहन केली जाणार नाही असे नमूद करण्यात आले व हा संघर्ष निरंतर चालूच राहील जो पर्यंत हे काळे कायदे रद्द होणार नाहीत तोपर्यंत.
गोवंडी मानखुर्द मध्ये CAA, NRC आणि NPR या काळया कायद्याच्या विरोधात जन प्रतिरोध रॅली.
